मध्यमवर्ग
मन मुंबई लक्ष्मी लॉटरी...
मन खडखडीत तिजोरी...
मन वैरी...
मन डायरीतले मोरपीस...
मन आहेराचा शर्ट पीस...
मन कासावीस...
मन मंदिरातला गाभारा...
मन हातामधला गंडादोरा...
मन भरारा...
मन इमान धैर्य न्याय...
मन दोन दगडावरती पाय..
मन हाय हाय...
मन डायरीतले मोरपीस... मन आहेराचा शर्ट पीस... मन कासावीस...आहेराचा शर्ट पीस वाचून मन नॉस्टजिकले, गेले ते आहेराच्या शर्टपीसचे दिवस, राहिल्या त्या फाटक्या टीशर्ट आणि रंग विटलेल्या जीन्सच्या आठवणी !