Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

स्वच्छ एकटेच तळे : आस्वाद

ड
डॉ. सुधीर राजाराम देवरे
Wed, 07/01/2020 - 10:25
💬 8 प्रतिसाद
- डॉ. सुधीर रा. देवरे स्वच्‍छ एकटेच तळे विसावले चांदण्यात. - शंकर रामाणी शंकर रामाणी यांची ही फक्‍त दोन ओळींची कविता. या दोन ओळीतील एकूण पाच शब्द म्हणजे ही कविता. स्वच्‍छ - शुचिर्भूत. कलंक नसलेले. डाग नसलेले. नितळ. एकटेच - एकांत. समाधी लागलेले. चिंतन. तळे - पाण्याचा साठा. पाणी म्हणजे जीवन. जीवनाचा साठा. तृप्त. विसावले - शांतता. शांती. तृप्तता. आयुष्याच्या सुरूवातीला खूप कष्ट करूनच विसावता येते. खस्ता खावूनच विसावता येते. तसे नसेल तर विसावण्याला आळशी म्हणतात. सुस्त म्हणतात. चांदण्यात - शीतलता. सौहार्दता. कवितेत तळे आहे. तलाव नाही. तळे नैसर्गिक, तर तलाव मानव निर्मित. तळे असल्याने आजूबाजूला हिरवीगार झाडी सुध्दा असली पाहिजेत. हिरवळ असली पाहिजे. पक्षी असले पाहिजेत. आणि आजूबाजूंच्या झाडीत पशू सुध्दा असले पाहिजेत. जे तलावावर दिवसा आपली तहान भागवायला येत असावेत. तळे म्हणजे तलाव नाही. पोहण्यासाठी माणसाने बांधून घेतलेला कृत्रिम तलाव नसून हे नैसर्गिक तळे आहे. हे निसर्गरम्य ठिकाण असले पाहिजे. नाहीतर ते स्वच्‍छ कसे राहील? आणि आजूबाजूला शांतता तरी कशी राहील? तळ्यात जीवन असेल. म्हणजे जलचर असतील. तळे शांत असते. त्यात लाटा निर्माण होत नाहीत. समुद्रात लाटा निर्माण होतात. खाडीत लाटा तयार होतात. निवांत एकट्याच विसावलेल्या मनात क्रोधाच्या- संतापाच्या लाटा निर्माण होत नाहीत. कवितेत चांदणे आहे, म्हणजेच रात्रीची वेळ आहे. दिवसभर कष्टाची- परमार्थाची कामे केली तर चांदण्यात रात्री शांत विसावता येते. चांदण्याची रात्र आहे म्हणजे कदाचित पौर्णिमेची रात्र असली पाहिजे. पौर्णिमेला चंद्राच्या गुरूत्वाकर्षणाने समुद्रात लाटा निर्माण होतात. मात्र पौर्णिमा असूनही या तलावात समुद्रासारख्या लाटा येत नाहीत. तळे शांत असते. तृप्त असते. तृप्ततेचे – शालीनतेचे आणि शांततेचे हे प्रतीक म्हणजे ही कविता. तळे एकटेच. त्या विशिष्ट सामसुम जागी आपले कर्तव्य बजावणारे. आपल्या पोटातील जलचर, आजूबाजूचे जंगल, पशू, पक्षी यांच्यावर उपकार करत असल्याचा कोणताही आव न आणता, कोणताही गाजावाजा न करता, प्रसिध्दीचा सोस न धरता इतरांसाठी उपयोगी पडत राहते. तृषार्तांची तहान तृप्त करत राहते. म्हणजेच जीवनाचे भरण पोषण करणारे तळे. प्रसिध्दीच्या झोतापासून जंगलात दूर निवांत आपल्याच शांत चित्तात समाधिस्त. रात्री शुभ्र चांदण्यात कृतार्थतेने विसावले आहे. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती!’ (‘आस्वाद : भावलेल्या कवितांचा’ या आताच प्रकाशित झालेल्या समीक्षेच्या पुस्तकातून. लेख इतरत्र प्रकाशित करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.) © डॉ. सुधीर रा. देवरे ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4221 views

💬 प्रतिसाद (8)
प
प्रमोद देर्देकर Wed, 07/01/2020 - 11:03 नवीन
मस्त विवेचन. आवडले.
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… गुरुवार, 07/02/2020 - 06:47 नवीन
खूप खूप धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Wed, 07/01/2020 - 11:44 नवीन
सुरेख परिचय. +१.
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… गुरुवार, 07/02/2020 - 06:47 नवीन
खूप खूप धन्यवाद.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 07/02/2020 - 09:28 नवीन
सुंदर उलगडून सांगितली कविता. पाण्याचं आणि त्यातल्या त्यात तळ्याचं मला खूप आकर्षण आहे. लहानपणी आमच्या गावाबाहेरच्या तळ्यात पोहायचा आनंद मी घेतला आहे.
एक तळे निळे निळे माशांना सार्‍या घेऊन लोळे
असं एक बडबडगीत लिहिलेलं खूप आधी. सं - दी - प
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Fri, 07/03/2020 - 10:48 नवीन
तुमचं बडबडगीतही आवडलं
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक गुरुवार, 07/02/2020 - 09:32 नवीन
झेन कविता आणि हायकूंची आठवण करून देणारे शब्दसंख्या आणि आशयात व्यस्त प्रमाण असलेले सुरेख काव्य, आणि अप्रतिम भाष्य! धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Fri, 07/03/2020 - 10:49 नवीन
आपला खूप आभारी आहे सर
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 20 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 20 hours ago
  • सुंदर !!
    6 days 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा