Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

कास्तकाराचं दुखनं

अ
अंकुश इंगळे
Sun, 06/14/2020 - 13:34
🗣 53 प्रतिसाद
1 बेकार गोठ झाली राजेहो...बेलखेडात कांदा उचल्याले बेपारी येऊन नाही राहीले...आले त 350 - 400 रूपये किंटलनं मांगून रायले...खर्च बी निंगत नाही या भावात...! वावराईनं कांद्याचे गंजच्या गंज पडेल आहेत..रोज झाकाव अन् उघडा कराव गंज...हेच काम पुरून रायलं...कांदा भरून ठेवाव की इकाव ते बी नाई समजून रायलं...मांगलची उधारी अन् पुढच्या हंगामाचा खर्च कुठून कराव कास्तकारानं...? बेकार गोठ झाली...कोरोनापेक्षा हा प्रश्न गंभीर झाला...पन पेपरात बातमी नाई...! टिवीवाले हिंदू मुसलमान सांगून राहिले...! चायना, पाकीस्तान अन् अमेरीकेतल्या गोष्टी दाखून रायले..! पन भारतातल्या कास्तकाराचं दुखनं कोनीच नाई दाखून रायलं..! विश्वगुरू आत्मनिर्भर व्हा म्हनते...! कास्तकार भनानला भऊ...! तुमच्या येरीयात काय भाव चालू आहे ते सांगत जा हो तुईशीराम बॉ...तेवढाच अंदाज येते मानसाले...

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 25611 views

🗣 चर्चा (53)
म
मनो Fri, 06/19/2020 - 18:50 नवीन
सरकारचे एक चांगले पाऊल
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 06/20/2020 - 07:33 नवीन
मला काही शंका आहेत. १. “शेतकरीच फक्त शेतजमीन विकत घेऊ शकतो.” ह्या नियमाचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे की तोटा? २. असा नियम अथवा कायदा, भारतातल्या सर्व राज्यात आहे का? ३. “शेत जमीन विकता येते पण एकदा नाव उडले सातबार्‍यावरुन की मग पुन्हा ही वाट नाही.” त्यामुळेच वेगळी वाट चोखाळायचं धाडस होत नसेल का? ४. शेती जरी विकली तरी तो शेतकरी, त्याच्या आयुष्यात पुन्हा कधीही शेती विकत घेऊ शकेल अशी सवलत असल्यास, त्याचा फायदा होऊ शकेल काय?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 06/20/2020 - 08:02 नवीन
“शेतकरीच फक्त शेतजमीन विकत घेऊ शकतो.” ह्या नियमाचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे की तोटा? शेतकऱ्यांबद्दल माहिती नाही परंतु अडते आणि दलाल यांचा मात्र फायदा झालेला आहे. योग्य ठिकाणी पैसे दिले कि त्या राज्यातील सात बाराच्या उतार्यावर तुमचे नाव येते. मग तो एक गुंठा का असेना. आणि त्या पुराव्यावर आपण कितीही जमीन विकत घेऊ शकता. पुरेसे पाहसी असले कि हरणाने आत्महत्या केळींचेही सज्जड पुराव्यानिशी दाखवता येते मग हि तर किरकोळ गोष्ट आहे मग राजकारण्याबरोबर साटेलोटे करून जमीनीचा एन ए करून तेथे घरे बांधून प्रचंड पैसे कमावता येतो याचा भूखंड आणि श्रीखंड आवडणाऱ्या राजकारण्यांनी महाराष्ट्रात आदर्श घालून दिलेला आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 22 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 23 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 23 hours ago
  • सुंदर !!
    1 day 23 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 23 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा