Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

लिही तू..

प
पाटिल
Sun, 06/14/2020 - 08:21
💬 2 प्रतिसाद
https://www.maayboli.com/node/75035 (सदर लेख मी, वरील धाग्यावर, मायबोलीवर पूर्वप्रकाशित केला आहे. ) लिही तू.. एवढे सगळे जण लिहितायत. आणि तू कशाला लाजतोयस येड्या? पण तुझ्यापुरतं, तुला आत्ता जे खरं वाटतंय ते लिही. किंवा तेच लिही. आत्ता दुनियेबद्दल दाटून दाटून येणारे प्रेमाचे उमाळे जसे फोलकट आहेत तसेच नंतर कधीतरी, स्वत:बद्दल चहूबाजूंनी चालून येणार्‍या घृणेच्या लाटाही बोगसच असतील, हे लक्षात घेऊन लिही. सेक्सबद्दल डायरेक्ट नकोस लिहू. आदिम भावनांचा शोध घेत असल्याचा आव आणत, आडून आडून, पण नेम धरून त्याच मुद्द्यावर घसरत जाण्याची एक नवीन पद्धत काढलीय आपल्या काही चॅप्टर लोकांनी... तुझा पण तसलाच काही डाव आहे की काय...? नाही ना..? मग एखाद्या रात्री, ढगांच्या गडगडाटासकट आलेला वादळी सेक्स ओसरल्यानंतर, साकळून आलेल्या प्रशांत गहिर्‍या संपृक्त मूडबद्दल किंवा नंतरच्या मन उडून गेलेल्या टेंपररी विरक्तीबद्दल लिही. फक्त 'कशात काही अर्थ नाही' असं वाटायला लागलं की लिहिण्यातही काही अर्थ नाही म्हणून पोस्टपोन नकोस करू... उलट तोच धागा घट्ट पकडून आणखी खोलवर कुरतडत जाता आलं तर बघ.. जेवढा आत आत जाशील तेवढा सुटा सुटा तरी होत जाशील किंवा एकदाचा काय तो निकाल तरी लागेल. लिहिताना त्या थोर-थोर, ग्रेट वगैरे लिहिणार्‍या लोकांचा लोड घेऊन लगेच भारावून नकोस जाऊ नेहमीसारखा किंवा हातपाय गाळूनही बसू नकोस.. जसजसा वाढत जाशील तसं हे ही कचरापट्टी वाटायला लागणार आहे एखाद्या दिवशी. सो चिल मार.. ते सामाजिक जाणिवा किंवा मानवी नातेसंबंधांचे गूढ पदर वगैरे तर पहिलं बाजूला सारून ठेव. तुला ते झेपणारं नाही. आणि तुझी भाषा तथाकथित अशुद्ध असल्याचा खुळा गंड लपवण्यासाठी त्या तथाकथित शुद्ध भाषावाल्यांना ऊठसूठ बोचकारे काढण्यात कशाला ऊर्जा वाया घालवायची उगाच? तुझी भाषा हजारो पिढ्यांचे गुणधर्म घेऊन खळाळत प्रवाहीत होत, आपोआप विनासायास तुझ्या डीएनएमध्ये उतरलेली आहे आणि त्याचमुळे ती अस्सल चवीची आहे, हे अंतिम सत्य उमजून तुझा तुझा रस्ता सुधार. आणि शेवटचं म्हणजे अजून किती दिवस-रात्री हे असं अधांतरी उलटं लटकायचं आहे, हे एकदा नीट बसून कॅलक्युलेट करून ठरवून घे. (तुझ्याच्यानं होत नसेल तर मला सांग... माझाही सेम प्रॉब्लेम आहे.) अर्थात ह्याचेही काही फायदे दिसत असतीलच म्हणा तुला... फांदी घट्ट पकडून सुरक्षित असल्याचं फीलींगही येतं आणि लोक मला उंच उंच उडू देत नाहीत म्हणून, अन्याय झाल्याची बोंबही ठोकता येते अधूनमधून... पण लाँगटर्मसाठी हे काही बरं नाही. आता लगेच, "ह्या अनादि अनंत पसरलेल्या ब्रह्मांडात माझ्यासारख्या क्षुद्र जीवासाठी कसलं आलंय लाँगटर्म आणि कसलं शॉर्टटर्म!!!" असली बाबागिरी चालू करू नकोस.. झोप त्यापेक्षा. आणि मला पण झोपू दे. दुपारची झोप मोडली की वस्सकन अंगावर धावून जायची सवय लागायला लागलीय मलापण इथं राहून राहून..!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1930 views

💬 प्रतिसाद (2)
अ
अर्धवटराव Tue, 06/16/2020 - 04:39 नवीन
झकास.
  • Log in or register to post comments
प
पाटिल Tue, 06/16/2020 - 05:16 नवीन
@अर्धवटराव... धन्यवाद..!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 22 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 22 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 22 hours ago
  • सुंदर !!
    6 days 22 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा