Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

जुना वाडा

म — मनोज, Fri, 06/12/2020 - 08:04
एक जुना वाडा भंगलेले तुळशी वृंदावन विरलेली स्वप्नं अन् उदास माझं मन परसातल्या चाफ्याला आता येत नाहीत फुलं अंगणात कधीच खेळत नाहीत मुलं ओसरीवरचा चौफाळा वाऱ्यासोबत रडणारा दारातील पिंपळ दिवसभर झडणारा गंजलेले तावदान कुजलेली खिडकी धुळीने माखलेली उतरंडीची मडकी माळवदातील घरटं चिमणीने सोडलंय दारावरचं आडनाव केंव्हाच मोडलंय

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5962 views

💬 प्रतिसाद
ग
गणेशा Fri, 06/12/2020 - 13:09 नवीन
कविता भारी.. माझं गावाकडचं पडलेलं माळवदाचं घर समोर आले.. त्याच्या बाजूला अजूनही पिंपळ तसाच आहे.. त्या घरात गेल्यावर आज्जी ने जिथे मला एकदा नको म्हणालो तरी पुरणपोळी केली होती त्याची आठवण आली.. आत्ताच मागे गेले होतो.. फोटो पण असेल बहुतेक..
  • Log in or register to post comments
म
मनोज Fri, 06/12/2020 - 15:07 नवीन
धन्यवाद! माळवद शब्द फार लोकांना माहित नसे असे मला वाटते. बहुदा मराठवाड्या मध्ये जास्त वापरला जातो !
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 06/12/2020 - 21:04 नवीन
आमच्या पश्चिम महाराष्ट्रात पण वापरायचे की सगळे हा शब्द... माझ्या मामाचे तर अलीकडे पर्यंत मालवदाचेच घर होते...
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Fri, 06/12/2020 - 14:17 नवीन
मस्त. मीही एक कविता जुन्या वाड्यावर केली होती. ती आठवली जाहिरात करतो थांबा http://www.misalpav.com/node/30317
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 06/12/2020 - 14:25 नवीन
वा मस्त आहे कविता.. आता हि लिहीत रहा..
  • Log in or register to post comments
म
मनोज Fri, 06/12/2020 - 15:10 नवीन
वैभवशाली अस्तित्वाच्या उध्वस्त खुणा - खूप सुन्दर !!! आवडली !!
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Fri, 06/12/2020 - 15:46 नवीन
चित्रदर्शी कविता! माळवद म्हणजे माळावरच घर. असा काही अर्थ आहे का शब्दाचा? माझ्या वाचनात पहिल्यांदाच आलाय हा शब्द.. :)
  • Log in or register to post comments
म
मनोज Fri, 06/12/2020 - 17:38 नवीन
मन्या ऽ धन्यवाद !! मराठवाड्या मध्ये माळवद हा शब्द छत या अर्थाने वापरला जातो. लाकडाची फ्रेम करून त्यावर चिखल अंथरला जातो.
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Fri, 06/12/2020 - 19:16 नवीन
अच्छा! हे माहिती नव्हते.. मी गावाकडची फक्त कौलारु घरे बघितली आहेत.. त्यामुळे हा शब्द माझ्यासाठी नवीनच..
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Fri, 06/12/2020 - 17:57 नवीन
कविता छान आहे, पण आवडली म्हणवत नाही, एकेकाळी गोकुळ असलेली अशी पडकी घरं बघून वाईट वाटतं, काळाचा महिमा, दुसरं काय :(
  • Log in or register to post comments
म
मनोज Fri, 06/12/2020 - 18:45 नवीन
धन्यवाद वीणा ..खरं आहे आमचा पण असा जुना वाडा होता... आता कोणी राहत नाही पडला आहे :(
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा