Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

तपश्चर्या

म
माझिया मना
Sat, 08/22/2020 - 20:52
💬 58 प्रतिसाद

इथे कोणी गिरिजा राजवाडे रहायच्या का?
असे विचारणाऱ्या म्हाताऱ्या इसमाकडे दीपाने वळून पाहिले. गाडी स्टँडवर लावत ती मागे आली. काय काम आहे त्यांच्याकडे? असे तिने जरा रागातच विचारले.
त्या कुठे आहेत, मला त्यांना पहायचंय एकदा, अजीजीने ते उत्तरले. हे असलं विचित्र उत्तर ऎकून दीपा आत गेली, आणि ८० वर्षाच्या सासूबाईंना घेऊन बाहेर आली.
ओळख पटली नि गिरिजाबाईंना हे घर ना सोडण्याच्या आपल्या निर्णयाचा आनंद झाला.
६४ वर्ष वाट पाहून, मनाची समजूत घालून जिवंत समजत असलेला पती जिवंतच होता. रागाच्या भरात सोडलेले घर पुन्हा जवळ केले त्याने. गिरिजाबाईंनी देवाचे अाभार मानले. आज ६४ वर्षांनी तपश्चर्याला फळ मिळाले.


वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • 20875 views

💬 प्रतिसाद (58)
स
सिरुसेरि Mon, 08/24/2020 - 16:59 नवीन
छान कथानक . या आशयावरुन एक चांगली शत शब्द कथा होउ शकते . +१ . ५०/५०
स
सुबोध खरे Sat, 08/29/2020 - 20:18 नवीन
स्वतःला सर्वज्ञ समजणारा माणूस डोक्यावर पडलेला आहे याची खात्री झाली आहे. साध्या शतशब्दकथेचा आस्वाद घेण्याऐवजी त्यात मिठाचा खडा टाकण्याची विघ्न संतोषी वृत्ती पाहून करमणूक झाली
क
कोहंसोहं१० Sun, 08/30/2020 - 02:11 नवीन
"कारण एकवेळ माहितीत चूकभूल होऊ शकते पण लॉजिकमधे मला कोंडीत पकडणं अशक्य" ---> हाहाहा.....आणि एका आयडी ने मनावर घेऊन बरोब्बर कोंडीत पकडलेच शेवटी. संक्षी, तुम्हाला वाटत असेल की तुमची चूक दाखवून दिल्यावर, तुम्हाला कोंडीत पकडल्यावर गोल गोल शब्दांचे सडे पाडून त्यातून निसटून जाता येते पण तसे नाहीये. लोकं तेवढेही मूर्ख नसतात. सर्वसामान्य वाचकाला सहज कळते की कोण कोंडीत सापडत आहे. अश्या वेळी चूक मान्य केली तर उलट त्या आयडी बद्दलचा आदर वाढतो. पण चूक असूनही मान्य न करता जिलब्या टाकून समोरच्याला गप्प करण्याचा प्रयत्न फक्त तुमची केविलवाणी धडपड दर्शवते. असे झाल्यास बऱ्याचदा इथे लोकं सोडून देतात. कारणे अनेक असतात, त्या खोलात जात नाही. पण हल्ली तुमच्या बाबतीत असे दिसते आहे की तुमच्या गर्विष्ठ आणि एककल्ली, दुराग्रही आणि फक्त मीच शहाणा या स्वभावामुळे अनेकजण मुद्दा शेवटपर्यंत लावून धरत आहेत आणि अश्यावेळी अनेकदा तुम्ही तोंडावर पडत असलेले दिसून आले आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्ही बरोबरच असता हा फाजील आत्मविश्वास सोडा. कवी अनंत फंदी त्यांच्या प्रसिद्ध 'फटका' मध्ये म्हणतात - मी मोठा शाहणा, धनाढ्यही, गर्वभार हा वाहू नको | एकाहूनू चढ एक जगामंधि, थोरपणाला मिरवू नको || जगात आपल्यापेक्षा कमी शहाणे लोकं असले तरी आपल्यापेक्षा जास्त शहाणेही लोकं असतात एवढे साधे लॉजिक जरी समजले तरी पुरेसे आहे. शेवटी विद्या विनयेन शोभते. एकदा तुमच्या मिथ्या अहंकाराचे ओझे बाजूला सारून तरी बघा. मस्त हलके व्हाल. आणि हो, सगळीकडे कोरड्या तर्काचे काटे फेकून मारण्याऐवजी प्रसंगानुरूप कलेच्या सुगंधाचाही आस्वाद घेत चला एवढेच सांगेन.
च
चौकस२१२ Sun, 08/30/2020 - 02:40 नवीन
+१११
स
संजय क्षीरसागर Sun, 08/30/2020 - 11:46 नवीन
आजच्या युगात माणूस जसा चालेल तशी नदीच्या पाण्याची पातळी बदलत गेली. कालीमुळे पोट दुखी संपली इतकी टुकार विचारसरणी असलेल्यानं लॉजिकवर बोलावं हे एक आश्चर्य ! बाकी धाग्यातल्या सर्व प्रतिसादांना उत्तर दिलं आहे. धाग्या संबंधी काही मुद्दा असेल तर बोला. नाही तर इथले सो कॉल्ड डॉक्टर ज्यांना पेशंटची तपासणी केंव्हा करायची माहिती नाही, स्वतःचे कालचे प्रतिसाद आज आठवत नाहीत, सोनोग्राफीची आणि जिएसटी रिटर्न्ससारखीच म्हणतात, वर मलाच विचारतात की त्यांची सोनोग्राफीची रिटर्न्स पेंडीग आहेत का, आणि काही जमलं नाही की स्वतःची लायकी काढतात ! त्यांचे आणि तुमचे प्रतिसाद एकसारखेच. आता उगीच फालतू पचपच करण्यापेक्षा धाग्यावर बोला आणि हौसच असेल तर अक्कल घरच्यांना शिकवा.
क
कोहंसोहं१० Sun, 08/30/2020 - 22:05 नवीन
हाहाहा. सत्य झोंबले वाटते. पण जमल्यास शिका त्यातून काहीतरी. धाग्याविषयी मी आधीच बोललो आहे आणि कथा आवडल्याचा प्रतिसादही दिला आहे आधीच. जरा वाचत चला नीट. राहिला लॉजिक चा प्रश्न, तर तुम्ही तुमच्या निर्बुद्ध लॉजिकची पातळी 'माणूस मेल्यावर स्मृतीच्या स्ट्रिंग अंतराळात रेलेअसे होतात आणि नवजात अभ्रकाच्या मेंदूत पेस्ट होतात आणि आपण यालाच पूर्वजन्म म्हणतो' आणि 'माझा आयडी (मिपावर) ब्लॉक नसता झाला तर २०१९ मध्ये भाजप सत्तेवर आली नसती' अश्या आशयाच्या विधानातून आधी दाखवून दिलीच आहे आणि तोंडावर आपटला आहात. हाही धागा पुन्हा एकदा त्रयस्थपणे वाचून बघीतल्यावर तुम्हाला कळेल की "पण लॉजिकमधे मला कोंडीत पकडणं अशक्य" हा तुमचा माज एका आयडीने अत्यंत शांतपणे उतरवला आहे तोही पुराव्यासकट. एक सणसणीत चपराक तीही संयमितपणे. तुमचे लॉजिक गंडले आहे हे तुमच्या लक्षात येताच नेहमीप्रमाणे तुम्ही शाब्दिक हल्ले करून प्रतिसाद्कर्त्याला तुमच्याविरुद्ध बोलण्यापासून परावृत्त करण्याचा केविलवाणा प्रयत्न केलात जरूर (उथळ पाण्याला खळखळाट फार) पण त्याचा परिणाम उलटाच झाला. अजूनही तुमच्या पराभवाची चरफड तुमच्या प्रतिसादातून दिसून येतेय. तुमचे हल्लेखोर प्रतिसादच सांगून जातात की तुम्हालाही तुमच्या गंडलेल्या तर्काची कल्पना आलेली पण तुमच्या अहंगंड मोठा भारी ज्यामुळे तुम्ही पुन्हा तोंडावर आपटून तुमची शोभा करून घेतलीत. तुमच्या लक्षात आलेच असेल तुमचा गर्विष्ठपणाच तुमचे किती नुकसान करतोय. म्हणून मी प्रांजळपणे तुम्हाला सल्ला दिलेला. अजून एकदा कवी अनंत फंदी यान्च्या शब्दात सांगतो- मी मोठा शाहणा गर्वभार हा वाहू नको......एकाहूनू चढ एक जगामंधि, थोरपणाला मिरवू नको बघा पटतंय का...
स
संजय क्षीरसागर Mon, 08/31/2020 - 06:16 नवीन
चौथीतल्या मुलाला सुद्धा पटणार नाही अशा गोष्टी आपण पब्लिक फोरमवर लिहितोयं एवढी सुद्धा समज नाही. स्वतः किंवा कुटुंबियांना आजारपण आल्यावर डॉक्टरकडे जाता का कालीच्या देवळात इतका साधा मुद्दा तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या धारणा उध्वस्त करतो, तुम्ही काय घंटा लॉजिकच्या गोष्टी करता ? तुम्हाला ओपन चॅलेंज देतो, पुनर्जन्माविषयी तुम्हाला काय माहिती आहे ते वेगळा धागा काढून लिहा, तुमच्या धाग्यावर मी माझा अनफॉरमॅटेड मेमीरी स्ट्रींग्जचा दावा सिद्ध करतो. तुम्हाला काहीही माहिती नाही आणि तुम्ही त्याविषयात काहीही लिहू शकत नाही तरी उगीच मुद्दा रेटतायं. धागा काय आणि प्रतिसाद काय एवढं तरी भान ठेवा. इथल्या सर्व प्रतिसादांना मी उत्तर दिलंय हे बघून तुमच्या थोबाडात बसली आहे कारण मला निरुत्तर करण्याचा प्रष्णच नाही. जिएसटीवर तुम्हाला काय माहिती आहे हे मागेच विचारले आहे. अर्थव्यवस्थेतलं तुम्हाला काय घंटा कळतं ? भरमसाठ वाढलेल्या किंमती आणि देशातली बेरोजगारी यावर तुम्ही मतदान करतांना काय विचार केला ? एफाअरडीआय बील आणून मोदी आणि जेटलींनी बँकेतल्या मुदत ठेवी, बुडीत अकाऊंट राइट ऑफ करण्यासाठी वापरण्याचा घाट घातला होता. तो पार्लमेंटरी कमिटीसमोर रिप्रझंटेशन करुन हाणून पाडला त्यात माझा सहभाग होता, काय घंटा कल्पना आहे तुम्हाला त्या बीलाची ? १.७५ लाख कोटी रुपये रिजर्व बँकेच्या गंगाजळीतून परस्पर हडपण्यासाठी मोदींनी ३ गवर्नर्स बदलले, काय विचार केला तुम्ही याचा बिजेपीला मत देतांना ? वरच्या एकाही प्रश्णाचं उत्तर तुमच्याकडे नाही, अशा अक्कलशून्य मतदारांनी केलेल्या निर्बुद्ध निवडीची फळं आज देश भोगतो आहे. थोडक्यात, तुमचा काहीएक अभ्यास नाही तरी मूर्खासारखे प्रतिसाद देतायं. आता हिंमत असेल तर (अस्थानी असतांना सुद्धा, कारण तो तुमचा निर्बुद्धपणा आहे) वरच्या प्रश्णांची उत्तरं देऊन दाखवा. नपेक्षा तुम्ही स्वतःची पुरती शोभा करुन घेतली आहे, इथून पुढे आपलं अज्ञान आणखी उघडं पाडू नका.
स
सुबोध खरे Sun, 08/30/2020 - 07:27 नवीन
असं कसं असं कसं? मीच शहाणा आहे मी शहाणाच आहे मी शहाणा आहेच तुम्ही कोण गोमाजी लागून गेलात?
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 17 hours ago
  • सुंदर !!
    6 days 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा