Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

गुलाबी कागद निळी शाई - पत्रांक २ काहूर

@
@tul
Fri, 06/26/2020 - 04:00
💬 9 प्रतिसाद
प्रिय, एकदा लिहिलं , खोडलं , पुन्हा लिहीलं, पुन्हा खोडलं पण प्रिय तर आपल्याला ज्या व्यक्ती आवडतात त्यांना लिहितो ना मग का खोडलं मी? प्रिय तुझं भावना पत्र मिळालं. तुला माहितेय इतक्या वर्षांनी मला कोणीतरी संबोधून पत्र लिहिलंय. आज अनेक वर्षांनी मी पत्र वाचतोय. तेही केवळ मला आलेलं. आणि कोणी लिहिलेलं? तिने जिने मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी स्थान ग्रहण केलय. वर लिहीत होतो खोडत होतो आता धीर आलाय. हो केलं आहेस तू एक स्थान तयार माझ्या मनात. म्हणजे जे मला वाटतं होतं अगदी तस्संच तुलाही वाटतं होतं तर. थोड्याश्या भीतीने तू म्हणालीस चहा कॉफी? ही भीती मला कायम स्वरूपी मुकशील गमावशील अशी असेल तर तुझ्या माझ्या बद्दलच्या भावना किती दाट आहेत हे कळतंय मला. निमित्त भेटण्याचं असतं पण त्यात बिचारी चहा कॉफी उगाचच उकळते. जळते बिचारी. आपली मैत्री वाढली तर जळतील का गं आजूबाजूचे? आपल्यावर? तुझ्यावर ? माझ्यावर? जाऊदेत माझ्या मनी लागलेली आग छान उब देतेय हे नक्की. तुझा .... नाव लिहू?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4394 views

💬 प्रतिसाद (9)
@
@tul Fri, 06/26/2020 - 04:02 नवीन
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Fri, 06/26/2020 - 07:32 नवीन
हौ क्यूट :-) पण पूर्वार्ध जास्त आवडला मला.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 06/26/2020 - 09:20 नवीन
खुप छोटं आहे हे पत्र. अजून लिहा :)
  • Log in or register to post comments
@
@tul Sat, 06/27/2020 - 13:47 नवीन
आहो शेवटी पुरुषाचं पत्र ते; किती लिहिणार हा हा हा
  • Log in or register to post comments
@
@tul Sat, 06/27/2020 - 13:48 नवीन
आहो शेवटी पुरुषाचं पत्र ते; किती लिहिणार हा हा हा
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 06/27/2020 - 15:23 नवीन
हेच लिहिणार होते. :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 06/28/2020 - 05:20 नवीन
=))
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 06/29/2020 - 09:04 नवीन
हा हा मला वाटलं पत्र लिहायला जमतं पुरुषांना, समोरासमोर बोलायची वेळ आली की शब्द सुचत नाहीत वगैरे वगैरे =))
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 06/28/2020 - 08:31 नवीन
लगे रहो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 21 hours ago
  • सुंदर !!
    6 days 21 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 21 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा