Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

झोका

म — मी-दिपाली, Tue, 07/28/2020 - 16:13

उंच उंच झोका जाई 
निळ्या आभाळात ।
फिरी येता गोळा होई 
जीव काळजात ॥१॥

शैशवात वाटे येई 
कवेत आकाश ।
पाय लागता भुईस 
कळे तो आभास ॥२॥

घेत झेप याैवनात 
जमिनीस सोडी ।
वाऱ्यास जाई कापीत 
गगनास जोडी ॥३॥

कुरकुर ही कड्यांची 
आताशा जराशी ।
संधीकाली विसावली 
लय पश्चिमेशी ॥४॥

त्रिकालातुनी विहार 
हिंदोळा घडवी ।
अन् राधेची कृष्णावर
प्रीतही जडवी ॥५॥

.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6966 views

💬 प्रतिसाद
म
मन्या ऽ Wed, 07/29/2020 - 08:14 नवीन
वाह...
  • Log in or register to post comments
म
मी-दिपाली Fri, 07/31/2020 - 07:06 नवीन
धन्यवाद _/\_
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 07/29/2020 - 12:17 नवीन
फोटोसहित शब्द छान वाटले
  • Log in or register to post comments
म
मी-दिपाली Fri, 07/31/2020 - 07:06 नवीन
धन्यवाद _/\_
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 07/29/2020 - 12:45 नवीन
खुप सुंदर रचली आहे.आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर झोक्यावर झुलण... सुंदरच
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/29/2020 - 13:17 नवीन
खुप सुंदर रचली आहे.आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर झोक्यावर झुलण
सेम असेच बोलतो. लिहिते राहा. कविता आवडली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 07/29/2020 - 13:48 नवीन
मी तर गुणगणली खुप वेळा.. मस्तच लिहिलंय
  • Log in or register to post comments
म
मी-दिपाली Fri, 07/31/2020 - 07:05 नवीन
धन्यवाद _/\_ घाल घाल पिंगा वार्‍या या गाण्याची चाल चपखल बसते.
  • Log in or register to post comments
म
मी-दिपाली Fri, 07/31/2020 - 07:05 नवीन
धन्यवाद _/\_
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 08/01/2020 - 22:55 नवीन
शैशवात वाटे येई कवेत आकाश । पाय लागता भुईस कळे तो आभास ॥२॥
ह्या पंक्ती फार आवडल्या.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 08/05/2020 - 13:53 नवीन
फारच सुंदर!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 08/06/2020 - 13:06 नवीन
सुंदर...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Avrodh – The Siege Within | SonyLIV Originals |
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Fri, 08/07/2020 - 10:51 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
प
पियुशा Sat, 08/08/2020 - 08:57 नवीन
तुझ्या कवितमुळे काव्य विभागाला 4 चाँद लागले:)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा