Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

माैन

म — मी-दिपाली, Sun, 06/21/2020 - 07:00
शब्दांचा प्रवास काहीच फर्लांग माैनाचा थांग निरंतर...॥ शब्दांचा अर्थ कळे यथामती माैनाची महती कोणा कळे ॥ शब्दांचे शस्त्र जिव्हारी घाव अंतरीचा ठाव माैन घेई ॥ शब्दांचे धन उजळली आभा माैनाचा गाभा अंधारात ॥ शब्दांचे नाते नांदे जिव्हेसंगे मनासवे रंगे माैन परि ॥

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4587 views

💬 प्रतिसाद
स
सनईचौघडा Sun, 06/21/2020 - 09:13 नवीन
आवडली आणि मौनाचा खरा अर्थ उलगडला हाच आहे.
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Sun, 06/21/2020 - 09:21 नवीन
अतिशय समर्पक मांडलीत मौनाची महती! हे लिहिण्यास मात्र शब्द लागतातच,हा व्यत्यासच! तो ही मान्यच!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 06/21/2020 - 09:37 नवीन
मौनाचे अभंग आवडले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 06/21/2020 - 09:43 नवीन
शब्दांचे शस्त्र जिव्हारी घाव अंतरीचा ठाव माैन घेई ॥ भारी
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 06/22/2020 - 06:45 नवीन
फार सुंदर!!!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 06/22/2020 - 08:19 नवीन
अतीव सुरेख कविता
  • Log in or register to post comments
श
श्रीकांतहरणे Mon, 06/22/2020 - 10:00 नवीन
फार सुंदर. मला आवडली पण मला संपुर्ण समजायला अजून माझी बौधिक पातळी मी वाढवायला हवी :-)
  • Log in or register to post comments
M
mrcoolguynice Mon, 06/22/2020 - 10:00 नवीन
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, कमी बोलबच्चन (बहुदा मौन) करायचे, परंतु कामाच्या बाबतीत सिंह .. (अर्थव्यवस्थेला प्रगतीवर आणण्याचं व ठेवण्याचं महान कार्य ) अशी सुंदर कविता वाचनात आली, त्यांच्या सारख्या लोकांचं महानपण अधिकच उजळ होत. I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media, or for that matter, the Opposition parties in Parliament. I cannot divulge all things that take place in the Cabinet system of government. I think, taking into account the circumstances, and the compulsions of a coalition polity, I have done as best as I could under the circumstances. I do not believe that I have been a weak Prime Minister. That is for historians to judge. -- डॉ मनमोहन सिंग (एक खरा पंतप्रधान )
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 06/22/2020 - 10:16 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Mon, 06/22/2020 - 13:21 नवीन
शब्दांचे शस्त्र, जिव्हारी घाव, अंतरीचा ठाव, माैन घेई .... _/\_
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 06/22/2020 - 20:24 नवीन
वाह!! सुरेख!!
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 06/23/2020 - 15:13 नवीन
मौनात गुंतले सारे यौनाचे मुक्त वारे धुंदावल्या दिशा दाही भासे सम सूर्य तारे '''''''''' क्षितिजात भेट झाली हृदयात थेट आली धमन्या त्या मंद साऱ्या रक्ताची लाट उसळली ''''''''''' हास्यात स्मित दडले डोळे डोळ्यांशी भिडले मौनाने मात केली हृदयाचे तुकडे पडले '''''''''''' गुंगावली मती सारी थंडावला जोश सारा गात्रांनी मात देता मेंदू ऊरे बिचारा ''''''''''''''
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा