Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

(मन भूत भूत ओरडते..)

ज — ज्ञानोबाचे पैजार, Mon, 07/20/2020 - 07:28
पेरणा अर्थात प्राची तैंची मन राधा राधा होते... आज दिव्याच्या अमावस्ये निमित्त मिपावरच्या सर्व ब्रम्हराक्षसांना आणि डाकीणिंना सादर नमन करुन

(मन भूत भूत ओरडते..)

तिन्हीसांजेच्या व्याकुळ वेळी का बाहेरची बाधा होते? मळभ दाटते तेव्हा मन भूत भूत ओरडते.. सहावे इंद्रिय जेव्हा शंकांची उडवीते राळ, आवेग जरा वा-याचा भासतो जणू वेताळ.. मिटताच डोळे माझे उभा मज समोर ठाकतो, रोज मला उठवाया तो झोटिंग बनुनी येतो.. लोक म्हणती आहे वेडा दिवस असो वा रात्र, किंचाळत असतो सारखा ताणूनी सर्व ही गात्रं.. (ही भुताटकी खास श्रीयुत थंडमाणूसछान यांच्यासाठी....:)) पैजारबुवा,

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6811 views

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Mon, 07/20/2020 - 08:16 नवीन
=)) तरी ह्यावेळी हे विडंबन तुलनेने उशिरा आलं :)
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Mon, 07/20/2020 - 08:30 नवीन
(ही भुताटकी खास श्रीयुत थंडमाणूसछान यांच्यासाठी....:))
पैंबुंचे हे विडंबन वाचून, थंडमाणूसछान म्हणाला, पैंबूनाना तुमचं छान-विडंबन नेहमीप्रमाणे पटतंय, पण तुम्ही मौन सोडल्याने हा मी निघालो... असे म्हणून थंडमाणूसछान पुन्हा खफवरील पाराच्या पिंपळाच्या फांदीवर जाऊन उलटा लटकू लागला...
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Mon, 07/20/2020 - 22:01 नवीन
मजेशीर :D
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 07/21/2020 - 16:53 नवीन
हा .... हा .... हा ...... भूत भूत, वेताळ, झोटिंग ..... भीतीच वाटायला लागली ना राव ! पैजारबुवा _/\__
  • Log in or register to post comments
J
Jayant Naik Wed, 07/22/2020 - 12:15 नवीन
खूप मजेशीर
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 07/24/2020 - 08:31 नवीन
:) :)
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 07/30/2020 - 14:00 नवीन
एकदमच मस्त...ते पारावर लटकलेल्यावरुन मी पूर्वी लिहल..होतं इथं देते. पिंपळाच्या फ़ांद्यांवर लटकतांना झाडांच्या गात्रा गात्रात तु पोहचला आणि सुसाट वारा जेव्हा आला तू पानांच्या सळसळीतून निसटतांना अंगणात सैरभैर धावला तिथे दिवा होता लावलेला -भक्ती
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 08/05/2020 - 13:56 नवीन
:):)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा