Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

शब्दखेळ : विरंगुळा (भाग २)

ह
हेमंतकुमार
Mon, 07/20/2020 - 08:02
💬 150 प्रतिसाद
भाग १ नव्या धाग्यावर स्वागत. नवा खेळ : शब्दव्यूह आणि अंताक्षरी खाली ओळीने नऊ अक्षर समूह दिले आहेत. प्रत्येक समूहातून तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा आणि शोधसूत्रानुसार काढायचा आहे). आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल: • पहिल्या समूहातून योग्य शब्द निघाल्यावर त्याचे शेवटचे अक्षर पहा. • त्या अक्षराने सुरू होणारा सूत्रानुसार योग्य शब्द दुसऱ्या समुहात आहे. तो ओळखा. • पुन्हा वरील शब्दाचे शेवटचे अक्षर घेऊन तिसऱ्या समुहातील शब्द शोधा. • असे क्रमाने खाली जात राहा. • आठव्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणारा शब्द शेवटच्या समूहातून ओळखा. आता या शब्दाचा क्रमांक १ मधील शब्दाशी अर्थाने जवळचा संबंध आहे. तो सिद्ध झाल्यासच कोडे पूर्ण झाले असे समजावे. • कोडे मध्यावर असताना जर तुम्ही पर्यायी शब्द काढलेत तर ते चूक ठरतील. कारण अंताक्षरी जुळली पाहिजे आणि शेवटी १ व ९ ची अटही पूर्ण झाली पाहिजे. म्हणून अनुक्रमेच उत्तरे द्या. • १ व २ ची उत्तरे एकदम लिहा. पुढे एकेक सुटे चालेल. ……………………………………………………………………………… १. उ प ड्या र व्या स न को. ( ४ अक्षरी, खाण्याचा पदार्थ). २. डे र व्या स धो ज्ञा दा की वो र ( ५ अ, मानाचे पद ). ३. मु ल द की शा मी र्ती दु ख म ( ४, देवळाशी संबंधित) ४. डी ळ धी ख व शु ळा ढो ब शी ट री ( ५, धुमश्चक्री) ५. गौ ण बु ट की शू रा मी का जा (४, प्रहार ). ६. र घु शी रा ख डा गे म ख ग ळी ( ५, दाटी) ७. का व ल शु डा मी ण च स पे रा (४, युक्ती ). ८. बा ड न का च स बु मी हा तो च दी ( ६, गोपनीय बाबी सांगणारा). ९. स ण मा झा का शी श व द ल ट ( चार अक्षरी आणि शब्द १ शी अर्थाने संबंधित). …………………………………. नवा प्रयोग आहे. चु भू दे घे !

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 60671 views

💬 प्रतिसाद (150)
ह
हेमंतकुमार Sat, 07/25/2020 - 17:50 नवीन
बरोबर !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 07/25/2020 - 17:49 नवीन
५. तजकरनीस >>> बरोबर, छान
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 07/25/2020 - 19:01 नवीन
कुमारेक, तजकर हा भाग तस्कर वरून आलेला वाटतो. तर नीस हा प्रत्यय फारसी आहे. हा मिश्र शब्द दिसतो, उदा. दखलपात्र सारखा. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 07/26/2020 - 06:02 नवीन
तस्करा = फिर्याद; तक्रार. तजकरा, तज्करा = लांचलुचपत; खोटी नोंद; हिशेबांत लबाडी; तजकरनवीस (फा) >>>>> तजकरनीस (म)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 07/25/2020 - 17:52 नवीन
४. हिशेब (७) त ६. थकीत देणे (६) की ७. माळा (४) ना ८. हात (५) ब ९. कुप्रसिद्धी (४) क्र १ चे पहिले अक्षर.
  • Log in or register to post comments
आ
आवडाबाई Sat, 07/25/2020 - 18:25 नवीन
सनवदबाकी
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 07/26/2020 - 04:36 नवीन
सनवदबाकी >>> बरोबर
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Sun, 07/26/2020 - 06:24 नवीन
डरावडराव? आधी सांगितल्याप्रमाणें
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 07/26/2020 - 06:39 नवीन
डरावडराव >>> फक्त रा ऐवजी रां
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 07/26/2020 - 08:30 नवीन
४. अरबी उगम ७. घरातील नकोशा वस्तूंची जागा ८. हात >> एका प्रसंगातील प्रतीकात्मक वापर ९. हिंदी उगम
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 07/26/2020 - 08:45 नवीन
३. प्राण्याचा आवाज (६) व ==> डरकाळीरव एका प्राण्याचा आवाज असं धरलं तरंच उपरोक्त उत्तर लागू पडेल. -गा.पै.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 07/26/2020 - 08:54 नवीन
पर्यायी उत्तर . ठीक ते आता झालंय
  • Log in or register to post comments
आ
आवडाबाई Sun, 07/26/2020 - 10:55 नवीन
४ वसूलवासलात ७ कीलखाना
  • Log in or register to post comments
आ
आवडाबाई Sun, 07/26/2020 - 10:57 नवीन
बदनाम नाही म्हणता ? मग बदलाम ?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 07/26/2020 - 11:00 नवीन
४ वसूलवासलात ७ कीलखाना बदलाम...... सर्व बरोबर !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 07/26/2020 - 11:03 नवीन

८. हात >> एका प्रसंगातील प्रतीकात्मक वापर ना * * * ब

  • Log in or register to post comments
आ
आवडाबाई Sun, 07/26/2020 - 14:25 नवीन
येत "नाहीसाहेब" :-)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 07/26/2020 - 14:28 नवीन
नाहीसाहेब >>> आता फक्त १ अक्षर दूर आहात ......!
  • Log in or register to post comments
आ
आवडाबाई Sun, 07/26/2020 - 14:31 नवीन
नाडी*** असे काही आहे कि काय ? कधी पासून ही फोडच शोधते आहे
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 07/26/2020 - 14:38 नवीन
साहेब बरोबर आहे.... आता फक्त.....
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Sun, 07/26/2020 - 15:13 नवीन
नालसाहेब ?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 07/26/2020 - 15:20 नवीन
नालसाहेब च ! छान हो
  • Log in or register to post comments
आ
आवडाबाई Sun, 07/26/2020 - 18:28 नवीन
माहित नाही . डिटेल्स ?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 07/27/2020 - 04:32 नवीन
नालसाहेब : पंजा; मोहरमांत एका उंच काठीला वर पंजा बांधून व त्याला पुष्पमाळा वगैरे घालून गांवांतून मिरवीत नेतात, ही काठी हातीं धरणाराच्या अंगांत दैवी संचार होतो असें समजतात. याला भाविक लोक नालसाहेब म्हणतात.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 07/26/2020 - 15:28 नवीन
अखेर हा ३ दिवसांचा सामना सुफळ संपूर्ण झाला. सर्व छान खेळले. आवडाबाई = सचिन/विराट ! एकहाती ! म मा यांचा विजयी चौकार ! बरेच शब्द वापरातले नाहीत मान्य. डोक्याला खुराक आणि इतिहासात डोकावणे हा हेतू . धन्यवाद !
  • Log in or register to post comments
आ
आवडाबाई Sun, 07/26/2020 - 18:26 नवीन
... तरी मजा आली खरच डोक्याला खुराक मिळाला आणि तो भरपूर दिवस पुरला ह्या सगळ्या शब्दांसोबत अजून कितिक शब्द डोळ्याखालून गेले
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 07/29/2020 - 14:53 नवीन
विषय : शिक्षणशास्त्र खाली दिलेल्या ९ प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे: १. शब्दाची अक्षरसंख्या आणि २. त्या शब्दातील तिसरे अक्षर. काही प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे. उत्तर देण्यापूर्वी शब्दातील अक्षरसंख्या व तिसरे अक्षर ताडून पाहावे. . ............................................................................ प्रश्न: १. शिक्षण समाजाच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? (7, त्रि) २. शिकवण्याच्या पद्धतीला तंत्रज्ञानाची पूरक जोड कोणत्या साधनांनी देता येते ? (7, श्रा ) ३. शिक्षकाने फक्त कथन आणि विद्यार्थ्यांनी निव्वळ श्रवण करणे, या पद्धतीला काय म्हणतात ? ( 5, दे) ४. विद्यार्थ्यांना निव्वळ बंदिस्त पुस्तकी शिक्षण न देता अजून कुठल्या प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे? (7, भ ) ५. शिक्षणाचा हेतू विद्यार्थ्यांचे निव्वळ परीक्षेतील गुण वाढवणे हा नसून ---------- हा असावा. ( 7, व) ६. वरील ५ मधील प्रगती मोजण्याला काय म्हणतात ? (5, मा). ७. शिक्षणाचे केंद्रीय नियंत्रण कोणते सरकारी खाते करते? ( 8, ष्य ). ८. भारत सरकारतर्फे शिक्षणातील विद्वान व व्यासंगी व्यक्तींना दिली जाणारी मानद उपाधी कोणती? ( 7, म). ९. शाळेची पायरी कधीही न चढता देखील समाजात वावरून जे शिक्षण घेता येते, ते कुठल्या प्रकारचे असते ? शास्त्रीय शब्द हवा. (6, प ) .....................................................
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 07/29/2020 - 16:13 नवीन
१. सार्वत्रिकशिक्षण ?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 07/29/2020 - 16:15 नवीन
चालेल. ‘सार्वत्रिकीकरण’ असे उत्तर आहे. छान !
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 07/29/2020 - 16:53 नवीन
२. शिकवण्याच्या पद्धतीला तंत्रज्ञानाची पूरक जोड कोणत्या साधनांनी देता येते ? (7, श्रा ) ==> दृकश्राव्यपद्धती ३. शिक्षकाने फक्त कथन आणि विद्यार्थ्यांनी निव्वळ श्रवण करणे, या पद्धतीला काय म्हणतात ? ( 5, दे) ==> उपदेशन ४. विद्यार्थ्यांना निव्वळ बंदिस्त पुस्तकी शिक्षण न देता अजून कुठल्या प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे? (7, भ ) ==> ? ५. शिक्षणाचा हेतू विद्यार्थ्यांचे निव्वळ परीक्षेतील गुण वाढवणे हा नसून ---------- हा असावा. ( 7, व) ==> ज्ञानवर्धनकारी ६. वरील ५ मधील प्रगती मोजण्याला काय म्हणतात ? (5, मा). ==> बुद्धीमापन ७. शिक्षणाचे केंद्रीय नियंत्रण कोणते सरकारी खाते करते? ( 8, ष्य ). ==> मनुष्यविकासखाते (पण आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार बदललंय) ८. भारत सरकारतर्फे शिक्षणातील विद्वान व व्यासंगी व्यक्तींना दिली जाणारी मानद उपाधी कोणती? ( 7, म). ==> महामहोपाध्याय ९. शाळेची पायरी कधीही न चढता देखील समाजात वावरून जे शिक्षण घेता येते, ते कुठल्या प्रकारचे असते ? शास्त्रीय शब्द हवा. (6, प ) ==> ? -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 07/29/2020 - 16:54 नवीन
९. शाळेची पायरी कधीही न चढता देखील समाजात वावरून जे शिक्षण घेता येते, ते कुठल्या प्रकारचे असते ? शास्त्रीय शब्द हवा. (6, प ) ==> अनौपचारिक -गा.पै.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 07/29/2020 - 17:04 नवीन
दृकश्राव्यपद्धती >>> दृकश्राव्यमाध्यमे ३, ५, ६ >> नाही. जरा वेगळी आहेत. बाकी बरोबर. छान !
  • Log in or register to post comments
P
Prajakta२१ Wed, 07/29/2020 - 17:50 नवीन
५. मूल्यमापन ?
  • Log in or register to post comments
P
Prajakta२१ Wed, 07/29/2020 - 17:54 नवीन
५. चारित्र्यसंवर्धन ६. मूल्यमापन
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 07/29/2020 - 17:58 नवीन
६. मूल्यमापन >>> बरोबर. ५ चूक ....( 7, व) असे बघा.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 07/29/2020 - 22:55 नवीन
कुमारेक, मूल्यमापन म्हणजे assesment. ही एक सर्वसाधारण संज्ञा आहे. शैक्षणिक प्रगती मोजण्याची असेल तर माझ्या मते अधिक समर्पक शब्द हवा. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 07/30/2020 - 04:12 नवीन
या कोड्यात केवळ एकाच शब्दात उत्तर द्यायचे असल्याने अशा काही मर्यादा आहेत. प्रश्न 5 व 6 याचे उत्तर जोडीने द्यायचे आहे. या दोघांची उत्तरे मी एका शिक्षणतज्ञांच्या लेखातून घेतली आहेत. एका शब्दाचे बंधन घातल्याने एकंदरीत कोड्याला मर्यादा आहेत हे कबूल. तेव्हा पर्यायी शब्द जरूर असतील आणि सुचवा.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 07/30/2020 - 09:41 नवीन
कुमारेक, कलमापन हा पर्यायी होऊ शकेल काय? अन्यथा ही संज्ञा नव्याने उत्पन्न करावी लागेल. नव्या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम शोभून दिसावी. मी प्रयत्न करेन. बघूया काय होतं. सूचनेबद्दल धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 07/30/2020 - 09:48 नवीन
संपले की शांतपणे विचार करतो.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 07/29/2020 - 18:12 नवीन
३ ४ ५ राहिलेत. उद्या भेटू.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 08/13/2020 - 07:13 नवीन
३ अनुदेशन ४ अनुभवाधारित ५ गुणवत्ताविकास …… अक्षरसांगड हा एक नवा खेळ सुचवतो. आपण यात ९ सुटी अक्षरे देतो. त्यापासून जमतील तितके किमान ३ अक्षरी शब्द करायचे.. (जास्तीत जास्त ९ पर्यंत कितीही अक्षरी शब्द चालेल ). कोडेनिर्माता आधी शब्दांची किमान संख्या जाहीर करतो. काही तासानंतर सहभागीं नी त्यांची यादी द्यायची. ३-४ जण इच्छुक असतील तर खेळू. तसे लिहा धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 08/13/2020 - 10:21 नवीन
बरेच दिवस वाटच बघत होतो नव्या खाद्याची टाका लवकर टाका पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 08/13/2020 - 10:47 नवीन
अक्षरसांगड खेळ खाली दिलेल्या ९ अक्षरांतून किमान १५ सामान्य शब्द बनवा. सर्व शब्द किमान ३ अक्षरी. पण एक ७ अक्षरी हवा. बाकी कसेही. १ शब्द करताना १अक्षर एकदाच वापरा; पुढच्या शब्दासाठी पुन्हा घेऊ शकता. न त इ डी इ बा मा र स उत्तरे तुमच्याकडे फक्त तयार ठेवा. ४ तासांनी उघड करू. …… काही नियम : १. सर्व शब्द सामान्यनामे हवीत आणि मूळ रूपातले शब्द. २. एकाच शब्दाचे एकवचन घेतले असल्यास त्याचे अनेकवचन चालत नाही. ३. सर्व शब्द अर्थातच अधिकृत हवेत. ४. जोडशब्द ( मध्ये – असलेले) नकोत. ५. हृस्व दीर्घ महत्त्वाचे. ........ एकेक शब्द इथे लिहू नका
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 08/13/2020 - 11:55 नवीन
एवढा वेळा डोके फोडून फक्त दोन शब्द मिळाले पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 08/13/2020 - 12:37 नवीन
४ तास दिलेत ! नंतर मजा समजेल .
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 08/13/2020 - 14:47 नवीन
यादी सादर करू शकता.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 08/13/2020 - 15:07 नवीन
खुप दिवसांनी आलो धाग्यावर.. प्रयत्न करून व्यनि करून ठेवतो तुम्हाला
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 08/13/2020 - 15:38 नवीन
थोडा घाईत आहे, कॉल आहे.. 15 शब्द आणि त्यातील एक 7 अक्षरी शब्द झालेत. व्यनि करतोय.. येथे नंतर ड्या तुम्ही
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 08/13/2020 - 15:09 नवीन
चालेल !
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 08/13/2020 - 15:49 नवीन
20 शब्द व्यनि केलेत.. नंतर बोलू.. :-) काही चुकले असतील
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 20 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 20 hours ago
  • सुंदर !!
    6 days 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा