Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना,

प — प्राची अश्विनी, Mon, 06/22/2020 - 05:30
जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना, आणि तुला माझी खूप खूप आठवण येईल ना, आणि तेव्हा जेव्हा आपण भेटू ना, तू म्हणशील, "नमस्कार मॅडम!" मी तुझ्याकडे एक लुक देईन अन् मग तुझ्या बाजूला गाडीत बसेन. "अगं, बेल्ट!" मी मग चिडून बेल्ट लावेन. "बोला!", तू म्हणशील. मग मात्र मला रहावणार नाही. मी तुझा गीअरवरचा हात हातात घेईन. गालापाशी नेईन. तू हसशील..म्हणशील, लोक बघतील मी म्हणेन बघुदेत. रहावणार नाहीच मला.. बेल्ट काढेन, अशी अख्खी झुकून मी तुझ्या जवळ पोचेन. तुझ्या छातीवर डोक ठेवेन.. मान वर करून तुझ्याकडे पाहीन. तू एवढा ताडमाड उंच, कशी पोचू तुझ्या ओठांकडे?? तू आता गाडी कशी चालवू या चिंतेत असशील.. मी हसून पुन्हा डोकं तुझ्या रुंद छातीवर ठेवेन, विश्वासाने.. तुझा गंध भरून घेईन श्वासांमध्ये.. बघेन ठोके वाढतायत का.. आणि मग... ..... पण जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना, तेव्हा तुला माझी आठवण येईल ना? खूप खूप आठवण येईल ना?????

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 10006 views

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Mon, 06/22/2020 - 05:58 नवीन
क्या बात..! बहोत खूब.
  • Log in or register to post comments
म
मोगरा (verified= न पडताळणी केलेला) Mon, 06/22/2020 - 16:55 नवीन
छान
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 06/22/2020 - 18:13 नवीन
लडिवाळ कविता !
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 06/23/2020 - 05:35 नवीन
धन्यवाद!:)
  • Log in or register to post comments
श
श्रीकांतहरणे Mon, 06/22/2020 - 18:57 नवीन
वा हा खूप खूप प्रकार ....खरंच ... खूपच आहे बाबा....
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 06/23/2020 - 05:31 नवीन
:):)
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Mon, 06/22/2020 - 19:01 नवीन
जीव घेतलात आज :)
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 06/22/2020 - 20:21 नवीन
हा हा मला पण टेन्शन आलं आता हा गाडी कशी चालवणार म्हणून :) :) मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक ;) कविता आवडलीच :)
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 06/23/2020 - 05:36 नवीन
हम्म.. मनाचा ब्रेक..;)
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Mon, 06/22/2020 - 20:46 नवीन
असं सहज सोप्पं हळवं लिहिणं अतिशय अवघड! खूप छान! खासंच!
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Tue, 06/23/2020 - 04:55 नवीन
.
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Tue, 06/23/2020 - 05:41 नवीन
+१
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 06/23/2020 - 05:38 नवीन
प्रचेतस, मोगरा, सस्नेह, श्रीकांत हरणे, रातराणी, वीणा, सत्यजित आणि शाविकु., धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 06/23/2020 - 16:13 नवीन
सुंदर कविता ! ही कविता , हा क्षण जगलोय मी ... यवतेश्वरच्या पठारावर. आठवण येते अगदीच नाही असं नाही, पण अगदी खुप प्रकर्षाने येते असंही नाही . फॅक्टय , खोटं नाय बोलत. दर वेळी जुन्या पावसाची आठवण काढत बसलं की हाताशी असलेल्या पावसात मनसोक्त चिंब भिजता येतं नाही, आत्ता आहे ह्या क्षणात राहुन , अत्ता आहे तो पाऊस स्वतंत्रपणे एन्जोय करता येणं ह्यात खरी मजा आहे ;)
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 06/25/2020 - 15:21 नवीन
किती प्रांजळ प्रतिसाद! आवडला.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 06/23/2020 - 16:31 नवीन
क्लास ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 06/23/2020 - 16:48 नवीन
वा मस्तच पुन्हा वाचली.. अप्रतिम
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Tue, 06/23/2020 - 18:07 नवीन
सहज, सुंदर, मस्त!!
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Wed, 06/24/2020 - 18:46 नवीन
खूप छान ! चिंब पावसात हुरहूर लावणारी कविता.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 06/25/2020 - 15:22 नवीन
धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा