Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

वार्ता सुखाची घेऊन....

V — Vivekraje, Sat, 08/22/2020 - 05:14
वार्ता सुखाची घेऊन , आता यावे घरी देवा..| ओढ भेटीची लागली, होई तगमग जिवा..|| काही कळेना जीवाला, मना धाव घेऊ कोठे..| ओढ तुम्हा दर्शनाची, धीर काळजात वाटे..|| तुमच्या येण्याची चाहूल, देवा आम्हा सुखावते..| अवघी चिंता दुःख सारी, जशी दूर घालवते..|| आहे संकट हे मोठं, नाही माणसाच्या हाती..| नाही श्रीमंतीचं मोलं, होते गरीबाची माती..|| वार्ता सुखाची घेऊन , यावे वाजत गाजत..| नको दुःखाची किनार, कुणा ओल्या पापण्यात..|| नाव तुझं मंगलमूर्ती, विघ्नहर्ता तुझी कीर्ती..| तुझ्या येण्यानं ही सारी, देवा उजळावी धरती..|| जरी झाली चूक थोडी, देवा स्वीकारून घ्यावी..| रीती परंपरा उत्सवाची, देवा पुन्हा सुरू व्हावी..|| जरी आहे तुम्ही देवा , सदा मन मंदिरात..| तरी हट्ट आहे बाप्पा, व्हावी गर्दी देवळात..|| साऱ्या दुनियेची पीडा, देवा जळून जाऊ दे..| सारी धरणीही देवा, नव्या हर्षात न्हाऊ दे..||

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1942 views

💬 प्रतिसाद
ग
गणेशा Sat, 08/22/2020 - 05:49 नवीन
छान
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 13 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 13 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 13 hours ago
  • सुंदर !!
    1 day 13 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 13 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा