Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

((मित्र घरी जायला निघतो तेव्हा))

क — कानडाऊ योगेशु, Fri, 06/26/2020 - 18:13
प्रेरणा अर्थातच इथुन मित्र घरी जायला निघतो तेव्हा, अगदी शेवटचा म्हणुन ठेवलेला पेग..सगळाच्या सगळा..एका दमात पिऊन टाकतो.. सवयीने खंबा सुद्धा अगदी थेंबही न उरेल इतका साफ केलेला असतो..अगदी रिकामा डिशमधला चकणा..चकल्या..उबले हुए शेंगदाणे..चना डाल वेटर कडुन मागावलेला कॉम्प्लिमेंटरी पापड..विथ ग्रीन चटणी.. योल्क काढलेले बॉईल्ड एग्ज फिंगर चिप्स अन ओनिअन रिंग्ज. मेन कोर्स मागवतच नाही. चकण्यातच पोट कसे भरुन जाते कोण जाणे....! खरकटलेला असतो अजुनही टेबल.. बाजुला काढलेले खवट शेंगदाणे..मूंग डाल..तर्जनीला चिकटवुन ते ही टिपतो..सराईतपणे..एका तंद्रीत.. माझा तेवढा शिल्लक असतो..पावशेर बिअरचा ग्लास.. अन अर्धा खाल्लेला पकोडा.. "हे ही मी घेतो..करपट ढेकर येतात तुला" असे म्हणत त्याच्या उदरात गेलेले असते. आता फक्त उरतात रिकाम्या डिशेस..रिकामे ग्लास..सवयीने भींतीकडे सरकवतो.. अन टेबल आता मोकळा दिसतो... मला आठवतात त्याच्याशी समोरासमोर उगाच घातलेले वाद आणि मग एकामागोमाग एक मागवलेले पेग.. त्याचा बरळलेला आवाज.. आणि एखाद्या अर्ग्युमेंटवर त्याने घेतलेली पप्पी.. निघताना बिल द्यायच्या गडबडीत राहिलेच कि असे म्हणत खिशातुन काढलेली टिप.. हुश्श्य गेला म्हणुन एकदाचा मी थोडा रिलॅक्स होतो इतक्यात, तो परत येताना दिसतो.. "आता घरबसल्या घरी मागवता येते...नेशनच्या इकॉनॉमीला हातभारही लावता येईल..आता घरी बसुनच मागवता येईल.." हे पुन्हा सांगायला.. अन इतक्यात मी तो गेल्यानंतर मागवलेला एक पेग वेटर घेऊन येतो.. मित्र घरी जायला निघालेला असतो.. ..तो आता पुन्हा बसतो... आणि.... . . . . . . . . . . . . मी अजुन एक पेग मागवतो...!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4005 views

💬 प्रतिसाद
ए
एस Fri, 06/26/2020 - 19:04 नवीन
यथार्थ वर्णन.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Sat, 06/27/2020 - 07:12 नवीन
भारीच!! :)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 06/27/2020 - 09:32 नवीन
हा हा हा.. भारी
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 06/27/2020 - 15:19 नवीन
भारीच!!! अर्थात असा अनुभव बिल्कुलच नाही.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 06/27/2020 - 15:25 नवीन
मैत्रीमधील अत्त्युच्च मित्रप्रेमाच्या प्रसंगांचे यथार्थ वर्णन केले आहे.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 06/27/2020 - 18:08 नवीन
असे मित्र असतील तर घरी कशाला जायचे? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sun, 06/28/2020 - 10:04 नवीन
धन्यवाद एस,रातराणी,गणेशा,प्राची अश्विनी,सगासर,ज्ञानोबाचे पैजार @सगासर >मैत्रीमधील अत्त्युच्च मित्रप्रेमाच्या प्रसंगांचे यथार्थ वर्णन केले आहे. खरे आहे.प्रसंग बराचसा आयुष्यातील प्रसंगाशी मिळता जुळता आहे.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 06/28/2020 - 20:44 नवीन
ख्या ख्या ख्या
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा