ती आली तर
रंग किती गगनात पसरले ती आली तर
मेघ कसे हलकेच बरसले ती आली तर
उभा असा मी बस थांब्यावर जाण्यासाठी
कुठे जायचे तेच विसरले ती आली तर
नजर अशी नजरेस मिळाली जादू झाली
भले भले ते ना सावरले ती आली तर
मंजुळ संगीत अवचित कसे ऐकू आले
पैंजण छनछन तिचे वाजले ती आली तर
मी रसिक फारसा नाही ती दाद द्यायला
वाह का आपसूक उमटले ती आली तर
मोहक मुखडे तिच्या सारखे किती पाहिले
का क्षणभर ते हृदय थांबले ती आली तर
💬 प्रतिसाद
प
प्राची अश्विनी
Sat, 06/27/2020 - 15:18
नवीन
वाह!
- Log in or register to post comments