Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

प्राणप्रिये

ड — डॉ.अमित गुंजाळ, Tue, 09/08/2020 - 21:38
प्राणप्रिये, सात फेरे घेऊन जीवनात माझ्या आलीस , अन अंगणातील तुळस झालीस तू. हसून खेळून सुखी संसाराची स्वप्ने रंगवतेस, अन मला समाधानाचा गारवा देतेस तू. प्राणप्रिये, अंधाराच्या जाळ्यामध्ये ही प्रकाशाची फुंकर घालतेस, अन प्रितीच्या वाऱ्यावर झोका झुलवतेस तू. जिद्दीने उंच उंच भरारी घेण्यास शिकवतेस, अन मनाच्या गाभऱ्याचे दरवाजे उघडतेस तू. प्राणप्रिये, सहजीवनात आधार देऊन साथ निभावलीस, अन माझ्या घरची परसबाग झालीस तू. सुख दुःखाच्या प्रत्येक गोष्टीत भागीदारी केलीस, अन जीवन माझे रोशन केलेस तू. प्राणप्रिये, अमाप प्रेम करून वर्षोनुवर्षे संगत केलीस , अशीच या पूढेही करशील ना तू. जन्मोजन्मी एकत्र राहण्याची तू शपथ घेतलिस, देतो ग्वाही मी पण , संग राहू मी आणि तू. प्राणप्रिये, संग राहू मी आणि तू, संग राहू मी आणि तू.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2957 views

💬 प्रतिसाद
र
रंगीला रतन Wed, 04/28/2021 - 12:04 नवीन
अमाप प्रेम करून वर्षोनुवर्षे संगत केलीस , तर मग अशीच या पूढेही करशील ना तू. असा प्रश्न तिला का विचारावा बरे? अविश्वास की संशय?
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Sat, 05/01/2021 - 10:44 नवीन
ख्या: ख्या: ख्या:
  • Log in or register to post comments
N
nutanm गुरुवार, 04/29/2021 - 00:31 नवीन
इतकी वर्षे संसार करून जीवन रोशन केले, संसारात समाधानाचा गारवा आणला तरी शेवटी परसबागच झाली, आल्या आल्या दिसणारी, मन प्रसन्न करणारी पुढच्या अंगणीची फुलबाग का नाही?
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 04/30/2021 - 18:42 नवीन
बायकोवर केलेलं इतकं प्रेमळ, उत्कट, मनस्वी काव्य मिपावर पहिल्यांदा वाचलंय.
  • Log in or register to post comments
र
रंगीला रतन Fri, 04/30/2021 - 19:31 नवीन
+३००४२०२१ :)
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 05/02/2021 - 01:52 नवीन
तुम अगर साथ देने का वादा करो मै यूंही मस्त नगमे लुटाता रहूं... हम तुम युग युग से ये गीत मिलन का गाते रहेंगे ... वादा करले साजना ... न होंगे जुदा ये वादा रहा. वगैरे गाणी आठवली. परसबाग च्या ऐवजी 'तुळशीबाग' कसे वाटेल ? "अंगणातील तुळस झालीस तू" असे सांगितलेच आहे म्हणून वाटले. नसेल चांगले वाटत तर जाऊ द्या. परसबाग तर परसबाग. ... आणि हो. भा. रा. तांब्यांची "सहज तुझी हालचाल मंत्रे जणु मोहिते" ही कविता पण या निमित्ताने आठवली.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा