आमंत्रण
ओथंबल्या आभाळाला
स्वप्न हिरवं पडलं
त्याच्या दिठीत मावेना
तेव्हा धरतीला दिलं
वीज झेलण्या झुरतो
माथा बेलाग कड्याचा
कुरणांच्या पटावर
आज डाव पावसाचा
रिमझिमत्या ढगाच्या
पैंजणांची रुणझुण
सृजनाच्या सोहळ्याचे
ओलेचिंब आमंत्रण
💬 प्रतिसाद
र
रुपी
Mon, 06/15/2020 - 00:13
नवीन
खूप छान!
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Mon, 06/15/2020 - 04:24
नवीन
मस्त
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Mon, 06/15/2020 - 04:45
नवीन
सृजनाच्या सोहळ्याचे
ओलेचिंब आमंत्रण
पाउस कवितांचा शुभारंभ तर मस्त झाला आता पुढचे काहि दिवस वर्षामय होतील.
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
र
राघव
Mon, 06/15/2020 - 07:30
नवीन
आमंत्रण आवडले. :-)
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Mon, 06/15/2020 - 08:23
नवीन
कविता अतिशय आवडल्या गेली आहे.
सं - दी - प
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Tue, 06/16/2020 - 21:00
नवीन
रिमझिमत्या ढगाच्या
पैंजणांची रुणझुण
सृजनाच्या सोहळ्याचे
ओलेचिंब आमंत्रण
व्वा !
- Log in or register to post comments
च
चामुंडराय
Tue, 06/16/2020 - 23:48
नवीन
.
- Log in or register to post comments
र
रातराणी
Wed, 06/17/2020 - 07:40
नवीन
वाह!! ढगाला पैंजण घातलं ते अजून छान नाहीतर आमच्या कल्पनेत ढग म्हणजे नुसता नगाऱ्याचा गडगडाट :) :)
- Log in or register to post comments
ब
बबु
Wed, 06/17/2020 - 15:39
नवीन
हिरव्या स्वप्नाची रुणझुणती कविता! आवडली.
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Wed, 06/17/2020 - 16:03
नवीन
देणार्या सर्व कवितारसिकांना मन:पूर्वक धन्यवाद!
- Log in or register to post comments
म
मन्या ऽ
Sun, 06/21/2020 - 07:25
नवीन
मस्तच! :)
- Log in or register to post comments