Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

विज्ञान, बरे वाईट आणि धर्म

श
शा वि कु
Tue, 06/23/2020 - 10:18
🗣 52 प्रतिसाद
Science can answer moral questions- Sam Harris "विज्ञान नैतिकता शिकवू शकत नाही" हे वाक्य सगळ्यांना अगदी सुपरिचित आहे. आणि अगदी नक्की. विज्ञानाला बरे वाईट यातले काय बरे कळणार ? विज्ञान तर्कशास्त्राचीच अशी शाखा आहे जी वेगवेगळ्या गोष्टींच्या निरीक्षणावरून अनेक अनुमान काढते. विज्ञान बेट्याच्या मुळात स्कोप मध्येच नाहीये बरे वाईट असे निर्णय घेणे. पण यात गमतीचा भाग म्हणजे, विज्ञान नैतिकता शिकवू शकत नाही हे वाक्य येते कुठल्या अनुषंगाने ? तर नैतिकतेचा स्रोत हा धर्म आहे हे सिद्ध करण्यासाठी ! धर्मातल्या नैतिकतेकडे एकवार नजर फिरवली तरी हे लक्षात येतं की बऱ्याचश्या धर्मग्रंथांमधील नैतिकता ही 21व्या शतकात तशीच्या तशी कधीही घेता येणार नाही. धर्मातल्या बऱ्याचश्या कथा आणि उपदेश कालबाह्य म्हणून फेकुनच द्यावे लागतील, किंवा वैचारिक जिम्नॅस्टिक करून त्यातल्या संदेशाला 21व्या शतकात आणावे लागेल. (सॅम हॅरिस म्हणतोच- आज्ञापालन न करणाऱ्या स्त्रीला चाबकाने फटकवा, या धर्मातल्या आदेशाचे अनेक प्रकारे आकलन केले जाऊ शकते. मूलतत्ववादी शब्दशः अर्थ घेतील (हे आकलन तर्कहीन अजिबात नाही.) तर आधुनिक धर्मनेते काव्यात्मक मुलामा देऊन, केवळ उदाहरणार्थ/ सिम्बॉलीक फटके अथवा, आज्ञापालन न करण्याचा मनोवृत्तीला फटके अशी काहीबाही सारवासारव करतील. पण तरीही या दोन्ही टोकांमध्ये कुठेही ममत्व आणि समानता येत नाहीच!) धर्मामध्ये काय प्रकारची नैतिकता दिसते- 1) स्त्रियांनी स्वतःला नखशिखांत झाकून ठेवावे. 2) देवाच्या/पाहुण्याच्या आदरतिथ्यासाठी स्वतःच्या बाळाला मारून टाकावे. (अबराम/चिलया बाळ) 3) स्वधर्मीय सोडून इतरधर्मीय हे आपले नैसर्गिक गुलाम आहेत. 4) हॅमची कृष्णवर्णीय वंशावळ ही श्वेतवर्णीयांच्या गुलामगिरीसाठीच देवाने ठेवली आहे/ वर्ण हे मागच्या जन्माच्या पाप/पुण्यावरून ठरतात, त्यामुळे या जन्मात वर्णानुशंगाने मिळणारी वागणूक हा कार्मिक न्याय आहे. हि यादी इतकीच नाही. यात आणखी बऱ्याच गोष्टी वाढवता येऊ शकतात. या उदाहरणांचा दावा धर्म केवळ आणि केवळ अनितीने भरला आहे असा नाही. धर्म चांगल्या गोष्टी सुद्धा नक्कीच शिकवतो. इतकेच नव्हे, तर अनेक वर्षांपासून धर्माने नैतिकता शिकवण्याची महत्वाची भूमिका बजावली आहे हे सुद्धा अमान्य करता येणार नाही. उदाहरणांचा उद्देश काय होता- वरील गोष्टी अनैतिक आहेत, या बाबत वाद नसावा. पण आपल्याला बहुसंख्य धार्मिक व्यक्ती आज ह्या गोष्टी पाळताना दिसत नाहीत. निदान ह्या अशा गोष्टी पाळणारा माणूस आज नैतिक समजला जात नाही, इतके तर निश्चितच आहे. एकूण काय- तर धर्मातल्या ह्या गोष्टींकडे धार्मिक व्यक्ती सुद्धा दुर्लक्षच करतो. ह्याचा अर्थ काय होतो ? बरेचसे धर्म नैतिकता हे "डॉग्मा" , म्हणजेच, एका व्यक्तीने अथवा संस्थेने घालून दिलेले नियम या प्रकारात सांगतात. हे नियम बहुतांशी माणसापेक्षा वरचढ शक्ती कडून आलेले असतात. हे नियम त्रिकालाबाधित सत्य आहेत, हाच धर्माचा दावा असतो. पण आपल्याला दिसणारे धार्मिकजन, वर सांगितल्याप्रमाणे, या नियमांमध्ये काटछाट करतच असतात. किंबहुना, यामध्ये नवीन नियम सुद्धा वाढवत असतात. हे वाढवलेले नियम/बदललेले नियम हे नक्कीच धर्माच्या डॉग्मा/नियमांपेक्षा वेगळे आहेत. हं. मग जर विज्ञान बरेवाईट सांगू शकत नाही, आणि धर्मानेही या बाबतीत सांगितले नाही/काही आता अनैतिक वाटत असणारी गोष्ट सांगितली आहे- तर मग हे बदल/नियम आले कशातून ? उत्तर आहे तर्क. माणसाने आपली तर्कबुद्धी वापरून डॉग्मा बदलले. मुळातच विज्ञान नैतिकता सांगू शकत नाही, हे आर्ग्युमेंटच शब्दछल आहे. विज्ञान तर्कशास्त्राने दिलेले एक उपकरण आहे. विज्ञान नैतिकतेवर तितकेच भाष्य करू शकते , जितके भाष्य आईस्क्रीम नैतिकतेवर करू शकते. आणि धार्मिकव्यक्तीने सुद्धा "कुणाचा खून करू नका" हे फक्त धर्मातून उचलले आणि आहे तसे अंगिकारले नाही, तर तर्काशी पडताळले, की बुवा हा नियम खरंच नैतिक आहे का ? तर तर्काशी सुसंगत असल्याने हा नियम ठेवला गेला, तर इतर नियम जे तर्काशी सुसंगत नव्हते, ते उडवले गेले. पुढील प्रश्न- तर्काने नैतिकता ठरवणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. कारण काय चांगले आणि काय वाईट ही कल्पनाच मुळात सापेक्ष आहे. माझे मत- चांगले वाईट सापेक्ष आहे यात तर काही वाद नाहीच. पण, सापेक्ष असणे, याचा अर्थ असा होत नाही की समविचारी व्यक्ती एका निष्कर्षापर्यंत पोहचू शकत नाहीत. उदाहरणार्थ- वर दिलेल्या धर्मातील गोष्टींना नैतिक कोण म्हणेल ? ज्याची मुळातच नीती अनितीची व्याख्या फारच वेगळी आहे असाच व्यक्ती! उदाहरणार्थ- सापेक्षता असूनही, समलैंगिक व्यक्तींना पकडून शिक्षा केली जाऊ नये, हे सर्वांना (close enough) मान्य आहेच ना ? म्हणजेच की हा मुद्दा तुलनेने कमी गुंतागुंत असलेला आहे. यापेक्षा जास्त गुंतागुंतीचे मुद्दे तुलनेने जास्त सापेक्ष असतील, आणि जास्त चर्चा लागेल, एकमत होण्यासाठी. शेवटचा आणि कळीचा मुद्दा. अणु बॉम्ब वगैरे सांगून विज्ञान अनैतिक आहे असे म्हणणे- नक्कीच. विज्ञान एक टूल आहे. त्याचा आपल्यादृष्टीने नैतिक आणि अनैतिक गोष्टींसाठी वापर होऊ शकतोच. पण विज्ञानाला अनैतिक म्हणणे, फक्त अणुबॉम्बच्या जोरावर, म्हणजे विष घातलेले आईस्क्रीम- यामध्ये विष आणि आईस्क्रीम ह्या वस्तू अनैतिक आहेत म्हणल्यासारखे होईल.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 27197 views

🗣 चर्चा (52)
श
शा वि कु Fri, 07/10/2020 - 07:29 नवीन
नाहम जानामी नाहं जाणामि कंपि देवं न दईवं, णत्थि इसरो णियन्ता। णत्थि सग्गभूमि ण णिरयं। णो जगकत्ता णो विकत्ताय ण य जगईसरो कोवि। ण रक्खओ ण भक्खओ। ण य कालाईओ आदित्ठो दन्दनाईओ। कम्मुणो चेव दण्डं। हं सयमेव सट्ठा भोत्ता य मे सुहदुह – पियाप्पिअसंजोगाण। अप्पसरियो जीवो सव्वाण सुहुमतिसुहुमेसु। नत्थु कोवि कयापि दुहिओ मया। सया मे इइ संवेअणा। सच्चस्स मग्गा बहवे, सच्चो य एगरुबो णवरं। समया मे मणो दुव्विहअवस्थासु। मम पत्थणा -निज्जरउ अन्नाणकंमं। शुद्धसासयरुवो हं इइ अत्थु मे सद्दंसणंअन्ते- ण य भवउ चवियं मे पयं मोक्खमग्गओ । अर्थ- There are no celestial beings I know of, there is no God. Neither heaven nor hell. Neither a preserver, nor an owner of this universe. Neither a creator nor a destroyer. No eternal judge. There is only the law of causality. I take responsibilities for my actions and their consequences. The smallest of creatures have a life-force just like mine. May I always have such compassion. May I never cause any harm to anybody. The truth is multi-faceted, and there are many ways to reach it. May I find balance in this duality. I pray, may my karma of ignorance be shed. May my true self be liberated from the cycle of life and death. And attain moksha.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Fri, 07/10/2020 - 08:30 नवीन
may my karma of ignorance be shed.
क्या बात है! अविद्येमुळे (अज्ञान, अविद्या = ignorance) होणार्या क्रिया म्हणजे कर्म. - (कार्मिक) सोकाजी
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 22 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 23 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 23 hours ago
  • सुंदर !!
    1 day 23 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 23 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा