Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

चुकलेली वारी..

म — मी-दिपाली, Tue, 06/23/2020 - 12:39
आषाढ महिना लागला की आठवतात काळे मेघ ; त्या मेघांनाच दूत बनवणारे महाकवि कालिदास आणि मग वेध लागतात आषाढी एकादशीचे ,टाळ मृदंगाच्या जयघोषाचे ,विठ्ठलाच्या नामाचे, पंढरीच्या वारीचे. वारी म्हणजे तीनशेहून अधिक वर्षे जपलेला महाराष्ट्राच्या भागवत संप्रदायाचा सांस्कृतिक वारसा ,वारी म्हणजे नेम ,अट्टाहासाने घेतलेले आत्मक्लेषाचे व्रत ,त्यातील भक्तिरसाच्या सुखाची अनुभूति , समर्पणातील आत्मानंद . या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे 'मनाचिये द्वारी यंदाची ही वारी ' असे म्हणण्याची वेळ वारकऱ्यांवर आली आहे. प्रत्यक्ष पंढरपूरी जाऊन विठुरायाचे दर्शन घेता येणार नसल्यामुळे जीवाची तगमग होते आहे.... .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8415 views

💬 प्रतिसाद
प
प्राची अश्विनी Tue, 06/23/2020 - 13:19 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments
प
प्रशांत Tue, 06/23/2020 - 13:49 नवीन
+१
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Tue, 06/23/2020 - 13:30 नवीन
प्रासादिक काव्य. (शेवटी स्वामी म्हणे, नामा म्हणे अशा स्वरूपाचा उल्लेख नसेल तर चुकल्यासारखे वाटते)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 06/23/2020 - 13:36 नवीन
याचे फार वाईट वाटते आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्रशांत Tue, 06/23/2020 - 13:51 नवीन
या वर्षी पुणे - पंढरपुर - पुणे सायकल वारी करायचा विचार होता.
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 06/23/2020 - 14:34 नवीन
एक नमुना पेश व्हावा म्हणुनी परतुनी आलो आज चिंब त्या कडांचा एक , फक्त एक थेम्ब साठवुनी गेलो तू विठू आम्हा सावळा कुणा वाटे तु रे काळा पुरवितसे अखंड तू भक्ती चैतन्याच्या झळा आज जाहलो मी म्लान आले कोरोनाचे थैमान ये धावुनी तू त्वरा भक्त दर्शना पाठमोरा
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 06/23/2020 - 14:41 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Tue, 06/23/2020 - 14:56 नवीन
विठ्ठ्ल..विठ्ठ्ल..
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 06/23/2020 - 15:15 नवीन
रूप मनोहारी लावी वेड भारी मन जाई वारी रंगोनिया!!! अहाहा ! इथे पैकीच्या पैकी गुण दिले आहेत. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
र
रातराणी Tue, 06/23/2020 - 18:11 नवीन
अप्रतिम!!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 06/23/2020 - 20:18 नवीन
अतिशय प्रासदिक आणि प्रवाही लिखाण!
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Tue, 06/23/2020 - 20:50 नवीन
विठुदर्शनाची आस,त्यासाठी होणारी तगमगही सुरेख मांडली आहे! सावळ्याची प्रतिमाही काहिसा दिलासा देवून गेली. शिवाय सुरुवातीस लिहिलेली भूमिका मला विशेष उल्लेखनीय वाटते. अभिनंदन!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 06/24/2020 - 02:59 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 06/24/2020 - 12:16 नवीन
मनाचिये द्वारी यंदाची ही वारी
आलिया भोगासी असावे सादर l देवावरी भार घालूनिया ll उत्तम रचना! चित्र आणि त्यावरचे सुलेखनही सुरेख! सं - दी - प
  • Log in or register to post comments
स
सही रे सई Wed, 06/24/2020 - 17:13 नवीन
सुन्दर
  • Log in or register to post comments
फ
फास्टरफेणे Wed, 06/24/2020 - 18:50 नवीन
काय हे पडळकर साहेब ! शिवसेनेने पवारांचं "हाफिज सईद" असं "सौम्य" नामकरण केलेलं असताना तुम्ही त्यांना थेट "कोरोना" संबोधता !!! किती जहाल विचार आहेत तुमचे !
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Wed, 07/01/2020 - 07:03 नवीन
सुरेख लिहीलंय!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा