Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

या लोकांना मतप्रदर्शनाकरिता बोलावणे योग्य आहे का ?

क
केदार पाटणकर
Mon, 08/31/2020 - 10:08
🗣 4 प्रतिसाद
सुमारे वीस वर्षांपूर्वी सामनेनिकालनिश्चितीप्रकरणात काही क्रिकेटपटू अडकले. त्यांचे करीअर जवळजवळ संपले. काहींनी केस लढवली. काहींवर आजीवन बंदी आली. पुढे काही वर्षांनी या लोकांना टीव्हीवर समालोचन किंवा मतप्रदर्शनाकरिता बोलावले गेले. प्रश्न असा - गैरकृत्य केल्यामुळे गुन्हेगार ठरलेल्या लोकांना टीव्हीवर मतप्रदर्शनासाठी सन्माननीय पाहुणे म्हणून बोलावणे योग्य आहे का ? काही वर्षांनी या लोकांवर ठपका तितका राहत नाही, असे आहे का ? एक स्पेसिफिक उदाहरण - नयन मोंगियाला मी काही सामन्यांच्या वेळी टीव्हीवर पाहिले आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2490 views

🗣 चर्चा (4)
क
कानडाऊ योगेशु Mon, 08/31/2020 - 10:16 नवीन
प्रश्न असा - गैरकृत्य केल्यामुळे गुन्हेगार ठरलेल्या लोकांना टीव्हीवर मतप्रदर्शनासाठी सन्माननीय पाहुणे म्हणून बोलावणे योग्य आहे का ?
उत्तर : नैतिकदृष्ट्या बरोबर नसले तरी जर नयन मोंगियाचेच उदाहरण घ्यायचे झाले तर यष्टीरक्षणासंबंधीत काही विश्लेषणाबाबत त्याचे ज्ञान अधिक असु शकते त्यामूळे जर त्याला बोलावले असेल तर त्यात काही गैर नसावे. कायद्यानुसार जर गुन्हेगाराने योग्य ती सजा भोगली असेल तर समाजात वावरण्याचा त्याला हक्क आहे.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Mon, 08/31/2020 - 12:57 नवीन
हे पटते.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 09/01/2020 - 14:27 नवीन
काही वर्षांनंतर लोक गुन्हा आणि गुन्हेगाराचा अपराध या विषयी विसरून जातात, त्यांच्या लक्षात राहते ते त्यांचे सेलीब्रेटीत्व जे व्यावसायिक फायद्यासाठी वापरले जाते, त्या मुळे "अशा लोकांना मतप्रदर्शनाकरिता बोलावणे योग्य आहे का ?" हा सवालच फिजूल होऊन जातो !
  • Log in or register to post comments
फ
फेरफटका Tue, 09/01/2020 - 15:58 नवीन
मॅच फिक्सिंग हा भारतात कायद्यानं गुन्हा नाही असं मला वाटतं. मध्यंतरी आयसीसी ने पुढच्या दोन वर्ल्डकप्स (भारतात भरणारे) च्या पार्श्वभूमीवर असा कायदा अतित्वात यावा अशी विनंती केली होती. पण सद्य कायद्यानुसार अशी कुठलीही तरतूद नाही. बेटींग साठी ५०० रूपये दंड होऊ शकतो. त्यामुळे मोंगिया-अझहर-जडेजा प्रभृतींवर कुठलाच गुन्हा दाखल झाला नाही आणी त्यांणा कुठलीही कायदेशीर शिक्षा झाली नाही. आशियामधे मॅच फिक्सिंग कायदेशीर गुन्हा असलेला श्रीलंका हा एकच देश आहे बहूतेक.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा