Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

भितीत फायदा नसतो?

उ
उपयोजक
Sat, 08/08/2020 - 08:56
🗣 1 प्रतिसाद
'डर के आगे जीत है' हा हिंदी वाक्प्रचार बर्‍याचदा धाडसाचं महत्त्व सांगण्यासाठी वापरला जातो.पण खरंच भितीमुळे दरवेळी नुकसानच होतं का?दरवेळी 'भिती' ही प्रगतीतली धोंडच ठरते का? उदा.गुन्ह्यात सापडलो तर आपल्याला शिक्षा होईल या भितीपोटी कितीतरी गुन्हे व्हायचे टळतात.'बागुलबुवाची भिती दाखवून आई आपल्या लहान मुलाला जेवू घालते.' फार काय अगदी कोर्टातही साक्षीदाराला त्याच्यादृष्टीने पवित्र अशा ग्रंथावर हात ठेवून शपथ घ्यायला लावणं हा सुद्धा भिती वापरुन घेण्याचाच प्रकार आहे.परीक्षेत नापास होण्याच्या भितीने अभ्यास करणारी मुलं,नोकरी जाण्याच्या भितीने स्वत:चा आक्रमकपणा नियंत्रणात ठेवणारे कामगार अशी बरीच उदाहरणे देता येतील जिथे भितीमुळे हवा तो परिणाम साधला गेलेला आहे.किंबहूना भितीमुळे जितक्या लवकर परिणाम साधतो तितक्या लवकर भिती दूर झाल्याने साधत नाही.सुरक्षा प्रणालीची अर्धवट माहिती कामगाराला झाली तर आपल्याला ती पूर्ण माहिती झालीय या गैरसमजात तो ती डायव्हर्ट करुन 'स्वत:ची हुशारी' सिद्ध करायला जाऊ शकतो आणि जीवाशी खेळ होऊ शकतो.अशा ठिकाणी 'भितीचं महत्त्व' लक्षात येईल. पाप घडलं तर परमेश्वर शिक्षा करेल या भितीपोटीच कितीतरी 'पापं' टळतात.देव आहे की नाही हे निश्चित माहित नसूनही 'आपल्याकडून काही भ्रष्टाचार घडला असल्यास देवानं आपली श्रीमंती काढून घेऊ नये यासाठी मोठमोठे धनी उद्योजक देवळांना देणग्या देतात.'याच पैशातून समाजोपयोगी कामे मंदिरांकडून केली जातात. भिती नष्ट करुन ज्याची भिती वाटते त्यामागचं गमक उघडं करुन ज्ञान वाढल्याने जेवढ्या लवकर काम होण्याचा परिणाम साधला जातो त्याहीपेक्षा अधिक लवकर अज्ञानातून येणार्‍या भितीमुळे होत असेल तर भिती 'निरुपयोगी' कशी?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1781 views

🗣 चर्चा (1)
श
शा वि कु Sat, 08/08/2020 - 15:27 नवीन
डार्क नाईट रायसेसचा आजिबात न उल्लेख केल्याचा निषेध :)) Fear is why you fail. -there is no fear in me. There's anger. —How can you move faster than possible, fight longer than possible, without the most powerful impulse of spirit.... The fear of death ? पण ह्याची आणखी एक बाजू आहे असे वाटते. तुम्ही ज्या चांगल्या गोष्टी भीतीमुळे होतात म्हणताय, तितक्याच वाईटही होतात. आणि अज्ञानातून होणाऱ्या चुका टाळण्यासाठी भीती हा एकमेव उपाय नाही असे वाटते. भीती आहे आणि चुका टाळल्या जातायत हे तर ओकेच आहे. पण आता ज्ञान उपलब्ध आहे, तिथे तरी अज्ञान घालवून भीती मारण्यात काय वाईट ?
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 21 hours ago
  • सुंदर !!
    1 day 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा