Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

शेतकरी आमचा बाप कधी राहिल टिपटाप ?

अ — अनिल चव्हाण रामपुरीकर, Tue, 07/28/2020 - 09:45
आज सगळ जग डेवलप होतय , इमान अण राकेटात बसुण आभालाळा गवसणी घालतय , अशा या बदलत्या काळात रात्रीचं पण येगळच विश्व सुरू होतय | तरी माझा शेतकरी बाप अजुन मातीतच घाम गाळतोय , रात्रीच पाणी द्यायला इच्चुकाड्याची सोबत घेतोय, दिवसा ना त्याला उन्हाचा ताप ना रात्रीची त्याला झोप || असा हा आमचा शेतकरी बाप कधी राहिल टिपटाप ? मोठाले याप‍री ब्यांकीची हाजारो कोटी बुडवतात, देश सोडुन पळुन जातात न देश खड्ड्यात घालुन मजा मारतात | पन बी अन् खतासाठी घेतलेले पन्नास हाजार न ‌फेडता आल्या मुळे तो स्वाभीमानी घेतो गळफास, || त्याला होती एकच आस माझ पिक येईन खास , अन् सार्या जगाच्या पोटात जाईल सुखाचा घास | आज तोच झाला खाक अन् त्याची स्वप्न झाली राख, आज पोर त्याच पोरक कोण देईल त्याला खुराक || पाणी नव्हत त्याच्या आडात तरी शेती केली जोमात, शेवटी अवकाळी आला अन् तोंडातला घास घेउन गेला, हाच तो सुखाचा घास नाही आज त्याच्या पोराच्या पोटात | त्याच्या या पोराला आता कोण देइल पाठीवर थाप, असा हा शेतकरी बाप कधी राहिला नाही टिपटाप || टिप : ही कविता मा.बो. वर आधिच प्रकशित आहे , अनिथ या माझ्याच आय डी ने. धन्यवाद.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 30155 views

💬 प्रतिसाद
अ
अभ्या.. Tue, 07/28/2020 - 10:38 नवीन
तुम्हाला अधिकारच नाहिये अशा कविता लिहिण्याचा आन रडगाणे गाण्याचा. तुम्ही आकडा टाकून वीज घेता. तुम्ही वारेमाप खर्च करुन लग्न समारंभे करता. कुठलाच टॅक्स न देता स्कॉर्पिओतून फिरता. व्यापार जमत नाही म्हणून आडत्याला शरण जाता आणि भाव मिळत नाही म्हणून बोंबलता. आडती लोक शहरी लोकांना जास्त भावात विकून कमावतात म्हणून विव्हळता. शहरी लोक तुमच्या हितासाठी त्यांची सगळी कर्जे विनामाफीची फेडून वर सगळे टॅक्स भरुन तुमच्या हितासाठी धडपडतात तर त्यांच्याच नावाने ओरडता. शहरी लोक इतक्या प्रेमाने अ‍ॅग्रो पर्यटनाला येतात तर तिथेही तुम्ही त्यांना नाडता. भाव मिळत नाही म्हनून कांदा, टमाटे आणि दूध रस्त्यावर ओतायचा माजुरडे पणा करता. तुम्हाला पिक, जमीन, भाव, बाजार, शिक्षण, घर ह्या कशातलेच व्यवस्थापन जमत नाही तरीही शेत सोडवत नाही आणि ते दुसर्‍यालाही घेऊ न देता रडता. राजकारण्यांना एकगट्ठा मताची लालूच दाखवून पिकविमा, कर्जमाफी, विज्बिलमाफी, सवलती अशा गोष्टी पदरात पाडून घेऊन परत तडफड करता. . .तुम्हाला अधिकारच नाहिये अशा कविता लिहिण्याचा आन रडगाणे गाण्याचा.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 07/28/2020 - 10:55 नवीन
+१ अभ्याशेठ , परखड आणि सुस्पष्ट प्रतिसाद ! आता बाकी काही बोलायची गरजच नाही !!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 07/28/2020 - 11:29 नवीन
आता बाकी काही बोलायची गरजच नाही !! त्यासाठीच दिलाय तो प्रतिसाद
  • Log in or register to post comments
अ
अनिल चव्हाण रा… गुरुवार, 07/30/2020 - 13:00 नवीन
आधी माझ्या प्रश्नाची उत्तरे द्या मग ठरवु काही बोलायची गरज आहे का नाही ते. @मार्कस्_ऑरेलियस
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/30/2020 - 20:27 नवीन
कशाला करताय इतकी तोट्यातली शेती , फुंकुन टाका जमीन अन मस्त शहरात जाऊन राव्हा ना , मस्त फॉर्चुनर घ्या , "पनवेल"ला जाऊन पैसे उडवा ! पैसे गेले तरी चालतील पण खेळ झाला पाहिजे =)))) तुमची शेतजमीन विकायची असल्यास लोकेशन , क्वोट आणि मोबाईल नंबर सांगा.
  • Log in or register to post comments
अ
अनिल चव्हाण रा… Fri, 07/31/2020 - 13:49 नवीन
,, तुमच्या भाषेत रिअल इस्टेट एजंट ,, असाल तर मग दुसर काय अपेक्षित असनार
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 08/03/2020 - 08:56 नवीन
तुम्ही एकदा ठरवा हो नक्की की तुम्हाला काय पाहिजे - टापटीप राहायचं आहे की संपूर्ण भारत देशावरील जनतेवर "उपकार" करत तोट्यात चाललेली शेती करायची आहे ? तुमची शेती तोट्यात चालली असेल तर बुडीतखाती कंपनीचे जसे वाल्युएशन करतात तसे आपण तुमच्या बुडीत शेतजमिनीचे वाल्युएशन करू, बाकीचे लिव्हरेज बायआउट कसे करायचे ह्याचे मी प्लॅंनिंग करतो . तुम्हाला ह्याला काय म्हणयाचें ते म्हणा, तुम्ही दलाल म्हणा मी इन्व्हेस्टमेंट बँकिंग म्हणतो , हायकायनायकाय. एकदा तुमचा निर्णय झाला की कळवा मग आपण डायरेक्ट बोलू की! तुमच्या हाती एकरकमी पैसा पडेल , मग राव्हा की टिपटॉप !!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 08/03/2020 - 08:56 नवीन
तुम्ही एकदा ठरवा हो नक्की की तुम्हाला काय पाहिजे - टापटीप राहायचं आहे की संपूर्ण भारत देशावरील जनतेवर "उपकार" करत तोट्यात चाललेली शेती करायची आहे ? तुमची शेती तोट्यात चालली असेल तर बुडीतखाती कंपनीचे जसे वाल्युएशन करतात तसे आपण तुमच्या बुडीत शेतजमिनीचे वाल्युएशन करू, बाकीचे लिव्हरेज बायआउट कसे करायचे ह्याचे मी प्लॅंनिंग करतो . तुम्हाला ह्याला काय म्हणयाचें ते म्हणा, तुम्ही दलाल म्हणा मी इन्व्हेस्टमेंट बँकिंग म्हणतो , हायकायनायकाय. एकदा तुमचा निर्णय झाला की कळवा मग आपण डायरेक्ट बोलू की! तुमच्या हाती एकरकमी पैसा पडेल , मग राव्हा की टिपटॉप !!
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Tue, 07/28/2020 - 19:18 नवीन
तसेच आक्रस्ताळ्या प्रतिसादाशीही सहमत नाही. प्रथम शेतीविषयक त्रुटींविषयी जाणून घेऊ: शेतकऱ्यांनी त्यांचं जीवनमान बदलवून टाकणारी सहकार पद्धत गैरव्यवहार आणि राजकारण यामुळे पूरती मोडकळीस आणली. एके काळी सहकारी क्षेत्राने निव्वळ शेतीच नाही तर शेतीपूरक व्यवसाय जसे सूत गिरणी, मद्यार्क, वीज इ. क्षेत्रात पाय रोवले होते. महाराष्ट्रात तर सहकार क्षेत्राने अपना बाजार, अभियांत्रिकी, पेट्रोल पंप, असे नवनवीन क्षेत्रात जम बसविण्यास सुरुवात केली. आज तेच सहकार क्षेत्र जेमतेम शेतीपुरते टिकून आहे. सहकारी पध्धतीने शीतगृहांची निर्मिती, पुरवठ्याच्या नियंत्रातून बाजार भावाचे नियोजन, सामुदायिक रित्या ठरवलेली पीक पद्धत ज्यात सर्वच शेतकरी एकच एक उत्पादन घेण्याऐवजी भिशी पध्धतीने उत्पादन घेतील अश्या अनेक कल्पक गोष्टी करू शकतात. आता प्रतिसाद देणार्यांकडे वळु. प्रथम आकडा टाकण्याची चैन असणारे, स्कॉर्पियोतून फिरणारे, सोन्याचा गोफ घालणारे, लग्न कार्यात मोठा खर्च करणारे शेतकरी फक्त मोठ्या शहरांच्या आजूबाजूला बागायती शेती करणारे असतात. निवडणुकीच्या वेळेस होडीतून जाणारे, डोंगर चढून जाणाऱ्या अधिकाऱ्यांचे जे फोटो येतात ना अशा दुर्गम भागात गरीब आणि जिरायती शेती करणारा शेतकरी असतो. आणि बागायतीचं जरी म्हणाल तरी खालील गोष्टींचा विचार करा आणि आपला प्रतिसाद किती उथळ होता ते बघा:
  • शेतकरी नुकताच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जोखडातून मुक्त झाला आणि कोरोनाच्या फेऱ्यात अडकला. यात कांदा उत्पादक शेतकरी पूर्णतः फायद्यापासून दुरावला. याला कांदा निर्यातीवरील बंदीही कारणीभूत आहे.
  • शेतकऱ्यांना कृषी माल हवा त्याला विकता येणं हि एक प्रकारे अडत व्यवसायाचीच सुधारित आवृत्ती आहे. म्हणजे त्यात किमान हमी भावाची शाश्वती नाहीच.
  • अजून एक. नुसती कल्पना करून बघा. तुम्हाला काही कारणाने तुमची मिळकत विकायची आहे आणि तुम्हाला कळतं कि सरकारने त्यावर आरक्षण टाकलं आहे. ती जी कळ उमटेल ना काळजात ती शेतकऱ्याच्या पाचवीला पुजलेली असते.
  • Log in or register to post comments
अ
अनिल चव्हाण रा… गुरुवार, 07/30/2020 - 12:54 नवीन
आता तुमचे सर्व मुद्दे खोडुन काडतो ,, १ आकडे ,,,, एक वेळेस सर्च करा महाराष्ट्रातील किती शेती सिन्चन क्षेत्रात येते न किती कोरड वाहु आहे,,, अर्धवट माहीती धोक्याची असते, जिथे विज नाही, आली तरिही फिक्स टाइम नाही,, राहाता राहिला प्रश्न आकड्यचा आता नियम बदलले आहेत कोणी ही विज चोरु शकत नाही ,, काहि जण चोरत असतील तर अस नाही ना की सर्वच जण चोरत असतिल,,, आणि जर तस असेल तर शहरात राहणारे सर्व जण श्रिमंत पाहिजेत ना मग कशाला लोकल ने प्रवास करता, भाड्याच्या घरात राहाता बी एम ड्ब्लु घेउन फिरा ना सर्व,,,, आता २. लग्न खर्च ,,, तुमच लग्न झालय का ,, झाल असेल तर तुम्ही कोर्ट marriage केल आहे का ??? नसेल तर का नाही केल,, आणि लग्न नसेल केल तर का नाहि करनार???????, का कमी पना वाट्तो ????? ,,,, आता ३ टॅक्स ,, इ बूड्बक ,, अभि नये कानुन के हिसाब से ५,००,००० के उपर वालो को भी टॅक्स देना होगा ,, जे एका सामान्य शेतकर्‍याच (२-३ एकर वाले) ३-४ वर्षाच पन उतपन्न नसत.,,, आता स्काॅर्पिओ त्याला तुम्ही घेउन दिली काय???? ४ .. हे मात्र अती झाल जो जगाला जगवतो त्याला व्यापार शिकवणार तुम्ही ,, अरे बाबा त्याला वेळ कुठाय ,, एक महिन्यात २-४ वेळा खुरपण एक दोन वेळा पाळी टाकावी लागते,, ति काय तुम्ही करुण देनार???? कधी केलय का हे काम ऐकुन तरि आहात का,, हे आस असत म्हनुण, ,, आता भाव सोडुन द्या कशाला माझ तोंड उघडता, शिक्षका चा पगार at the time of independence and now or ( today ),,, n the cost of food grains at the time of independence and now,, you will find a huge difference about 400 times ,, हे लिहीनारा पण एक शेतकरीच आहे म्हनुण ते शिक्षण न बाकी उपदेशाचे डोस देउ नका,,.,,! आणि टॅक्स भरता म्हनुन ऊडु नका तुम्हाल इनकम रिटर्न मिळत,, तुमच्य टॅक्स पेक्षा जास्त बियान अन खत जमिनीत ओततो जे येइल का नाही ग्यारन्टी नसते,, घेतली का कधी असली रिस्क ,, ओतले का कधी हजरो रुपये जमिनीत???? आले मोठे व्यापार अन् भाव शिकवायला. ओय!!!!! AGRO पर्यटन ,,, शहरी च नाही जगातील कोणाताही व्यक्ती जर सहज म्हनुण शेतात आला तर आम्ही असेल तो रानमेवा खाउ घातल्या शिवाय त्याला जाउ देत नाही ,, त्याला काहि त्रास असेल तर मुक्काम करायला लावतो. Without expecting and accepting a single penny from him/them,, can u do that ,,???????. रात्री कोणी बेल वाजवली तर पोलिस स्टेशन ला कॉल करनारे, आम्हाला म्हणता आम्ही शहरी लोकांवर ओरडतो,,, खोटा आरोप करता,,, वाह् रे वाह !!!! ५ .. भाव नाहि मिळाला तर travel expenses and wages देउ शकु एवढ पण उतपन्न नाहि निघत,, मग तुम्हि देनार का ते पैसै??. काय जोक करता राव ६,,,६ अन हे व्यवस्थापन कुठुन आनल, असु देत,, एक महिन्याचा ५०,००० पगार लेट झाला तर बजेट बिघडल अन् घर खर्च कमी करनारे,,, तुम्ही जो ५०,००० सहज जमिनीत ओततो अन १,००,००त वर्ष काढतो एखद्या एम बी ए ला लाजवेल अस व्यस्थापन करतो,, त्याला मॅनेजमेंट येत नाही अस म्हनता.... कमाल !!! ,, ७ आता मात्र संयम संपला,, लाज वाट्ते का काळी आई विक म्हणायला,,, जर असाच विचार करून सगळ्यांनी जमीनी विकल्या तर खाणार काय ?????? ,., ८ ... ओ राजकारणी ,, पिक विमा, कर्ज माफी ४-५ वर्षाला एकदा होते,, दररोज नाही.. ,, अन आताच तर म्हनालात आकडे टाकतो,, तरिहि विजबिल माफी घुसवली ,, तरिही सांगतो. आम्हाला फक्त ३-५ ₹ पर युनिट बिल ,, म्हणजे ५०० ₹ पण बिल येत नाही ,, मग आम्ही कधी माफी मागितली, उलट आता लॉकडाउन मधे बिल माफी कोण मागतय.,, ज्या शेतकर्‍याच्या शेतात पाणी नाही मोटर नाही ते पण मागतात का हो विजबिल माफी????? हे सर्व फक्त तुम्हालाच ,, तुमच्या बाल बुद्धीची किव येते.. तुम्हाला कोणी अधिकार दिला , शितावरुन भाताची परिक्षा करायला. आधि नांगरट न पाळी मधला फरक सांगा.,,, उचलली जिभ न लावली टाळाला.. टिप : हे सर्व फक्त @अभ्या.. साठी बाकी शहर वासिय अन ग्रामिण लोकांनी जास्त मनावर घेउ नये ,, घेतल्यास मी जबाबदार नाही. Last but not least ,, Don't talk about anything until and unless you have therotical as well as practical knowledge or experience about it. by अनिथ. बाकी टायपिंग मिस्टेक असतिल तर जाउ देत.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 07/30/2020 - 14:18 नवीन
हे सर्व फक्त @अभ्या.. साठी बाकी शहर वासिय अन ग्रामिण लोकांनी जास्त मनावर घेउ नये ,, घेतल्यास मी जबाबदार नाही.
असे का म्हणून? मी विचारलेले कधी ऐकले नाहि ह्याआधी कुणाकडून? कशामुळे आली ही परिस्थिती? आणि मी सोडून इतरांनी मनावर घेऊ नये असे का म्हणून? घेऊ दे की मनावर. जबाबदारी पण घ्यावी मनावर घेतल्याची. कशाला घाबरायचे.. सल काय आहे ते कळले पण त्याची उकल कुणी करायची? कशी करायची? का करायची? . स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मोर्चात भाषणे ठोकल्यासारखे लिहुन काही होत नाही बळीराजा. हसण्याचा विषय नाहीये हा पण तो होतोय तुमाच्यासारखे आवेशपूर्ण पण बिनबुडाचे प्रतिसाद वाचून. . सावरा, सांभाळा
  • Log in or register to post comments
अ
अनिल चव्हाण रा… Fri, 07/31/2020 - 13:35 नवीन
आधी बघा बिनबुडाचे आरोप कोण करतय,, मनावर घ्या नका घेउ तुमचा विशय ,, फक्त हा मुद्दा शहरी / ग्रामिण न व्हावा हा हेतु होता म्हनुन तस लिहील ,,, अन् मी काही भाषण नव्हतो देत , ते तुम्ही दिल मी नाही ,,, मी फक्त कविता लिहीली , तुमचा प्रतिसाद आला मी प्रतिउत्तर दिल that's it,, आता मी दिलेल्या प्रतिसादातील प्रश्नाला उत्तर द्या नका देउ मर्जी तुमची , तसा तो तुम्ही नाही देणार हे अपेक्षितच होत , झाल हि तेच ,, उगाच विषयांतर केलत,, आता तुमचे उत्तर अन माझे प्रश्न यांचा मेळ बसत असनारा प्रतिसाद आला तरच मी रिप्लाय देइल,, , धन्यवाद.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 07/31/2020 - 16:57 नवीन
हे बघा मालक, तुमच्या कवितेत टोटल तीन प्रश्न आहेत. १) असा हा आमचा शेतकरी बाप कधी राहिल टिपटाप ? २) आज पोर त्याच पोरक कोण देईल त्याला खुराक || ३) त्याच्या या पोराला आता कोण देइल पाठीवर थाप, त्यातल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच दिलेले आहे कवितेत शेवटी. असा हा शेतकरी बाप कधी राहिला नाही टिपटाप ओके. काही हरकत नाही. माझाही बाप कधी टिपटाप राहिला नाही. अगदी माझ्या(म्हणजे माझ्या बापाच्या) शेताचा सध्याचा चालू भाव ६५ लाख प्रति एकर (फक्त शेतीसाठी, गुंठेवारीसाठी नाही) असूनही टिपटाप राहात नाही. त्यांना गरज वाटत नाही त्याची. पोरांनी टिपटाप राहावे असे वाटते त्यांना पण स्वतःच्या पोराच्या लग्नातही खांद्यावर गमजा टाकून कामे करत हिंडतील. मनुष्य स्वभाव. पिढीचा फरक, इलाज नाही. दुसरा प्रश्न पोरक्या पोराचा प्रश्न फक्त शेतकर्‍यांच्या पोरांचा नसतो. पोरका झाला तरी त्याची काळी माय शाबूत असते. नोकरदाराच्या पोरक्या पोराला अनुकंपेत नोकरी मिळायचे प्रमाण फक्त सरकारी मध्ये. खाजगीत ते ही नाही. सगळी सुरुवात नव्याने. तिसरा प्रश्न : कोण देईल थाप? अर्थात ह्याचेही उत्तर वरचेच आहे. पितृछत्र दुरावणे ही खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे. पण ती युनिव्हर्सल आहे. प्रत्येक बाप नसलेल्या पोराला बापाची कमी वाटत राहणार. त्याचा शेतकरी बाप आणि शहरी बाप असा फरक नसतो. . राहता राहिले कवितेबद्दल आणि वस्तुस्थिती बद्दल. अ‍ॅज अ कविता रचना चांगलीच आहे. काही थोडी यमके आणि शब्दरचना सोडल्यास बाकी उत्तम आहे. पण.... हि कविता म्हणजे वस्तुस्थिती आहे आणि ती प्रत्येक शेतकृयाची आहे आणि त्यातून आपण फार शेतीविषयक गंभीर प्रष्न मांडत आहोत असा आव आणत असताल तर प्लीज .... फक्त तुम्ही शेतकरी नाही आहात किंवा बाके सगळ्यांनी शेतकृयावर अन्याय केलाय आणि तरीही शेतकृयांवर आरोप करतोय असा समज कदापिहि करुन घेऊ नका. आता माझ्या प्रतिसादातले आरोप... ते निष्कर्ष आहेत गेल्या कित्येक वर्षातले प्रत्येक चर्चेतले, प्रत्येक व्यासपीठावरचे शेतीच्या कुठल्याही प्रश्नांवर काहीही लिहिले गेले तरी काढले गेलेले निष्कर्ष आहेत. मी नाही काढलेले. मी तर उद्विग्न होऊन फक्त संकलित केलेत. आतापर्यंत ते तुमच्या कधीच वाचनात आले नसतील तर तुम्हाला खरोखर मूळापासून विचार करायची फार गरज आहे. मला आदर आहे प्रत्येकच काम करणार्‍या कामगाराचा. भले तो शेतकरी असेल, जवान असेल किंवा शास्त्रज्ञ असेल. शिक्षणाचे महत्व तुम्हाला तर सांगायलाच नको. एखादा शेतकर्‍याचा मुलगा फर्डे इंग्रजितले कोटस देत जर संभाषण करत असेल त्याचे कौतुक वाटेल पण मुद्दा हरवून कसे चालेल मालक. तुम्हाला इंग्रजि मिलो हे अपमानास्पद आणि मुस्कील घडी वाटते पण त्या मिलो वर तेव्हाचा शेतकरी पण जगलाय. आज शेतीत बियाणे, खते, किटकनाशके, औजारे परदेशी कंपनीचे जर शेतकर्‍यांना चालू शकत असतील तर शहरी माणसांनी केले इंपोर्ट धान्य काय बिघडणारे. आम्ही पिकवलेच नाही तर तुम्ही खाणार काय हा खाक्या आणि तुम्ही पिकवलेच नाही तर आम्ही बाहेरुन आणू हा खाक्या दोन्ही विचारशुन्यतेचे आणि केवळ त्राग्याची विधाने आहेत. कुणाचे पूर्वज शेतकरी नव्हते आणि कोण फक्त सर्व पिढ्या शेतीच करत आले आहेत ह्याचा गंभीरपणे विचार करा तुम्हाला जाणवेल तुम्ही (म्हणजे शेतकरी) फक्त सिस्टिमचा एक भाग आहेत. असतात प्रत्येक क्षेत्राला स्वतःचे असे काही प्रॉब्लेम पण ते दुसर्‍या कुणाला स्मजणारच नाहीत असा आव आणला तर ते कधीच संपणार नाहीत. मूल लहान असले की ते फक्त रडते. आई समजून घेते त्याला भूक लागलीय का सू लागलीय का गरम होतय का थंडी वाजत्ये. जसे जसे मूल जाणते होते तसतसे त्याला काय हवेय आणि ते कसे आणि कुणाकडून मिळवायची ह्याची जाण येते. मला वाटते ह्यावरुन तुम्हास समजेल असेल काय म्हणाय्चेय ते. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
अ
अनिल चव्हाण रा… Sun, 08/02/2020 - 08:03 नवीन
या प्रतिसादाशी मी सहमत आहे,, पण मी कवितेतील प्रश्नाचे उत्तर नाही तर तुमच्या उद्विग्न होउन दिलेल्या प्रतिसादावर मी दिलेला प्रतिसादात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विचारली होती. पण असो., तुमच्या बद्द्ल झालेला गैरसमज ( तुमचा पहिला प्रतिसाद वाचुन ) दुर झाला हा प्रतिसाद वाचुन. " आम्ही पिकवलेच नाही तर तुम्ही खाणार काय हा खाक्या आणि तुम्ही पिकवलेच नाही तर आम्ही बाहेरुन आणू हा खाक्या दोन्ही विचारशुन्यतेचे आणि केवळ त्राग्याची विधाने आहेत. " हे ही पटले. खाली एका प्रतिसादात वाचले कि तिकडे जमिन ६५ लाख रुपये प्रति एकर आहे, विभाग वार किंमत बदलते,, सध्या परभणी जिल्ह्यात ६-१० लाख प्रति एकर इतकाच भाव आहे., असो. ,,,, तुमच्या भावना पोहोचल्या तुम्हाला काय म्हणायचय ते पण कळल. म्हणुन हा विषय वाढवण्यात अर्थ नाही अस मला वाटत, मी एका कर्जबाजारीपणामुळे फाशी घेतलेल्या शेतकर्‍याच्या एका मुलाची व्यथा मांडण्याचा प्रामानिक प्रयत्न केला होता, पेश्याने काही मी कवि नाही ना तुम्ही मालक म्हणाव एवढा मोठा. पण अजुनही मी तुमच्या पहिल्या प्रतिसादास असहमत ( सहमत नाही ).
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 08/02/2020 - 08:33 नवीन
१. शेतजमीनीच्या खरेदी विक्रीवरील बंधने उठवली तर हा ६-१० एकरी भाव वाढू शकेल का? २. या बंधनांचा शेतकऱ्याला खरोखरच फायदा होतोय का?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 08/02/2020 - 08:34 नवीन
१. शेतजमीनीच्या खरेदी विक्रीवरील बंधने उठवली तर हा ६५ लाख एकरी भाव वाढू शकेल का? २. या बंधनांचा शेतकऱ्याला खरोखरच फायदा होतोय का?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 07/31/2020 - 15:03 नवीन
एवढे प्रॉब्लेम आहेत तर शेती करू नका, शहरात या नोकरि करा, धंदा करा , टिप टॉप रहा
  • Log in or register to post comments
ज
जिन्क्स गुरुवार, 07/30/2020 - 18:14 नवीन
Sarcasm at its best. सलाम अभ्याशेठ. प्रतिसादाशी एकदम सहमत.
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू Fri, 07/31/2020 - 08:03 नवीन
धागालेखकाच्या भावना पोहोचल्या.
तुम्हाला अधिकारच नाहिये अशा कविता लिहिण्याचा आन रडगाणे गाण्याचा.
दुर्दैवाने, अभ्याशेठचा संपूर्ण प्रतिसाद (उपरोधिक आणि) अत्यंत वास्तवदर्शी आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 07/28/2020 - 11:23 नवीन
शेती करणे म्हणजे जुगार आहे . इथे तुम्ही किती उत्पादन घेवू शकता ह्या वर अनेक घटक कार्य करतात. काही घटक तुमच्या हातात तर काही घटकांवर तुमचे कोणतेच नियंत्रण नसते. 1), चांगले बी,मशागत, खत देणे हे तुमच्या हातात आहे पण पावसचा लहरीपणा,पिकावर पडणारी रोग राई हे आपल्या हातात नाही आणि हे घटक सर्व अंदाज चुकवू शकतात आणि उत्पादन खर्च पण निघत नाही. मजुरांची कमतरता,रस्त्यांची सुविधा,पाणी पुरवठा,विजेची उपलब्धता एक नाही असंख्य अडचणी वर मात करून जेव्हा उत्पादन बाजारात येते तेव्हा भाव नसतो. भाज्या टिकावू नसतात त्या मुळे त्या साठवता येत नाहीत त्या विकण्यासाठी साखळी ची गरज असते ती साखळी निर्माण करणे एका शेतकऱ्याला शक्य नाही तशी यंत्रणा उभी राहणे aavshakya आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनिल चव्हाण रा… गुरुवार, 07/30/2020 - 12:55 नवीन
हा हे मात्र खर
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 07/30/2020 - 13:18 नवीन
शेती करु नका , शिका आणि नोकरी करा , टिप टॉप रहा
  • Log in or register to post comments
अ
अनिल चव्हाण रा… गुरुवार, 07/30/2020 - 13:59 नवीन
सर्व शेतकर्‍यांनी जर असाच विचार केला तर मग खाणार काय ? हायब्रीड
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 07/30/2020 - 14:12 नवीन
हायब्रीड पिकवायला ही शेतकरी लागणार ना? म्हण्जे ते पीएल १८० मधला अमेरिकेतुन आलेला मिलो म्हण्जे हायब्रीड म्हणत असताल तर ती वेगळी गोश्ट. ज्यांच्यासाठी पिकवता ते विचार करेना झाले मग शेतकर्‍यांनी का करावा त्यांचा विचार? ते करतील काहीही. इंपोर्ट करतील, त्याला पैसे मोजतील. शेतकर्‍यांनी आपापल्या पोटापुरते पिकवायचे अन मजेत राहायचे. एखाद्या पोराने नोकरी करायची अन राहायचे टिपटॉप.
  • Log in or register to post comments
अ
अनिल चव्हाण रा… Fri, 07/31/2020 - 13:42 नवीन
फक्त मागच्या वर्षी ज्वारी पिकली नाही तर ६००₹ क्विंटल असनारी ज्वारी ४३००-४८०० पर्यंत गेली,, बाकि सोडुन द्या,, परत इंग्लंड वरुन डुकरांसाठीचा मिलो आणावा लागेल
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 07/31/2020 - 14:51 नवीन
शेती हा व्यवसाय आहे समाज सेवा नाही (समाजाची सेवा होते तो by-product समजा). शेती दुसऱ्यांना अन्न धान्य मिळावे म्हणून कोणी करत नाही स्वतः चा फायदा व्हावा म्हणून शेती केली जाते. शेती च नाही तर सर्वच,व्यवसाय,नोकरी माणूस स्वतः साठी करतो. कोंबडी अंड देते ती मालकाला खुश करण्यासाठी देत नाही. तसेच आहे हे. दुष्काळ ची झळ ज्यांचा शेती व्यक्तितिक्त इन्कम आहे त्यांना बसत नाही. शेतकरी,कामगार,आणि गरीब लोकांना बसते. देव करो आणि अमेरिका किंवा दुसऱ्या कोणत्या ही देशातून अन्न धान्य मागवायचे वेळ येवू नये.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 07/30/2020 - 15:42 नवीन
खायचे काय हा लोकांचा प्रॉब्लेम आहे . तुमचा प्रॉब्लेम तुम्ही सोडावा, लोक आयात करून 200₹ किलो ने खातील , तुम्हाला काय करायचंय ??
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 07/30/2020 - 14:33 नवीन
मुक्तक आवडले... शेतकऱ्यांप्रती नेहमीच आदर आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 07/30/2020 - 15:17 नवीन
खनिज तेल आयात करायला पैसे पुराणात आणि चालले अन्न धान्य आयात करायला. तेवढं विदेशी भांडार आहे का. जेव्हा इथेच काहीच उत्पादन होणार नाही तेव्हा 40 रुपये किलो गहू ,आणि 40 रुपये किलो टोमॅटो एक पण देश देणार नाही. एक आपल्या कडे दुसऱ्या देशांना देण्यासारखे काही नाही त्या अशी किंमत नाहीच जगात. शेती वर आधारित उत्पादन पिकणे बंद झाले तर दुसरे देश सांगतील तो भाव 500 रुपये किलो टोमॅटो. एक वेळेचे जेवायला तुमचा पगार किंवा जो काही इन्कम असेल तो पुरेल का. Import करू एवढं सोपं आहे का,खावू आहे काय.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 07/30/2020 - 15:49 नवीन
स्वतःच स्वतःची प्रसिद्धी करू नये.. पण अशी चर्चा आधी माझ्याच एका शेती वरच्या धाग्यावर झालीये सो येथे आता पुन्हा नाही.. पास माझा.. मूळ कवितेच्या भावना कळल्या आहेत
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 07/30/2020 - 17:04 नवीन
माणूस हा सर्वात आधी शेती करायला शिकला आणि त्याची वणवण थांबली आणि तो स्थिर झाला. आणि त्याची खरी प्रगती तेथूनच सुरू झाली. अन्न साठी वणवण फिरणे बंद झाल्या मुळे मिळालेल्या मोकळ्या वेळेचा त्याला फायदा झाला आणि नवनवीन शोध तो लावत गेला. शहर तशी नवीनच आता इंडस्ट्रियल क्रांती यूरोप मध्ये झाली आणि भारत त्यांचा अंकित देश असल्यामुळे त्याची काही फळ इथे पण उडाली. आणि खऱ्या अर्थाने शहर निर्माण होवू लागली. काही भारतीय कंपन्या मोजक्याच निर्मिती क्षेत्रात होते त्यांना देश अंतर्गत च बाजार होता. सर्वच नवीन असल्या मुळे शहर वाढू लागली . आणि खऱ्या अर्थाने नोकरी हा प्रकार चालू झाला. सरकारी नोकरांना सरकारी तिजोरी मधून पगार दिला जातो त्यांची कार्य क्षमता काय आहे. त्यांना जो भरमसाठ पगार दिला जातो तेवढं फायदा त्यांच्यावकडून मिळतो का तर बिलकुल नाही 10 percent सुद्धा रिटर्न त्यांच्या कडून मिळत नाहीत. शहर निर्माण होण्यासाठी जमीन लागते अजुन तरी अधांतरी शहर निर्माण झालेली नाहीत. ती जमीन अत्यंत कमी किमतीत जबरदस्ती नी ताब्यात घेतली जाते त्यांचे मालक शेतकरी च असतात. रस्ते निर्मिती,कारखानदारी साठी जमीन ,कमी किमतीत सरकार ताब्यात घेत ती जमीन कोणाची असते, पाणी पुरवठा करण्यासाठी धरण त्याला जमीन लागते ती कोणाची असते. जास्त विरोध न करता देशाचे कार्य म्हणून ती जमीन शेतकरी देतो. उद्या पुण्यातील अतिशय पॉश वस्ती जमीनदोस्त करून तिथे जनतेच्या हितासाठी हॉस्पिटल बांधायचे आहे म्हणून. 1000 रुपये गुंटा भरपाई देवून सरकार नी ती जमीन ताब्यात घेतली तर शहरी लोक अटॅक येवून मरतील. कोणाची ही जमीन सरकार देश हितासाठी ताब्यात घेवू शकते हाच नियम त्यांना लागू होईल. थोडक्यात शहर निर्मिती शेतकऱ्यांच्या त्यागवर झाली आहे. शेतकऱ्यांना सरळ पैस्याच्या रुपात कधीच मदत मिळत नाही. खतांची सबसिडी खतनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना दिली जाते. दूध साठी सबसिडी दूध dairy na दिली जाते. कर्ज माफी ही मागणी शेतकऱ्यांची नाही ती नेत्यांची आहे. योग्य भाव द्यावा,आणि प्राथमिक सुविधा निर्माण कराव्यात ही शेतकऱ्यांची मागणी आहे. 1 ते 2 दीन acre शेती असणार जिरायत किंवा बागायत शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पादन इन्कम टॅक्स chya कक्षात येत नाही . पण बाकी टॅक्स ते भरत असतात. नोकरदार इन्कम असूनसुद्धा सरकार ला फसवण्याचा धंधा करत असतात. व्यापारी तर त्यांचे बाप रोज लाख रुपये कमवत असले तरी कर चुकवने,वीज बिल बुडवणे,पाणी बिल बुळवणे हे bindast करतात.
  • Log in or register to post comments
ड
डॅनी ओशन Fri, 07/31/2020 - 12:45 नवीन
1 ते 2 दीन acre शेती असणार जिरायत किंवा बागायत शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पादन इन्कम टॅक्स chya कक्षात येत नाही .
एकर्सचा काहीही संबंध नसतो. कितीही शेती असली तरी पूर्ण उत्पन्न टॅक्स फ्री असते. अर्थात इनडायरेकट् टॅक्स (gst वैगेरे) अर्थातच सर्वच जण भरतात. आणि इनडायरेकट् टॅक्स टोटल कॉन्ट्रीब्युशनच्या 65% असल्यामुळे शेतकरी किंवा कमी उत्पन्नाच्या लोकांचा करभरणीतला वाटा नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखा नाही. इथे तुमचे म्हणणे 100% बरोबर. शेतकरी देशाच्या करसाठ्यात हातभार लावत नाहीत हे फसवे विधान आहे.
  • Log in or register to post comments
ब
बोलघेवडा गुरुवार, 07/30/2020 - 18:10 नवीन
एक साधा प्रश्न आहे. शेतीत इतके प्रॉब्लेम्स आहेत तर शेती विकून का टाकत नाहीत. जी मेहनत शेतीत करणार तीच मेहनत विकून आलेल्या पैशातून दुसरं काहीतरी धंदा करण्यात लावायची. कृपा करून राग मानू नये.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 07/30/2020 - 18:49 नवीन
जे जमीन विकतील ते सर्वात unlucky असतील . काही वर्षांनी इथे सर्व मिळेल पण जमीन मिळणार नाही. फ्लॅट ला काही किँमत नसेल बिल्डिंग चे आयुष्य संपलं की सर्व संपलं. ज्याची जमिनी वर मालकी तोच जगेल. बोलघेवडे 100 वर्ष नंतर आताच्या बिल्डिंग उभ्या नाही आडव्या असतील. जमीन वर असलेली 9 by 9 chi झोपडी उभी असेल.
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice गुरुवार, 07/30/2020 - 19:18 नवीन
कन्व्हेयन्स डिड नामक प्रकार , आपल्या ऐकण्या वाचण्यात आला का ? भारतीय नागरिकांची सरासरी आयुष्य वर्षे किती ? १०० वर्षे का ?
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू Fri, 07/31/2020 - 08:13 नवीन
श्री-थंड-चांगल्या-मनुष्या, प्रतिसादाच्या between the lines शी पूर्ण सहमत. काय वेळ आलीय माझ्यावर, कुणाशी सहमत होतोय ;) हघ्याहेवेसांन. रच्याक, Conveyance deed बद्धल माझा थोडा गोंधळ आहे राव. इथे किंवा स्वतंत्र, सविस्तर लिहू शकाल का?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 07/30/2020 - 19:43 नवीन
कमी व्याज दर त्या मुळे फ्लॅट चे कृत्रिम पने वाढलेले दर. फ्लॅट ची किंमत 30 लाख खरी किँमत 15 लाख . 15 लाखाचा फुगा. आता रिअल estate chi अवस्था अत्यंत खराब . फुगा फुटला नाही पण हवा गेली आहे. 40 फ्लोअर ची बिल्डिंग आहे 50 वर्षात ती पाडण्या च्या अवस्थेत येईल. फुकट घर पाहिजे असेल तर 80 फ्लोअर ची बिल्डिंग हवी . मग मोकळी जागा राहणार नाही . सरकारी नियमात बसणार नाही. आणि कोणीच पैसे गुंतवणे शक्य नाही redevelopment साठी. ते फायद्याचे ठरणार नाही.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 07/30/2020 - 20:58 नवीन
मी शेतकरी नाही उत्तम नोकरी करणारा च आहे. पण अभ्या नामक आयडी चा प्रतिसाद अत्यंत हिन दर्जाचा होता. त्यांच्या प्रतिसाद चा सत्य परिस्थिती शी काहीच संबंध नाही. असभ्य,सत्यापासून लांब जाणार,पूर्व गृह दूषित असणारा प्रतिसाद तत्काळ काढून टाकणे गरजेचे होते. प्रतेक प्रश्नांच्या दोन बाजू असतात. आपल्याला त्या मधील काहीच कळत नसेल तर ठाम मत व्यक्त करू नये. माणूस जुना सभासद आहे,काही विषयात उत्तम लेखन करतो. म्हणून चूक आहे ते बरोबर आहे अशी भूमिका नको. चुकीला माफी नसावी. ती दाखवून दिली पाहिजे अंध पने समर्थन नको.
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Fri, 07/31/2020 - 04:38 नवीन
साहेब उपहास केला त्यांनी, त्यांचे असल्या धाग्यावरचे प्रतिसाद वाचा.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 07/31/2020 - 17:08 नवीन
धनावडे साहेब नमस्कार, खरे सांगतो मालक, चीज केले तुम्ही माझ्या तुटक्या मुटक्या लिखाणाचे. मला खरेच कधी ही वाटले नव्हते की कुणी लक्षात ठेवून माझे प्रतिसाद वाचत असतील आणि त्याची नोंद ठेवून वेळेवर आठवण करुन देईल. थॅन्क्क्स अ लॉट धनावडे साहेब आणि मिपा पण. बाकी ते राजेश कुणी आहेत त्यांचे काही मनावर घ्यायचे नसते. ते मनकी बात फेम आहेत. नुसते पिंका टाकत लॉजिकलेस विधाने करत हिंडायचे एवढेच ते करतात. चर्चा नामक एक प्रकार असतो, कुणाला प्रष्न विचारला तर त्याची उत्तरे द्यायची असतात कींवा निदान माहित नसले तर गप्प वाचन करायचे असते ते त्यांना माहित नाही अजून. संजय क्षीरसागर आणि अर्धवटराव, कोहंसोहं, भागवसर अशा थोरामोठ्यांच्या चर्चेत पिंका टाकून आध्यात्म अन आस्तिकनास्तिकता शिकवण्याचे धाडस आहे ह्या आयडीचे. विचारलेल्या एकाही प्रश्नाला उत्तर मात्र देणार नाहीत. दुसरीकडे तिसरीच टेप वाजवत बसणार. ह्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मात्र उत्तरे द्यायची लोकांनी. उपहास, लॉजिक, अभ्यास, व्यासंग, शुध्द्लेखन अशा कोणत्याही गोष्टीचा दूरदूरचा संबध नसताना लोकांच्या चुकीच्या माफीची गोष्ट करतो हाच विनोद आहे. असो. पुन्हा एकदा धन्यवाद धनावडे साहेब. लोभ असु द्या
  • Log in or register to post comments
क
कांदा लिंबू Fri, 07/31/2020 - 08:04 नवीन
मला वाटतं, इतर कोणत्याही कामाप्रमाणे शेती हे एक उपजीविकेचे साधन आहे. तिला काळी माय (किंवा भौगोलिक स्थानानुसार - लाल माय, for that matter) म्हणणे, तिची पूजा करणे यात योग्य-अयोग्य असं काही नाही. व्यापारी त्याच्या गल्ल्याची, कारखानदार त्याच्या यंत्र सामुग्रीची, इडली-डोसेवाला त्याच्या गॅस-शेगडीची पूजा करतात, नाही का? पण नियंत्रणात असलेल्या-नसलेल्या कारणांनी जर धंदा चालत नसेल तर तेच लोक, तीच उपजीविकेची साधने येईल त्या भावात विकूनही टाकतात आणि कुवतीनुसार दुसरा धंदा करतात. "मी जर हा उद्योग बंद केला तर या जगाचे काय होईल" असा विचार ते करतात का? शेती जर आतबट्ट्याचा उद्योग ठरत असेल, आणि पुनःपुन्हा शेती जर आतबट्ट्याचा उद्योग ठरत आहे असा अनुभव येत असेल तर... पुढे काही लिहिण्याची गरज आहे का?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 07/31/2020 - 08:26 नवीन
जो धंधा चालत नाही तो विकून दुसरा धंधा चालू करणे हे व्यवहारिक आहे आणि योग्य पण आहे. ह्या विषयी दुमत नाही. शेती नेहमीच नुकसानी मध्ये जात असेल तर विकावी हा सल्ला योग्य दिसत असला तरी तो योग्य नाही. ह्या पृथ्वी वर तुमच्या हक्काची जमीन असावी नाहीतर राहणार,फिरणार,वावरणार कुठे. स्वतःला हवं तसे कोणतेच निर्बंध नसणार तुमच्या स्वतःच्या हक्काच्या जमिनीवर. जी लोकसंख्या वाढेल तशी कमी होत जाईल. दुसरा मुद्धा हा आहे की जमीन ही पिढ्यान् पिढ्या च्या वारसा हक्क नी मिळालेली संपत्ती आहे ती कमावलेली नाही . त्या मुळे ती विकण्याचा नैतिक अधिकार पण नाही. शेती ला पूरक व्यवसाय करू शकता,नोकरी करून शेती पण करू शकता. अनेक पर्याय आहेत. शेती ला सांभाळण्यासाठी 1 रुपयाचा खर्च नाही. ना maintance ना प्रॉपर्टी टॅक्स. पुढे भविष्यात जमिनीची कमतरता भासेल तेव्हा करोडो मध्ये किंमत असेल त्या जमिनी ची. आताच जमीन,जागा घेणे सोप राहिलेले नाही.
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Fri, 07/31/2020 - 10:34 नवीन
ह्या पृथ्वी वर तुमच्या हक्काची जमीन असावी नाहीतर राहणार,फिरणार,वावरणार कुठे. स्वतःला हवं तसे कोणतेच निर्बंध नसणार तुमच्या स्वतःच्या हक्काच्या जमिनीवर...... शेती ला सांभाळण्यासाठी 1 रुपयाचा खर्च नाही. ना maintance ना प्रॉपर्टी टॅक्स. पुढे भविष्यात जमिनीची कमतरता भासेल तेव्हा करोडो मध्ये किंमत असेल त्या जमिनी ची. आताच जमीन,जागा घेणे सोप राहिलेले नाही.
हे सगळं ठिकाय, त्यांच्या मूळ प्रश्नाचे उत्तर सुचवा प्लिज. शेतकरी टीपटाप कधी राहायला लागेल ? जमिनीचे भाव करोडो होतील, तेव्हा जमीन विकून की आणखी कश्या प्रकारे ?
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Fri, 07/31/2020 - 14:58 नवीन
कोकणात प्रामुख्याने भात शेती होते. पूर्वी दुबार असायची. म्हणजे पावसाळ्यात पावसाच्या पाण्यावर आणि उन्हाळ्यात कालव्याचे पाणी. कालवा म्हणजे घाटावर असतो तसा मोठा ओढा सदृष्य नव्हे, एका ढांगेत ओलांडता येईल इतका रुंद आणि फुट दिड फुट खोल. पुढे पुढे हे कालवे वर्षागणिक बंद होत गेले आणि काही भागात उन्हाळी भात शेती बंद झाली. तशा नद्या आहेत, बारमाही भरुन वाहणार्‍या. मात्र कोकणातील शेतकरी नदीला मोटर पंप लावून वगैरे भातशेती करण्याची तसदी घेत नाही. पूर्वी जेव्हा दुबार शेती होती तेव्हा स्वतःसाठी ठेवून धान्य उरायचे ते विकले जायचे. आता पावसाळ्यात जे पिकते ते स्वतःसाठी ठेवतात. (किंवा आपण पिकवलेला भात विकतात आणि राशनचा/दुकानातील "पालिस" केलेला तांदूळ आणतात. जिथे शहरी माणसं ब्राऊन राईस चढ्या किंमतीने विकत घेतोय तिथे हा भात उत्पादक मात्र मशीनवर डबल पॉलिश केलेला तांदूळ विकत घेतो. असो) नदीकाठी जमीन असेल तर थोडीफार भाजी पिकवली जाते. मात्र असे कष्ट घेणारा कोकणी शेतकरी गावात एखाद दुसरा. उन्हाळी जिथे कालव्याचे पाणी जात नाही मात्र नदीकिनारी शेत असेल तर शेताला ओल असते. अशावेळी कडधान्ये पेरली जातात. हे ही अपवादात्मक असते. पावसाळ्यात मात्र अंगणात, परसदारी शेताच्या बांधावर भाजीपाला उगवला जातो. आणि त्या भाजीवर पुर्ण पावसाळा साजरा होतो. शेतीला पुरक धंदा म्हणून म्हशी पाळल्या जातात. दूध विकले जाते. तो मोठा उत्पन्नाचा आधार असतो. कुठे आत्महत्या नाही, कुठे कर्जमाफी वीज बील माफी ची मागणी नाही, सावकारी व्यवसाय अस्तित्वात नाही, अडी नडीला जमीन गहाणवट टाकली जाते, मात्र ती वेळेवर सोडवलीही जाते. गहाणवट ठेवलेली जमीन हडपणारा अण्णा नाईक हा सिरियलमध्येच दिसतो. तसाही कोकणी माणूस अल्पसंतुष्ट. छानछौकी न करता आहे त्यात समाधानी राहणारा. समस्या नाहीत असं नाही, मात्र कोकणी शेतकरी रडताना, यंत्रणेपुढे हात पसरताना दिसत नाही. कर्जमाफी, वीजबिलमाफीकडे आस लावून बसत नाही. झेपेल तितकं पोराबाळांना शिकवतो, नाही झेपत तेव्हा हात जोडून म्हणतो बाबारे आता काय पुढं शिकवणं शक्य नाही. पोरगा काय ते समजून जातो आणि कोकण रेल्वेत बसून मुंबईला जातो. चार पैसे कमवतो. त्यातले दोन पैसे आई बापांना इमानदारीने पाठवतो. कोकणातील शेतकर्‍यांच्या लेकी बाळीही तशा शहाण्या. बाप शिकवेल तितकं शिकतात, शिक्षण थांबलं की मुंबईचा रस्ता धरतात. चार घरची धुणी भांडी करतात. चार पैसे गाठीला बांधतात. तेव्हढाच बापावरील लग्नाच्या खर्चाचा बोझा कमी होतो. यातील काहींना उच्च शिक्षणाचं महत्व कळतं. कुठेतरी कुणाच्या इंजिनीयर पोराला गाडीतून फिरताना एखादा शेतकरी पाहतो आणि आपल्या पोरालाही इंजिनीयर करायचं मनावर घेतो. घरातील म्हशी वाढतात, भात लावायची शेतं वाढतात. त्या पोरालाही शाळा, गुरं आणि शेती अशी तिहेरी कसरत करावी लागते. पोरगंही रक्त आटवतं, शाळेत जातं, गुरं राखतं, शेतात नांगर धरतं, डोक्यावर भाताचे भारे वाहतो. आणि एक दिवस इंजिनीयर होऊन विमानात बसून कॅलिफोर्नियाला जातं. याचं पाहून अजून चार पोर शेती गुरं ढोरं यांच्या जोडीने मन लावून अभ्यास करतात. काही बाही बनतात आणि घरी आई बापाला चार पैसे पाठवतात. राज्याच्या इतर भागातील शेतकर्‍यांनी कोकणातील शेतकर्‍यांकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 08/02/2020 - 06:10 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 07/31/2020 - 16:14 नवीन
शेतकरी हा शेतकरी असतो तो कोकणी, घाटावर चा,भारतीय,अमेरिकन असा नसतो. मनुष्य स्वभावाचा बदल असू शकतो शेतकऱ्यांचं समस्या मध्ये बदल नसतो. मध्ये मी अमेरिकन शेतकऱ्या विषयी पण वाचलं होते. त्यांना असणाऱ्या समस्या काय आहेत. शेती ची सर्वात मोठी समस्या आहे प्रक्रिया न केलेल्या शेती च्या उत्पादन ला मागणी नाही. आणि प्रक्रिया उद्योग शेतकऱ्या च्या हातात नाही. Exa बटाटा 30 रुपये किलो बटाट्याचे चिप्स 10 रुपयाला 50 ग्राम. म्हणजे 200 रुपये किलो. फळांचे भाव आणि फळा पासून बनलेले जाम किंवा बाकी पदार्थ ह्यांचे भाव फरक बघा. दुधाचे भाव 20 ते 25 रुपये लिटर (विक्री) आणि लोणी, चीझ,मावा ह्यांचे भाव. रोजच्या जीवनात आता लोक कशाला महत्व देतात. सॉस(प्रक्रिया केलेले) जाम(प्रक्रिया केलेलं) चीज ( प्रक्रिया केलेले) पिझ्झा( प्रक्रिया केलेले) चिप्स(प्रक्रिया केलेली) साखर( प्रक्रिया केलेले) ज्युस( प्रक्रिया केलेले) तेल ( प्रक्रिया केलेले) ब्रेड(प्रक्रिया केलेले) पाव( प्रक्रिया केलेले). प्रोटीन्स suppliment ( प्रक्रिया केलेले) असे अनेक प्रकार हे सर्व पदार्थ शेती मधील कच्च्या मालावर प्रक्रिया केलेले आहेत. ह्या वर उद्योगपती चे नियंत्रण आहे. प्रक्रिया न झालेले. सरळ शेतकरी विकू शकतो. दूध, डाळी,आणि भाज्या. ह्या मध्ये प्रक्रिया केलेल्या शेतीमालाला जास्त मागणी आहे हे सहज लक्षात येईल आणि हे एक कारण आहे शेती तोट्यात जाण्याचे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sun, 08/02/2020 - 16:00 नवीन
"ह्या मध्ये प्रक्रिया केलेल्या शेतीमालाला जास्त मागणी आहे हे सहज लक्षात येईल आणि हे एक कारण आहे शेती तोट्यात जाण्याचे." हा तर्क काही कळला नाही... जर प्रक्रिया केलेलं पदार्थ वाढत आहेत आणि ते मूळ शेतीच्या मालावर अवलंबून असतील तर शेतकऱ्याला घाऊक भावात अश्या उद्योगांना विकून खात्रीचे गिर्हाईक मिळतील कि.. म्हणजे मग फक्त ताजी भाजी, फळाच्या रोजच्या विक्रीवर अवलंबून राहावे लागत नसेल. म्हणजे एकूण शेतकऱ्याचा फायदाच कि फळ पिकवणारा शेतकरी २, ३ प्रकारे त्याचे उत्पादन विकू शकतो , पूर्वी फक्त बाजारात फळ म्हणून आत जॅम बनवणारे कारखाने, रस बनवून विकणारे कारखाने यांनचं कडून मागणी वाढली.. मग तक्रार काय? तोटा कसा ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 07/31/2020 - 16:23 नवीन
एक किंवा दोन एकर शेती (हि पूरक उत्पन्न नसेल तर) आतबट्ट्याचा ठरली आहे. ( लातूर भूकंपाच्या नंतर केलेले सर्वेक्षण हि गोष्ट स्पष्टपणे दाखवून देते) पूर्वी दर डोई १० एकर शेती होती तेंव्हा केवळ एक पीक घेऊन काम भागत होतं. त्यातील २ एकर शेती दर ४ वर्षांनी पडीक ठेवून परत कसायला घेत असत त्यामुळे शेतीची नापिकी होत नसे. परंतु एका शेतकऱ्याला ५ मुले झाल्यावर दर डोई शेती २ एकर झाली. यामुळे शेतीवरचा भार वाढला आणि पडीक ठेवणे शक्य झाले नाही आणि शेतीचा कस कमी होत गेला त्यातून अनेक ठिकाणी रासायनिक खते आणि अमाप पाणी देऊन त्या भागात न झेपणारी पिके ( उदा मराठवाड्यात उसाची शेती) तात्पुरत्या फायद्यासाठी घेतली गेली. यामुळे भूजल पातळी खाली गेली आणि बोअरमधून वारेमाप उपसा केल्यामुळे क्षारयुक्त पाणी येऊ लागले आणि काही काळाने मातीत अतिरिक्त क्षार झाल्याने नापिकीचे प्रमाण वाढले. एवढे असूनही लोकसंख्य दुप्पट झाली त्यामुळे बहुसंख्य शेतकरी अल्प भूधारक झाले. यामुळे येणारे उत्पन्न खाण्यासाठीच पुरत नसल्यामुळे व्यवसाय भरभराटीला येण्यासाठी त्यात गुंतवणूक होतच नाही आणि हे दुष्टचक्र चालूच राहते. एक उदाहरण देतो आहे. आमच्या लहानपणापासून पाणीपुरी विकणारा (रामानुज सिंह) भय्या आजही मिशा आणि केस पिकले तरी पाणीपुरीच विकत आहे कारण येणारा अतिरिक्त नफा तो "गाव मी भेज देता है" यामुळे त्याची स्थिती तीच राहिली आहे. याउलट माझ्या भावाची वातानुकूलन यंत्रे दुरुस्त करणारा तंत्रज्ञ (अली) याला माझ्या भावाने रोख पैसे देण्याचे साफ नाकारले. त्याला बँकेत करंट खाते उघडून दिले आणि त्यात चेक टाकायला लावला. यानंतर आपल्या मित्रांना सुद्धा सांगून त्याला रोख पैसे न देता बँकेचा चेक दिला. बँकेत चालू खाते आल्यावर त्यातून पैसे काढून "गाव मे भेजना" बंद करायला लावले यानंतर त्याला एक दुकान भाड्याने घ्यायला लावले. त्याचे व्हिजिटिंग कार्ड बनवायला लावले. हे दुकान भाड्याने घेतल्यामुळे त्याला लोकांच्या घरून वातानुकूलन यंत्र दुकानात घेऊन जाऊन दुरुस्त करणे शक्य झाले. ( अन्यथा मुंबईत घरात बायको एकटी असताना कोणीही माणूस तंत्रज्ञाला घरात काम करू देत नव्हता. हे सर्व करून त्याचे करनियोजन केल्याने त्याने गृह कर्ज घेऊन एक खोली विकत घेतली.बँकेत खाते, पॅन आणि आधार कार्ड असल्यामुले माणसाला एक पत प्राप्त झाली आणि अलीने आपले दोन भाचे आता कामावर ठेवले आहेत. भाड्याचे दुकान त्याने कर्ज काढून विकत घेतले आहे. थोडक्यात आपला व्यवसाय जर भरभराटीला आणायचा असेल तर उद्योजकतेचा मार्ग चोखाळला लागतो. उद्योजक हा चोर च आहे अशीच मनोवृत्ती सरकारी अधिकाऱ्यांची असते आणि ते उद्योजकाला नाडत असतात हा सार्वत्रिक अनुभव आहे. पण शेतकरी मात्र बळीराजा म्हणून सहानुभूतीला पात्र असतो. बहुसंख्य शेतकऱ्यांना जमीन हि वडिलोपार्जित म्हणून फुकट ( भांडवली खर्च न करता) मिळालेली आहे. दोन एकर जिरायती जमिनीची किंमत किती याचा व्यापारी हिशेब ( फुकट मिळालेले भांडवल) करणे अत्यावश्यक आहे. मी आजतागायत एकही शेतकरी गळा काढताना हि गोष्ट हिशेबात धरताना पाहिलेला नाही. ( गैरसोयीच्या गोष्टी बोलणे गैरसोयीचे असते) बहुसंख्य पहिल्या पिढीचे उद्योजक यांनी कोणतीही गोष्ट बापाची वारसाहक्काने मिळालेली नसताना स्वतःच्या बुद्धिमत्तेवर आणि अपार कष्टावर उभी केलेली आहे. यात धीरूभाई अंबानी, गौतम अडानी पासून लक्ष्मणराव किर्लोस्कर,आबासाहेब गरवारे, चितळे, कॅम्लिनचे दादासाहेब दांडेकर, सारखे असंख्य उद्योजक आहेत. तेंव्हा उद्योजक हे हरामखोर रक्तपिपासू हि भिकारडी कम्युनिस्ट मनोवृत्ती टाकून दिली पाहिजे. तेंव्हा शेतकर्याचे कल्याण करणे त्यांच्या स्वतःच्या हातात आहे. सरकार तुमच्या साठी काही करेल हि अपेक्षाच सोडून दिली पाहिजे
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Fri, 07/31/2020 - 18:57 नवीन
खरे सर यांच्याशी सहमत.. बऱ्याच वेळेला ह्या धाग्यावर लिहावे असे वाटले.. पण स्वतः ला आवरते घेतले कारण स्पष्ट आणि मुद्देसूद लिहिलं कि शेतकऱ्यांना सॉरी... बळीराजाला आणि त्याच्या हितचिंतकांना ते पचत नाही.. त्यामुळे अश्या धाग्यावर आता प्रतिक्रिया देणे बंद केलेय..
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sat, 08/01/2020 - 06:31 नवीन
१.रिपेयर चार्जेस चार्जेस सरकार ठरवते का ? २.अली ने ठराविक ठिकाणी जाऊनच ए सी रिपेयर केला पाहिजे असे सरकार ठरवते का ? ३. मागणी वाढल्याने अली च्या सर्व्हिस वर सरकारी नियंत्रण आणले जाते का ?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 17 hours ago
  • सुंदर !!
    1 day 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा