Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

गुलाबी कागद निळी शाई....5 चंद्रवेळ

प
प्राची अश्विनी
गुरुवार, 07/02/2020 - 04:52
💬 8 प्रतिसाद
गुलाबी कागद निळी शाई..4 अलवार Hi दोन दिवस झाले अजून तुझं उत्तर नाही. काय झालं? तू काल ऑफिसला पण नाही आलास? Is everything ok??? सारखं वाटतंय फोन करावा किंवा निदान मेसेज तरी. तुझ्याकडे माझा नंबर जरी नसला तरी माझ्याकडे तुझा आहे. (कसा मिळवला विचारू नकोस.:)) पण असंही वाटतंय मला टाळत तर नाहीस ना? काही चुकीचं लिहिलं होतं का मी पत्रात? आठवत नाहीये. दुखावलं का मी तुला? If so then sorry. मेल किंवा मेसेज असता तर मी काय लिहिलं ते वाचता तरी आलं असतं. पण पत्र एकदा पाठवलं की गेलंच.... Sorry तरीसुद्धा. (तुझं पत्र मिळेपर्यंत मी लिहायला घेतलंच होतं बघ. आता ते तिथंच सोडून पुढे लिहितेय...) प्रियांसी... खरंच??? खूप आवडलं. पण क्षणभर थबकायला झालं. म्हणजे असं अचानक कुठल्या तरी नवीन जगात आलेय असं वाटलं. सुरुवात तर मारे केली मी धीटपणे पण जमेल का आपल्याला हे नवीन नातं निभावणं ? भिती वाटली एकदम. म्हणजे माझं अगदी तुझ्या उलट बघ. आवडीचं rhythmचं गाण लागलंय , डान्स फ्लोअरवर उभी आहे पण जमेल का नाचायला? कुणी काय म्हणेल त्याची भिती नाही पण माझ्या वेड्यावाकड्या moves मुळे तू दुखावला तर जाणार नाही ना?? अजूनही ती भिती पूर्ण गेली नाहीच आहे. पण ... अमीत सरांबरोबर काम करणं काही कमी भितीदायक नाही. :) माझं आणि त्यांचं मुळीच पटत नाही. दोष कुणाचाच नाही. दोघंही attitude वाले आहोत इतकंच. आणि ते सारखं एकाला दुस-याशी compare करत असतात. त्यावरून आठवलं, "तुलना करून मला जी आवडते..." म्हणजे कोण रे ती नक्की????;) अजून आपण एकमेकांना ओळखत नाही फार. म्हणून माझे दोष आधीच सांगून ठेवते तुला. मी खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच impulsive निर्णय घेते. आणि पटकन चिडते. रडते सुद्धा. बघं आत्ताच काय तो विचार कर.. आवडेन का मी तुला? तू तर मला एकदम संयमी शांत वाटतोस. अचल स्तब्ध शांत तू जाणत्या तळ्यापरी चांदण्यात मी अधीर थांबले तुझ्या तिरी.. तुझं पत्र वाचल्यापासून डोळे मिटले की ती तुझी चद्रवेळ अवतरते. आपण दोघं आणि निशब्द भवताल.... कधी घडेल रे ते? बाकी मी असले की निशब्दता फार वेळ तग धरू शकत नाही हे कळेलच तुला लवकरच. :) तुझी.. गुलाबी कागद निळी शाई..5 चंद्रवेळ

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4037 views

💬 प्रतिसाद (8)
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 07/02/2020 - 05:58 नवीन
जेव्हा दात होते तेव्हा चणे नव्हते आता चणे आहेत पण दात नाहीत त्यामूळे पत्र वाचून लैच जळजळ होते आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 07/06/2020 - 04:17 नवीन
:):)
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 07/02/2020 - 06:48 नवीन
छान चालू आहे....
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 07/06/2020 - 04:18 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
श
शा वि कु गुरुवार, 07/02/2020 - 07:50 नवीन
हा भाग रिलेट होतोय.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 07/06/2020 - 04:18 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
श
श्रीकांतहरणे Sun, 07/12/2020 - 11:05 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 07/17/2020 - 04:31 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 20 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 20 hours ago
  • सुंदर !!
    6 days 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा