Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

अनादी .....अनंत.....

V — Vivekraje, Mon, 06/22/2020 - 17:44
आयुष्याच्या वाटेवर एखादा अजाणता क्षण ज्यावेळी कठोरपणे थांबलेला असतो.. आणि काही प्रारब्धातील प्रश्नांची उत्तर शोधायला ही पर्याय नसतो.. त्यावेळी अचानक एखादा पर्याय उभा दिसतो.. त्यावेळी फक्त तूच आठवतोस.. अनादी ...अनंत.. जेव्हा, सगळं जग सोबत असतानाही आम्ही एकटे असतो.. आणि संसारिक दुःखात आम्ही पराजित होत असतो.. तेव्हा आमच्या रथाचा सारथी म्हणून तू समोर दिसतो.. त्यावेळी फक्त तूच आठवतोस.. अनादी ...अनंत.. मी पणा सोबत घेऊन जेव्हा आम्ही तुला शोधत असतो.. दानपेटीत दान टाकून , तुला जणू विकतच घेत असतो.. आणि तरीही तुझ्यावरचा विश्वास जेव्हा आमचा डळमळीत होत असतो.. त्यावेळी फक्त तूच आठवतोस.. अनादी ...अनंत.. तू निर्मिलेल्या विश्वात आम्ही जेव्हा तुलाच विसरत असतो.. किंवा तुझ्या निर्मितीतच आम्ही, तुला शोधत असतो.. पण कुठल्याही तंत्राशिवाय एखादं पाखरू जेव्हा घरटं बांधत असतो.. त्यावेळी फक्त तूच आठवतोस.. अनादी ...अनंत.. नास्तिक म्हणून जेव्हा आम्ही तुझं अस्तित्वच नाकारत असतो.. किंवा आस्तिक म्हणून आम्ही तुला मूर्तीत शोधत असतो.. पण दोघांच्या श्वासोश्वासातून जेव्हा तू व्यक्त होत असतो.. त्यावेळी फक्त तूच आठवतोस.. अनादी ...अनंत.. जेव्हा विश्वात शोधूनही तू आम्हाला कुठेच दिसत नसतो.. तरी विश्वाचा रहाटगाडा अविरत चाललेला असतो.. आणि तरी आम्ही जेव्हा तुलाच शोधत असतो.. त्यावेळी फक्त तूच आठवतोस.. अनादी ...अनंत.. सर्व काही व्यापुनही तू अस्तित्वहीन असतो.. शोधायचं म्हटलं तर स्वरूपाकार असतो.. स्थिरावलो थोडा की तू मनात खुदकन हसतो.. त्यावेळी फक्त तूच आठवतोस.. अनादी ...अनंत.. धडपडलो जीवनात की तूच सावरत असतो.. कुणा न कुणाच्या रुपात तू नेहमी वावरत असतो.. जेव्हा तुझ्या शिवाय दुसरा कुणी पर्यायच नसतो.. त्यावेळी फक्त तूच आठवतोस.. अनादी ...अनंत.. (माझ्या फेसबुक पेजवर पूर्वप्रकाशीत)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1405 views

💬 प्रतिसाद
स
सस्नेह Tue, 06/23/2020 - 05:25 नवीन
छान
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा