कठीण समय येता...
सध्याच्या करोना कठीण परिस्थिती आपण सर्वच जण थोडयाफार फरकाने व्यथित आहोत ... आपल्याला आणि आपल्या जवळच्यांना धोक्यपासून वाचवण्याचे, एक मनुष्य म्हणून जे जमेल ते प्रयत्न करीत आहोत ,,, असे असताना जेव्हा काही स्वतःला श्रद्धाळू वैगरे म्हणवणारे लोकं ' बेजबाबदार' किंवा "समोरच्या जिवंत माणसांच्या प्रयत्नांचा किंवा अस्तित्वाचाच अपमान करणारी" व्यक्तवे करतात तेव्हा आपली तर बुवा ' आता माझी सटकली ' अशी अवस्था होते.
आजचे उदाहरण देतो...( हे कोठेही घडू शकते , भारताबाहेर असल्यामुळे दुरून आपण आर्थिक मदतीशिवाय इतर काही करू शकत नाही हा एक थोडा वेगळा मुद्दा यात डोकावतो तो वगळल्यास )
घडले असे
भारतातील वृद्ध आई वडिलांची काय परिस्थिती आहे , काय अडचणी सध्या त्यांना येत असतील असे चर्चा २-४ मंडळीत चालू होती.. तेवहा एक व्यक्ती म्हणाली कि ' देव सगळे काय ते बघून घेईल'
मी हे ऐकले आणि आधी क्षण भर विचार केला कि काळजीने थकून आणि असहाय झाल्यामुळे हि व्यक्ती असे म्हणाली असावी.... मग जरा शांत पणे विचार केला आणि नंतर त्या व्यक्तीला विचारले कि आपण असे का म्हणालात? वरील कारणांमुळे कि आपल्या श्रद्धे मुले?
आणि जर श्रद्धेमुळे म्हणाला असाल तर मग पुढील प्रष्ननची उत्तरे द्याल का?
काय प्रश्न?
- या विधानातून असे समजायचे का? कि जी लोक स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांना किंवा अश्या अडकलेल्या वयोवृद्धांना मदत करीत आहेत त्यांच्या श्रमांचे काहीच नाही का? त्याला तुमचं दृष्टीने किंमत नाही?
- जर देवच सगळं करणार असेल तर मग इथे बसून आई वडिलांना कसे सावध राहा हे सल्ले का देताय.. देव आहे ना बघून घेईल ना तो ? कशाला काळजी?
- म्हणजे तुम्हाला दोन्ही बाजूने डमरू वाजव्याचा दिसतोय... १ देव आहे तो करेल हे सोडायचे नाही आणि २ आधुनिक वैद्यकीय शास्त्राचा फायदा पण घायचाच.. बरं तसे सरळ पणे कबूल हि करीत नाहीत तुम्ही.. हा दांभिक पणा नव्हे का?
- असेल जर एवढी श्रद्धा तर सरळ सांगा ना आई वडिलांना कि जा घराबाहेर कंटाळा आला असले तर ..देव आहे ना? तो बघून घेईल.. आहे हिंमत असे सांगण्याची ?
म्हणजे थोडक्यात मी त्यांना 'बाप दाखव नाही तर श्राद्ध कर " असेच विचारले
आवडले नाही अर्थात .. पळपुटी उत्तरे सुरु झाली ..
मी परत विचारले अहो तुम्ही शास्त्राचे पदवीधर ना? मग काय विचारतोय ते समजत नाही आपल्याला ?
त्यावर उत्तर आले " स्वभाव असतो एकेकाचा "
वा रे बहादरर, हे उत्तर ! (,, पुढे माझ्य मनात या वृत्ती बद्दल जे आले ते इथे लिहिण्यासारखे नाही)
थोडक्यात हेच म्हणालो कि "जिवंत माणसाच्या प्रत्यंनांचाच आदर सुद्धा तुम्ही करू शकत नाहो तर धिक्कार असो या आपल्या श्रद्धेचा..." आणि जाऊन भरपूर थंड पाणी प्यायलो
खुलासा ; हा धागा काढून मला 'देव आहे कि नाही " असला फुकाचा वाद घालायचा नाहीये,,, बाबानो जाहीर करतो कि देव आहे .. ठीक ! ओके ! पुढे काय ? भले तो असेल .
तो आणि प्रत्येक व्यक्ती बघून घेतील ना ,,त्याने खेळ मांडलाय ना ,, खेळू दे त्याला.. तुम्ही कोण शहाजोग सांगणारे कि देव काय करेल किंवा नाही ते? तुम्ही तुमचे गुरु वगैरे सर्व सगळे मरणार माझ्य सारखेच, राग लोभ मत्सर सगळं काही आपल्याला आहे .. असुद्या , जगू जसे जमेल तसे ..निदान या अवघड परिस्थितीत तरी समोरच्या जिवंत माणसाचा असा अपमान करू नका !
https://www.youtube.com/watch?v=9jviLqTi5wA