Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

ग्राहकमंच : सामान्यांचा हक्क !

स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/18/2020 - 11:43
💬 54 प्रतिसाद
बँक ऑफ इंडीयाचा नॅशनल इंशुरन्सबरोबर मेडी-क्लेमचा टाय-अप होता. बँकेच्या कस्टमर्सना माफक प्रिमियममधे मेडि-क्लेम कवर अशी योजना होती. फॉर्म भरतांनाच तिथे असलेल्या स्टँडींग इंस्ट्रक्शनवर सही करणं (प्रिमियम ड्यू डेटला खात्यातून परस्पर नॅशनल इंशुरन्सला पाठवला जाईल) अनिवार्य होतं. त्याशिवाय तो फॉर्म वॅलीड नव्हता. सात वर्ष प्रिमियम योग्य वेळी बँकेतून परस्पर खात्याला डेबीट होऊन पॉलिसी ऑटोमॅटीक रिन्यू होत होती. आठव्या वर्षी बँकेच्या गफलतीनं प्रिमियम भरायचा राहिला आणि पॉलिसी लॅप्स झाली. नेमक्या त्याच वर्षी पत्नीला हॉस्पिटलाइज करावं लागलं. पॉलिसी लॅप्स झाल्याची मला कल्पनाच नव्हती. तीला डिसचार्ज मिळाल्यावर क्लेम लॉज करायला गेलो तेंव्हा ही भानगड उघडकीला आली ! ________________________________ यावर बँकेनं खालील प्रमाणे सुरुवात केली : १. अशी स्टँडींग इंस्ट्रक्शन नव्हतीच ! २. प्रिमियम भरला की नाही हे पाहणं खातेदारीची जवाबदारी आहे. ३. आम्ही तुम्हाला फोन केला होता ! ( भिकारचोट वकिली सल्यानं धादांत खोटं ) ४. तुम्ही पूर्ण बिल मिळण्यासाठी बँकेला फसवून प्रिमियम चुकवला ! ( वकिली हलकटपणाची परिसीमा) ____________________________________ मी झोनल मॅनेजरला रितसर मेल पाठवली (तक्रार अर्ज) आणि भेटायला गेलो. कारण ग्राहकमंचाकडे तक्रार करण्यापूर्वी बँकेला रिड्रेसलची संधी मिळावी अशी अट आहे. त्यानं केबिनमधे असून पिएमार्फत भेट टाळली आणि माझा तक्रार अर्ज फेटाळला ! आता बँकेला अश्वदर्शन घडवल्याशिवाय सुधारणार नाही, हे लक्षात आल्यावर ग्राहकमंचाकडे दावा दाखल केला. ___________________________________ या कामाला बरीच चिकाटी लागते कारण बँकेचा वकील तद्दन हलकट आणि मुरलेला असतो. तारीख-पे-तारीख आणि बरीच काऊंटर आर्ग्युमंटस होतात. __________________________________________ मला दोनच गोष्टी प्रूव करायच्या होत्या : १. स्टँडींग इंस्ट्रक्शन असतांना बँकेनी प्रिमियम भरला नाही, त्यामुळे पॉलिसी लॅप्स झाली. (माझा ओरिजिनल फॉर्म, जो मी नॅशनलकडून मिळवला) २. ड्यू डेटला माझ्या खात्यात प्रिमियमपेक्षा जास्त बॅलन्स होता. (माझ्या बँक स्टेटमंटची कॉपी) _____________________________________ याच्या जोडीला मी आणखी दोन गोष्टी मिळवल्या : १. सात वर्ष पॉलिसी रिन्यू झाल्याची नॅशनल इंश्युरन्सचं हिस्ट्री स्टेटमंट आणि २. नॅशनल इंश्युरन्सनी बँकेला माझ्या पॉलिसीचा प्रिमियम भरण्यासाठी महिनाभर आधी पाठवलेली नोटीस ! हा सर्वात महत्त्वाचा पुरावा होता कारण त्यामुळे इंशुरन्स कंपनी जवाबदारीतून मोकळी होत होती आणि बँकेच्या गहाळपणाचा आरोप सिद्ध होत होता. _________________________________ मी सर्व कागदपत्र आणि माझं आर्ग्युमंट रितसर दाखल केल्यावर बँकेच्या वकिलाला तो पुरता कॉर्नर झाल्याचं लक्षात आलं. मग त्यानं तारखा मागायला सुरुवात केली. दुसर्‍या वेळी मी जजेसनां विनंती केली की जर बँकेचा वकिल पुढच्या वेळी हजर झाला नाही तर तुम्ही एकतर्फी सुनावणी करावी. _____________________________________ सुनावणीला भारी मजा आली ! वकिलानी आणखी सहा/सात खातेदारांचे अकाऊंटस आणले आणि असा स्टँड घेतला की इतर खात्यातून प्रिमियम्स वेळच्या वेळी गेलेत. बँकेची फिर्यादीशी दुश्मनी नाही. पण बँकेनं वेळोवेळी फोन करुन फिर्यादीनी पॉलिसी रिन्यू करण्याबाबत काहीच न सांगितल्यानं त्याची पॉलिसी लॅप्स झाली ! __________________________________ मी पॉलिसी हिस्ट्रीकडे निर्देश करुन सांगितलं की खातेदाराला फोन करण्याचा प्रष्णच येत नाही. माझी स्टँडींग इंस्ट्रक्शन होती आणि बँक सात वर्ष त्याच बेसिसवर प्रिमियम भरत होती. मला कुणाचाही फोन आला नव्हता. ज्या वेळी इंशुरन्स कंपनीनं महिनाभर आधी बँकेला पाठवलेली नोटीस, बँकेच्या सही-शिक्यासहित दाखवली गेली; तेंव्हा जजेसनं त्यावर वकिलाला त्याचा काऊंटर विचारला ! वकिल तोंडात मारल्यागत चूप झाला. आणि निकाल माझ्या बाजूनं लागला ! _________________________________ साधारण एक वर्ष ही प्रोसेस कंप्लीट व्हायला लागलं, पण माझं संपूर्ण बील (चाळीस हजार), इंशुअर्ड रकमेच्या आत असल्यानं, फक्त सात दिवसात माझ्या खात्यात जमा झालं !

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 13950 views

💬 प्रतिसाद (54)
स
संजय क्षीरसागर Sun, 06/21/2020 - 11:13 नवीन
तुम्ही एकदम व्यक्तिगत हल्ला केल्यामुळे मीही थोडा तिरकस प्रतिसाद दिला. मॅटर सेटल्ड ! तुमचे मनःपूर्वक धन्यवाद !
  • Log in or register to post comments
V
Vivekraje Sun, 06/21/2020 - 08:44 नवीन
माझे ICICI बँकेत गृहकर्जखाते आहे, त्याला संलग्न अशी त्याच बँकेची प्रोडेनशूल टर्म पॉलिसी आहे. कर्ज आणि पॉलिसी एकाच वेळी काढली. त्यानुसार कर्जाच्या खात्यातून पहिल्या पाच वर्षात रक्कम पॉलिसीत वर्ग होईल असे सांगितले. पहिली तीन वर्षे व्यवस्थित रक्कम वर्ग झाली. चौथ्या वर्षी मात्र कर्ज खात्यातून रक्कम वर्ग झाली नाही. मी चौकशी केली पॉलिसी ब्रँच ने लोन ब्रँच कडे बोट दाखवले, तिथल्या मॅनेजर नी आधितर असे कुठलेच ऑप्शन नसत असं सांगितलं. मग थोडं इतिहास सांगितला तेव्हा म्हटला ठीक आहे बघतो..हे बघतो म्हणजे तीन महिने झाले तरी बघतो पर्यंत होतं. मी तोपर्यंत नोडल ऑफिसला , ग्राहक सेवा केंद्राला तक्रार दिली त्यांचं उत्तर ठरलेलं...सात दिवसात आपली समस्या सोडविली जाईल.... ते सात दिवस पाच महिन्यापर्यंत चालले.....त्यात पॉलिसी ची अशुर्ड रक्कम 15 लाखा हुन 12 लाख झाली... आणि मग एकदा त्याच पॉलिसीची जाहिरात फेसबुक वर फ्लोट होत होतो...मी त्यावर अत्यन्त नकारात्मक अशी आणि बँक नंतर कुठलाच प्रतिसाद देत नाही, ही पॉलिसी लोकांनी काढुच नये अशी कमेंट दिली...अर्थात त्याचा काही उपयोग होईल असं मला वाटलं नव्हतं...पण ती कमेंट दिली आणि त्याला लोकांनी प्रतिसाद द्यायला सुरुवात केली...दुसऱ्याच दिवशी मला बँकेतून फोन आला आणि माझ्या कमेंट आणि तक्रारी बद्दल जाणून घेतले...आणि चक्क पुढच्या चार पाच दिवसात माझ्या पॉलिसीत पैसे भरून बँकेने ऑपलोजी मेल पण पाठवला....सामाजिक माध्यमात बँकेचं नावं खराब होण बँकेला परवडणार नव्हतं...
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 06/21/2020 - 08:59 नवीन

+१

  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 06/21/2020 - 11:21 नवीन
छान ! हा सुद्धा एक उपाय आहे. तो प्रायवेट बँकाच्याबाबतीत हमखास लागू पडतो. लोक आपल्या हक्काप्रती जितके जागरुक तितकी सर्विस बेस्ट !
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा