Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

आई घरी जायला निघते तेव्हा...

प — प्राची अश्विनी, Sat, 06/13/2020 - 06:05
आई घरी जायला निघते तेव्हा, प्रवासासाठी म्हणून केलेले तिचे पराठे थोडे जास्तच होतात, चुकून. फ्रिजमध्ये केलेली असते माझ्या आवडीची केळफुलाची भाजी, रसाची आमटी.. बाबांकडून खवून घेतलेलं खोबरं, सोललेला लसूण.. डब्बा भरलेला असतो तिखट पु-या, चकलीनं.. दाण्याचं कूट, जीरेपूड, धणेपूड.. कधी करते कोण जाणे! आवरून ठेवलेला असतो बेड. उशांचे अभ्रे, अंथरूण पांघरूण धुवायच्या कपड्यात, कपाटात असतो पाठदुखीवरचा संपत आलेला स्प्रे, डायबेटीसच्या गोळ्यांची पाकिटं. ड्रॉवरमध्ये असतं मी दिलेलं पर्फ्युम, क्रीम वगैरे "राहू दे इथंच, पुढच्या वेळेला मलाच होईल म्हणून" नातींची नावं लिहून ठेवलेली पाकिटं हमखास विसरलेले मी दिलेले पैसे.. मला आठवतात उगाच तिच्याशी घातलेले वाद तिच्यावर काढलेला सगळ्या जगाचा राग माझा चढलेला आवाज अन् तिच्या डोळ्यतलं पाणी. निघताना सामान ठेवायच्या गडबडीत राहून गेलेला नमस्कार, मिठी.. डोळ्यातलं पाणी अडवत मी फोन करते, कुठे पोचलीस विचारायला. ते बोलून ती वर म्हणते, "लोणी कढवायचं राहिलंय, आज कर ते . आणि पायात आठवणीनं मोजे घाल, भेगा पडतील नाहीतर...." आई घरी जायला निघते आणि मी पुन्हा मोठी होते..

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 13810 views

💬 प्रतिसाद
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 06/13/2020 - 06:42 नवीन
या आया अशाच असतात.. आणि मुली पण... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
र
रातराणी Sat, 06/13/2020 - 07:12 नवीन
सुरेख!! अगदी मनातली कविता!
  • Log in or register to post comments
प
पलाश Sat, 06/13/2020 - 07:23 नवीन
शब्द न् शब्द आपलासा वाटला. जीव गुंतलेला असतो पण सोडून जायला लागतंच. आणि मुली मोठ्या होतात! खूप सुंदर लिहिलं आहे. _/\_
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 06/13/2020 - 07:31 नवीन
वा मस्त कविता.. आवडली.. मनात बसली कविता.. असेच अविनाश काकांची आणि त्यावरुन तेंव्हा मी लिहिलेली हि सासरला मुलगी जाते ती कविता आठवली.. लिंक देतो
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 06/13/2020 - 07:35 नवीन
ह्या कविता आठवल्या.. तुमच्या कवितेवरून.. तुमची कविता पण अशीच आवडली कारण लग्न करून तू सासरी गेली आहेस
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 06/13/2020 - 11:55 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Sat, 06/13/2020 - 07:58 नवीन
आत डोकवायला लावणारी कविता
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 06/13/2020 - 08:13 नवीन
छान आहे कविता. आमच्याकडे आईला सोडून निघायचं असतं, तेव्हा पावलं निघत नाहीत ते आठवलं.
आई घरी जायला निघते आणि मी पुन्हा मोठी होते..
असं काही वाचलं की मला संदिप खरेच्या "नसतेस घरी तू जेव्हा" कवितेचं शेवटचं कडवं आठवतं. कविता बायकोला उद्देशून असली तरी हे शेवटचं कडवं का कोण जाणे आईसाठी जास्त योग्य वाटतं. ना अजून झालो मोठा ना स्वतंत्र अजुनी झालो तुजवाचून उमगत जाते तुजवाचून जन्मच अडतो !
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 06/13/2020 - 11:56 नवीन
करंय, हे आईसाठी जास्त योग्य वाटतं
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 06/14/2020 - 03:03 नवीन
खूपच सुरेख
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 06/14/2020 - 07:07 नवीन
अहाहा.... !क्लास. आवडली कविता. पुस्तक करा निवडक कवितेचं विसरु नका. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sun, 06/14/2020 - 07:20 नवीन
पैजारबुवा, रारा , गणेशा, पलाश, सगा, बिपीन सांगळे, प्रचेतस, बिरुटे सर.... धन्यवाद!
  • Log in or register to post comments
र
राघव Sun, 06/14/2020 - 11:49 नवीन
आवडली कविता. सुंदर.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 06/15/2020 - 09:01 नवीन
मोठं होऊन पुन्हा लहान करुन गेली कविता..
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Mon, 06/15/2020 - 17:47 नवीन
अप्रतिम!!!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 06/16/2020 - 09:10 नवीन
सस्नेह, वीणा आणि राघव... धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Sun, 06/21/2020 - 07:11 नवीन
कविता आवडली..
  • Log in or register to post comments
श
श्रीकांतहरणे Mon, 06/22/2020 - 19:13 नवीन
हम्म .... छान फार संवेदनशील ... आमच्याकडे आम्ही मुंबईला परत येतो, तेव्हा आमची बॅग आईच्या मायेने भरते. माझ्याकडून एक शर्ट घे रे, म्हणून अजूनही ती खिशात पैसे ठेवते. आमची काळजी करू नको, स्वतःला जप वारंवार सांगते. तिला का तर काय माहीत? मी नेहमी रोड झालो असेच वाटते. अरे तब्बेतीकडे लक्ष दे ....अशी न संपणारी लिस्ट .....शेवटी ती आईच ना.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 06/23/2020 - 13:20 नवीन
खरंय. आई म्हणजे आईच.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 06/23/2020 - 20:23 नवीन
वाह छानच!
  • Log in or register to post comments
म
मीअपर्णा Wed, 06/24/2020 - 22:41 नवीन
असा अनुभव नाही कारण आम्हा बाहेरच्या देशात राहणार्‍यांची परिस्थिती थोडी वेगळी. हे वर्णन वाचून तेही सत्य डोळ्यापुढे उभे राहिले. छान लिहिलंय काव्य :)
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 06/25/2020 - 15:21 नवीन
मिका, मीअपर्णा धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा