रूटीनाच्या रेट्यातही
रूटीनाच्या रेट्यातही
कधी थोडं वेडं व्हावं
दवबिंदूत इवल्या
ओलं ओलंचिंब व्हावं
कानठळी कोलाहली
अंतर्नादी गाणं गावं
प्रमेयाच्या पंखाखाली
व्यत्यासांना विसरावं
चारोळीनं महाकाव्य
पचवून ढेकरावं
धीट शून्यानं शतदा
अनंताला हाकारावं
💬 प्रतिसाद
स
सत्यजित...
Sun, 06/21/2020 - 09:36
नवीन
अताच एका कवितेवर प्रतिसाद देताना शब्द-मौनातील व्यत्यास जाणवला होता,आणि इथे अजूनही व्यापक प्रमेयांच्या पंखाखाली विसावला!
चारोळीनं महाकाव्य पचवून ढेकर द्यावा...व्वाह्
शून्यानं अनंताला शतदा हाकारावं... सलाम शेवटच्या दोन ओळींसाठी!
अचाट लिहिता आपण! कविता वाचून होते तरीही कितीक वेळ या 'अनन्त-यात्री'सह तरंगत रहातो मी कुठेतरी!
- Log in or register to post comments
म
मूकवाचक
Mon, 06/22/2020 - 17:24
नवीन
+1
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Mon, 06/22/2020 - 16:58
नवीन
काय अफलातून शब्द योजलेत.
कविता आवडली.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Tue, 06/23/2020 - 04:45
नवीन
शब्द अन शब्द चपखल वापरला आहे... नेहमी प्रमाणेच...
पैजारबुवा,
- Log in or register to post comments