आजकाल
कोलाहलात गर्दीच्या
एकांत मी कवळतो
अंधारून येता मीच
अंतर्बाह्य झळाळतो
रिक्ततेच्या डोहामध्ये
सदा सचैल डुंबतो
शून्य असूनही थेट
अनंताशी झोंबी घेतो
आठवता आठवता
पुन्हा त्याला विसरतो
दशदिशा कोंदून जो
दहा अंगुळे उरतो
💬 प्रतिसाद
च
चांदणे संदीप
Sun, 08/30/2020 - 08:50
नवीन
अप्रतिम रचना.
सं - दी - प
- Log in or register to post comments
B
Bhakti
Sun, 08/30/2020 - 11:02
नवीन
रिक्ततेच्या डोहामध्ये
सदा सचैल डुंबतो
शून्य असूनही थेट
अनंताशी झोंबी घेतो
**सुंदर
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Mon, 08/31/2020 - 05:13
नवीन
भूजल तेज समीरख रवि शशि काष्ठादिकीं असे भरला।
स्थिरचर व्यापुनि अवघा तो जगदात्मा दशांगुळे उरला - (मोरोपंत)
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Tue, 09/01/2020 - 14:04
नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Tue, 09/01/2020 - 14:06
नवीन
शून्य असूनही थेट
अनंताशी झोंबी घेतो
आठवता आठवता
पुन्हा त्याला विसरतो
अप्रतिम.. लाजवाब..
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
गुरुवार, 09/03/2020 - 06:10
नवीन
धन्यवाद!
- Log in or register to post comments