Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

पुरोगामी, लिबरल्स लोकांनी आता करायचे तरी काय ??? कोणती नवी चाल खेळायची?

स
सुधीर मुतालीक
गुरुवार, 08/06/2020 - 19:23
💬 74 प्रतिसाद
संघाचे काल भूमी पूजनाच्या निमित्ताने झालेले भव्य दर्शन त्या समस्त तथाकथित बुद्धिवंत पुरोगामी आणि लिबरल लोकांस किती त्रासदायक असेल ??? संघाच्या एक एक अजेंड्याची अशी पूर्तता होताना बघून किती यातना होत असतील ? चार पाच वर्षांपूर्वी पर्यंत स्वप्नात देखील या देशात कुणी कल्पना केली नव्हती की 370 कलम इतक्या लवकर हटवले जाईल. संघ गेली सत्तर वर्षे सातत्याने समस्त परिवारातल्या कार्यकर्त्याना 370 कलम हटविण्या संबंधीचा नारा देत होता आणि आपल्या उरीचे ते स्वप्न कार्यकर्ता जगत होता. सत्ता अशा स्वप्नांसाठी करायची आहे याची पदोपदी जाण होती आणि आहे. हमे राज नही, समाज बदलना है - कार्यकर्ता हेच तत्व जगतो आहे. त्यामुळे समाज बदलण्याच्या हेतूने सत्तेचा अट्टाहास केला. त्यात यश मिळाल्यावर - सत्ता मिळाल्यावर - देखील दांडगाईने पहिल्याच पाच वर्षात नव्हे, तर संपूर्ण संयत भूमिका घेऊन कायदेशीर मार्गानी, दंगेधोपे, गोंधळ न करता. सात्त्विक समाधानाची पखरण करत. हा हा म्हणता ते सत्तर वर्षाचे दुखणे असणारे 370 कलम हटवले गेले, शेतकरी एकशे चौतीस वर्षांनी बाजाराच्या बंधनातून मुक्त केला गेला, शेकडो वर्षे शाब्दिक घटस्फोटाच्या धाकात जगणाऱ्या मुस्लिम महिलेला मुक्त केले गेले आणि आता पाचशे वर्षे हिंदू समाजाच्या हृदयात बोचणारी सल नाहीशी केली, काल आत्मनिर्भर भारताची सुवर्ण वीट रचली. संघाचे हे विराट दर्शन किती छळत असेल त्या पुरोगामी, लिबरल्स वगैरे व्याख्या आणि बिरुदावली घेऊन समाजात वावरणाऱ्या ढोंगी लोकांना ??? अगदी ठामपणे सांगतो आज किंवा गेल्या काही वर्षात, दशकात ही लेबले लावून, खादीचे झब्बे घालून, खांद्यावर झोळी, अडकवून दाढीचे खुंट, वाढवून कपाळावर लालबुंद मोठी बिंदी लावून, कधी हातात डफली घेऊन, कधी गोलात बसून जागतिक हवामानाच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारणारे, कधी ह्या पक्षाच्या कधी त्या पक्षाच्या खांद्यावर बंदूक ठेवणारे, इस्लाम खतरेमें है चा नारा देऊन गरीब पीडित मुसलमानांना फितवणारे आणि भारतीय समाजात फूट पाडून आपले अस्तित्व टिकवण्याच्या प्रयत्नात कोणत्याही नीचतम स्तराला जाणारे हे लोक ते खरे पुरोगामी नव्हेत. नवरा गेल्यावर पोरीला चितेवर ढकलणाऱ्या समाजाला जागेकरून पोरीला मुक्त करणारे किंवा जातीच्या उतरंडीमध्ये पिचून गेलेल्या दलित समूहांना माणूस म्हणून त्यांचे स्थान आणि प्रतिष्ठा मिळवून देणारे किंवा आजारी पडलेल्या माणसाला मांत्रिकाकडे नाही तर डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी इथल्या अडाणी जनतेला शिक्षित करणारे किंवा भारतीय लेकीच्या हाती पाटी पेन्सिल देणारे इत्यादी हे सगळे खऱ्या अर्थाने आमच्या हृदयात सदैव आदरणीय असणारे पुरोगामी. आज आजुबाजुला दिसणारे पुरोगामी ते हे नव्हेत. हे कोण आहेत माहितीय ? कुठून आले कळलंय ?? गांधीजींच्या दांडी यात्रेत शेवटी शेवटी असणारे आणि ट्रॅफिक पोलिसाच्या थाटात रस्त्यात मध्येच 'चलो चलो आगे बढो' म्हणत लोकांना हाकणारे. पण अगदी पुढल्या फळीतल्या गांधींवर लाठी चार्ज करत इंग्रजांचा पोलीस पुढे सरकतो आहे असे समजल्यावर हळूच रस्त्याच्या कडेला उभे असणाऱ्या आजुबाजुच्या बघ्यांमध्ये सामील होणारे किंवा त्या मागच्या झाडीमध्ये लपून बसणारे, गांधी आमरण उपोषणाला बसले की त्यांच्या तंबूत काहीकाळ आपण देखील उपोषणाला बसलो आहोत असा आव आणणारे पण धोतराच्या वळचणीला बायकोने दिलेला नागलीचा लाडू लपविणारे, जेपींच्या चळवळीत गल्ली बोळातून हातात झेंडा घेऊन बिल्ले लावून फिरणारे पण आणिबाणी पुकारल्यावर घरी बायकोला सांडगे पापड बनवायला मदत करणारे, मोरारजीभाईंना खुर्चीवर बसवून सत्तेच्या जवळपास गेले पण ज्या साठी एकत्र आलो त्या संकल्पाशी प्रामाणिक न राहता सत्ता गमवायला भाग पडणारे, नंतर मात्र फक्त घरी बसून राहिलेले आणि संध्याकाळी घरी आल्यावर विजार घालताना बायकोला फर्मास शिरा करण्याचे फर्मान सोडणारे ते सगळे असे तेच ! मग लिंबाचे लोणचे खोचलेला शिरा मिटक्या मारत खात "एक दिवस हा देश विकणार लेकाचा" "हे लोक घातक" "ते ही घातक" "शिक्षणाची फार दुरावस्था झाली आहे" "मंदिर काय लेको शाळा किंवा हॉस्पिटल बांधा म्हणावं तिथे" "शेवटी हे निधर्मी राष्ट्र आहे म्हणावं..... " अशी रोज एक दोन वाक्ये बायकोसमोर आरामखुर्चीत बसून टाकणारे ! पुढे फेसबुक व्हॉट्सऍप आल्यावर साने गुरुजी, गांधी, विनोबा इत्यादींच्या जयंत्यांना त्यांच्या विषयी फोटोसह पोस्टी टाकणारे आणि उर्वरित दिवसात विचारधन गुरुजी मोदी यांची टिंगल टवाळी करणाऱ्या पोस्टी फॉरवर्ड करणारे....! . यांचा ना समाजाला कधी उपयोग झाला ना या जमातींनी कधी काही करण्याची तसदी घेतली. संघटीत होऊन समाजासाठी भरीव काही केल्याचे दाखले भारतीय इतिहासात सापडतात का बघाना ! यांना साधे संघटीत देखील होता आले नाही, रचनात्मक काही काम उभे करणे तर दूरच राहिले. एकोणीसशे पन्नास सालापासून संघाच्या नावाने सतत खडे फोडणाऱ्या या फुटकळ लोकांनी पर्यायी व्यवस्था का उभी केली नाही ? एखादी ग्राम पंचायत तरी स्वतःच्या तत्वावर उभा केलेल्या पक्षाच्या जोरावर यांना कधी घेता आली आहे काय ? माफीवीर, तडीपार, हिटलर अशी गलिच्छ टीका टिपण्णी करण्याव्यतिरिक्त या लोकांनी काय केलं आपल्या देशात आजवर ? फक्त आणि फक्त ढोंग आणि ते करत संघाला बदनाम करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधणे. बस्स. हिंदू मुस्लिम अशी फूट पाडण्याचे आणि ती पाडून संघाला बदनाम करण्याचे डाव सातत्याने हे लोक खेळत आले. आपण काही करू शकलो नाही याचे वैफल्य पदरी होतेच पण संघ दिसामाजी वाढतो आहे याची चरफड देखील. याच मुळे या तमाम जनतेने या देशात मुस्लिम समाजाला संघाविरुद्ध फितविण्याचे सातत्याने प्रयत्न केले. अर्थात संपूर्ण मुस्लिम समाजावर किंवा ख्रिस्ती समाजावर प्रभाव उत्पन्न करण्याची क्षमता आणि लायकी यांच्याकडे कधीच नव्हती. त्यामुळे संघाला बदनाम करण्याचे यांचे प्रयत्त्न कधीच यशस्वी होऊ शकले नाहीत ना कोणत्या धर्मियांनी यांच्या आवईला कधी भीक घातली. कालचे भूमीपूजन झाल्यावर देशभरात पसरलेल्या समाधानाने आणि शांततेने हे दाखवून दिले की यांचे समाजात दुफळी माजविण्याचे गेल्या सत्तर वर्षातले प्रयत्न उध्वस्त झाले आहेत. यांना प्रश्न असा पडला असेल की आता काय करायचे ? नेहरू तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रबाबूंवर सोमनाथच्या जीर्णोद्धार समारंभाला गेले म्हणून उखडले होते. आपले राष्ट्र निधर्मी असल्यामुळे आपल्यापैकी कुणी अशा समारंभांना जाणे हा गुन्हा आहे असे नेहरूंचे म्हणणे होते. इथे तर चक्क पंतप्रधान आणि सरसंघचालक यांच्या नावाने निमंत्रण पत्रिकाच छापली असे नव्हे तर दोघांनी एकत्रित एका मंदिराचे भूमिपूजन केले ! त्या समस्त पुरोगामी लिबरल इत्यादी लोकांनी आता काय स्वतःला उलटे टांगून मिरचीची धुरी लावून घ्यायची काय ??? सत्तर वर्षाच्या षडयंत्राचा असा खेळखंडोबा झाल्यावर आता पुढे काय आणि कसे करायचे या विवंचनेत असतील मंडळी. त्यामुळे गेल्या दोनचार दिवसात फारशा पोस्टी नाहीत. हिंदू मुस्लिम या विषयात तंटे दंगे धोपे झाले नाहीत तर प्रश्न या जमातींच्या अस्तित्वाचा आहे !!! @सुधीर मुतालीक

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 26975 views

💬 प्रतिसाद (74)
G
Gk Sat, 08/08/2020 - 15:22 नवीन
2 किलो तांदूळ दे , भिकार्याना मिठी मार अन हो मदर तेरेसा अन घे नोबेल पारितोषिक हिंदूंना कोण अडवले आहे ?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 08/08/2020 - 18:59 नवीन
Gk, प्रश्न समर्पक आहे. हिंदूंना कोणीही अडवलं नाहीये. हिंदुधर्माचा प्रसार व प्रचार आम्ही करणारंच. धन्यवाद! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
G
Gk Sat, 08/08/2020 - 19:03 नवीन
इंग्लण्डात राहून इंग्लंडच्या राणीला हिंदू करा शुभेच्छा
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 08/08/2020 - 19:32 नवीन
Gk, मल्टीकल्चरालिझम आणल्याने ती झालीच आहे हिंदू. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sun, 08/09/2020 - 01:33 नवीन
तुमच्या या प्रतिक्रियेतच उत्तर आहे - असली भडभुंजेगिरी हिंदूंना करायची नाहीये - आणि मुळातच "दुसऱ्यांना आपल्यात धर्मांतर करून आणले तरच त्यांना मोक्ष वैगरे मिळेल" असली समजूत हिंदूंची नाही (कि जी ख्रिस्ती आणि इस्लाम ची आहे ) अर्थात याचा अर्थ असा होतो का कि हिंदूंनी आपले धर्मांतर होत असेल तर गप्पा बसावे? असो... जिके आपल्याला नक्की काय म्हणायचेय / नक्की कसला विरोध हे ज्या दिवशी कळेल तो दिवस "सोनियाचा" ! ( नो पन इंटेंडेड ) असा म्हण्यायचा कारण असा कि मुद्दा सापडला नाही कि "इंग्लडात राणीला हिंदू करा" असली व्यक्तवे सुचतात !
  • Log in or register to post comments
G
Gk Sun, 08/09/2020 - 04:40 नवीन
ते इंग्लंडमध्ये असतात , म्हणून त्यांना अधून मधून गमतीने तसे बोलतो
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Fri, 08/07/2020 - 15:26 नवीन
तुम्हाला न आवडणारी लोकं काय करतात हे बाजूला ठेवा. तुम्ही ह्या शब्दांसमोर स्युडो शब्द लावता, तोही बाजूला ठेवा. (स्युडो न होणे हा पर्याय व्यक्तिगतरीत्या तुम्हाला उपलब्ध आहे, म्हणून. इतरांच्या ऐवजी तुम्ही काय विचार करता, ह्याची उत्सुकता आहे.) काय व्याख्या निघेल ? आणि ह्या गोष्टी नाहीत, तर तुम्ही स्वतःला काय म्हणाल ? जेन्युईन प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
स
सुधीर मुतालीक Fri, 08/07/2020 - 19:02 नवीन
आता मात्र तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता निर्माण झालीय हं ! काय हो काय म्हणायचं आहे तुम्हाला ???
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 08/08/2020 - 05:27 नवीन
इथले ढोंगी लोकांचा खरा चेहरा दाखवला तुम्ही. पुरोगामी शब्दाला बदनाम केले इथल्या ढोंगी लोकांनी.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 08/08/2020 - 12:29 नवीन
लेख खुप आवडला !! काही लोकांची जाम जळ्ळी !!
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Sat, 08/08/2020 - 16:28 नवीन
आवडला
  • Log in or register to post comments
G
Gk Sun, 08/09/2020 - 04:42 नवीन
अयोध्या भूमीपूजनाच्या खड्ड्याचे फोटो आहेत का ? त्यात 3 गाठोडी पुरली म्हणे , एक निळे , एक पांढरे , एक हिरवे खरे आहे का ?
  • Log in or register to post comments
G
Gk Sun, 08/09/2020 - 04:51 नवीन
Image removed. https://youtu.be/-Q-6MZJp2rU
  • Log in or register to post comments
G
Gk Sun, 08/09/2020 - 05:02 नवीन
निळे , पांढरे , हिरवे खड्ड्यात आणि वर सर्वत्र भगवी पिवळी वस्त्रे विलसत आहेत , अहाहा , किती मनोहारी दृश्य ते !
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 08/09/2020 - 06:07 नवीन
भारतीय राज्य घटने प्रमाणे स्थापित सर्वोच्च न्यायलया नी निवडा केल्या नंतर सुद्धा त्या निवड्या वर अविश्वास दाखवणे हे राज्य घटनेवर अविश्वास दाखवण्या सारखे आहे. तुमचा न्यायालय वर विश्वास नाही,सरकार वर विश्वास नाही,इतिहास वर विश्वास नाही,ज्या जाणकार व्यक्ती नी पुराव्याचे विश्लेषण करून काही निष्कर्ष काढले आहेत त्या वर विश्वास . मग विश्वास कशावर आहे. झुंडशाही वर. एकदा निवडा झाल्या नंतर निळे,हिरवे, खडय्यात आहेत हे वाक्य कस काय lihle जाते. मी च शाहणा बाकी सर्व मूर्ख ही आपल्या येथील ढोंगी,हिंदू द्वेशी पुरोगामी चे ठळक वैशिष्ट्ये आहे.
  • Log in or register to post comments
G
Gk Sun, 08/09/2020 - 06:09 नवीन
मी फक्त चित्राचे वर्णन केले आहे.
  • Log in or register to post comments
G
Gk Sun, 08/09/2020 - 10:09 नवीन
त्यात अजून 2 गाठोडी आहेत एक पांढरे , एक काळे पंचमहाभूते आहेत म्हणे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 08/10/2020 - 06:50 नवीन
हायला तुम्हाला खरंच आनंद झालाय? काय म्हणताय? मग तुम्ही पण भगवी वस्त्रे केंव्हा नेसताय?
  • Log in or register to post comments
द
दिगोचि Sun, 08/09/2020 - 06:31 नवीन
इंग्लंडच्या राणीला हिंदू करा असे जे म्हणतात त्याना एक माहित नसावे (कदचित मुद्दाम पण अव्हान देत असतील) की हिन्दु धर्मात इतरान्चे धर्मान्तर कसे करावे हे सान्गितलेले नाही. म्हणुन हिन्दु धर्म बाहेर पसरला नाही.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 08/09/2020 - 06:42 नवीन
सक्ती नी धर्मांतर करणे, लालच देवून धर्मांतर कर,मदतीच्या बदल्यात धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडणे हे सर्व गैर मार्ग आहेत.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 08/09/2020 - 08:35 नवीन
धर्म पाळणारी लोक पर धर्मावर टीका करत असतात हे एक वेळ समजू शकतो पण धर्म न पाळणारी निधर्मी लोक हिंदू धर्मा वर टीका करतात हे समजणे अवघड आहे. हे पण घोड्याचा पाय गाढवाला लावून समजून घेता येईल . पण अत्यंत द्वेष पूर्वक अत्यंत नीच पातळीवर जावून हिंदू धर्मावर हे निधर्मी का टीका करतात हे मात्र समजत नाही. अगदी कट्टर मुस्लिम किंवा कट्टर ख्रिश्नांच्या कडून सुद्धा तेवढ्या नीच पातळीवर जावून टीका होत नाही.(मी कट्टर हा शब्द वापरला आहे धर्मांतरित लोक म्हणजे कट्टर धार्मिक नाहीत ते संधी साधू आहेत)
  • Log in or register to post comments
G
Gk Sun, 08/09/2020 - 09:43 नवीन
सलवारीचे रक्षण अन दोन किलो तांदूळ ना ? जे तुम्ही देऊ शकला नाहीत. मग आता जे उरले आहे , त्यांच्याबरोबर आनंदाने राहा. इंग्लडची राणी हे मी उपहासाने बोललो नाही , तेच बोलले हिंदूंना हिंदू विचार प्रसारित करण्यास कुणी अडवले नाही , म्हणून मी बोलले , शुभेच्छा जर येणार असतील कुणी तांडळासाठी , तर त्यांनाही घ्याच की , जत्रा म्हटले की हौसे गवसे नवसे सगळे येणार , शिवाय भक्तीचेही 4 प्रकार तुमच्याच बुकात छापलेत , आर्त, जिज्ञासु, अर्थार्थी और ज्ञानी- ये चार प्रकार के भक्त मेरा भजन किया करते हैं। इनमें से सबसे निम्न श्रेणी का भक्त अर्थार्थी है। उससे श्रेष्ठ आर्त, आर्त से श्रेष्ठ जिज्ञासु, और जिज्ञासु से भी श्रेष्ठ ज्ञानी है। असे असले तरी मला सगळेच प्रिय आहेत , असे लिवले आहे म्हणे त्यामुळे तांदळासाठी आले तरी घ्या, सगळेच काय मोदी योगी नसतील ना ? तांदळासाठी काँग्रेसमधून भाजपात येणारेही घेताच ना ? आणि सगळ्यांना कमळ एकच छाप लावता ना , तसेच.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 08/10/2020 - 06:52 नवीन
धर्मांध आणि निधर्मांध (यात कम्युनिस्ट फुरोगामी बुद्धिवादी इ सर्व येतात) तितकेच कडवट आणि असहिष्णू असतात.
  • Log in or register to post comments
म
माझा_डूआइडी Sun, 08/09/2020 - 11:48 नवीन
जगभरात मुस्लिमांची जनसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गैरमुस्लिमांना त्यांची जनसंख्या वाढवायला कोण रोकले आहे? का तशी क्क्षमता नाही त्यांच्यात?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 19 hours ago
  • सुंदर !!
    6 days 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा