Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

आठवणी 2

प
प्रमोद पानसे
गुरुवार, 08/13/2020 - 08:15
💬 3 प्रतिसाद
स्वयंपाकघरात जेवायला बसलं की मागच्या दारातुन शाळेच्या छतावरुन लांबवरचा हिरवागार डोंगर दिसायचा. हो त्याचं पहिलं दर्शन हिरवंगारच होतं. जुन महिना ,नविन शाळा ,लोणावळ्यातला पावसाळा आणी धुक्यात वेढलेला तो हिरवागार डोंगर एखाद्या गुढ ,अगम्य विचारवंतासारखा भासायचा.एवढं काही समजत नव्हतं पण त्या वयात वाचलेल्या परिकथांमधला एखादा राक्षस ,जादुगार किंवा चेटकीणीचं वास्तव्य असावं त्या डोंगरामागे असं वाटायचं. मधुनच उन्हाची एखादी तिरीप त्यावर पडली की पाचुच्या त्रिकोणी खड्यासारखा चमकायचा. संह्याद्रीने लोणावळा परिसराला जी निसर्गाची देणगी दिली आहे त्याचा तो एक मुर्त दाखला आहे.एकंदरीत चिकीत्सक वृत्ती आणी अनंत किड्यांच्या डोक्यातल्या वारुळा बाबत कल्पना असल्याने काकाने आधीच तो भुताचा डोंगर आहे तीकडे जायचं नाही अशी ताकीत दिलेली. साधारण गणेशोत्सवानंतर पावसाळा ओसरला आणी त्या डोंगराचं भयकंपीत करणारं गुढ नाहीसं झालं.निसर्गाची एक गंमत असते पावसाळ्यात गुढ भासणारा तो नंतर थंडीत ट्रेकर्सना सवंगडी वाटतो आणी उन्हाळ्यात अनुभवी पण रुक्ष आजोबा वाटतो. आता उन्हात तो स्पष्ट दिसु लागला.अधुन मधुन काही गुरं आणी गुराखी यांची हालचाल दिसु लागली.आणी भुत त्यांना खाइल वगैरे चिंतेने मनात येणाऱ्या शंकांना कंटाळुन एक दिवस शनिवार असावा बहुतेक.काकाने संध्याकाळी मला त्या डोंगरावर न्यायचा प्लॕन केला.संपुर्ण तीन चार किलोमिटरचा रस्ताभर माझ्या अनंत शंका कुशंकांना न कटाळता उत्तरं देत तो मला डोंगराच्या पायथ्याशी घेउन आला.तीथल्याच एका झोपडीवजा घरात आवाज देत त्याने त्याच्या मित्राला हाक दिली.आणी त्याच्या मित्रापाठोपाठ एक माझ्याच वर्गातला मुलगा बाहेर आला. अर्जुन घरदाळे माझा वर्गमित्र आणी ट्रेकींग मधला माझा पहिला आणी शेवटचा गुरु.या मित्राबरोबर पुढची चार वर्षे मी अनंत डोंगर चढाया केल्या.लोहगड, विसापुर,नागफणी ,राजमाची.संघाचे कँप अर्जुनची संगत.गुढगे ,ढोपरं फोडुन घेत अनवाणी पायांनी केलेल्या डोंगसफरींची कहाणी .मी मावळ अक्षरशः जगलो त्या काळात.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1773 views

💬 प्रतिसाद (3)
च
चौथा कोनाडा गुरुवार, 08/13/2020 - 12:47 नवीन
व्वा, सुंदर चित्र ! निसर्गाची एक गंमत असते पावसाळ्यात गुढ भासणारा तो नंतर थंडीत ट्रेकर्सना सवंगडी वाटतो आणी उन्हाळ्यात अनुभवी पण रुक्ष आजोबा वाटतो. हे भारीच !
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 08/13/2020 - 18:09 नवीन
छान लिहिले आहे... लिखाणातून तिकोना आणि तुंग हा परिसर डोळ्यासमोर येत राहिला..
  • Log in or register to post comments
र
रातराणी गुरुवार, 08/13/2020 - 19:14 नवीन
छान लिहिताय.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 17 hours ago
  • सुंदर !!
    6 days 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा