Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

त्रासदायक आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी?

क
कानडाऊ योगेशु
गुरुवार, 06/04/2020 - 19:20
🗣 128 प्रतिसाद
साधारणपणे दहा-बारा वर्षापूर्वी बेंगलोरमध्येच भाड्याच्या घरात राहत होतो. घराची मालकणी शगुफ्ता नामक (नाव मुद्दामुन लिहिले आहे.वस्सकन अंगावर येऊ नये.)एक स्त्री होती. घराचे डिल होण्याअगोदर तोंडात साखर ठेवुन बोलायची.माझे नुकतेच लग्न ठरले होते.गोड तर इतकी बोलत होती कि मी माझ्या होणार्या बायकोचा व तिचाही लग्नाअगोदर फोनवर संवाद घडवुन आणला. उदा. भाईसाब आप फिकर मत किजिए. आय विल बी अ‍ॅट युअर सर्विस.वगैरे. (हेच वाक्य लक्षात राहण्याचे कारण पुढे येईलच.) पण जेव्हा घरात राहायला सुरवात केली व अ‍ॅग्रीमेंट वगैरे सोपस्कार..त्यापेक्षा बेंगलोरच्या रितिनुसार साधारण आठ-दहा महिन्यांचे आगाऊ भाडे अनामत म्हणुन तिला दिले त्यानंतर तिने खरे रंग दाखवायला सुरवात केली. म्हणजे एकदम विलन न बनता काही छोटी मोठी कामे घरात निघाली तर वो आप ही देख लो हेच पालुपद. ( आय विल बी अ‍ॅट युअर सर्विस ची ऐशीतैशी )ह्यात ड्रेनेज लॉक होणे, पाण्याचे मीटर खराब होणे असे काही गंभीर समस्या होत्या. मालकीणीचा चार फ्लॅट असलेला इंडिपेंडंट बंगला होता त्यामुळे बाकिच्या भाडेकरुंशी संवाद साधुन ही कामे करावी लागत आणि भाडेकरुही तिने केवळ अर्थप्राप्ती हा निकष ध्यानात घेऊन ठेवले होते. (बॅचलर्स वगैरे).त्यांना मॅनेज करणे अजुन एक दिव्य होते. ती स्वतः दुसरीकडे राह्त होती मालकीणीचा नवरा चांगल्या कंपनीत कामाला होता व एकदा ती उपलब्ध नसल्याने पाणी न येण्याची एक समस्या त्याच्या कानावर घालुन कृपया हीच निराकरण करा अशी विनंती केली असता घर खाली करण्याची धमकी दिली होती त्यामूळे जपूनच बोलणी करावी लागत. ते असो. पुढे त्या घरातुन दुसरीकडे शिफ्ट झालो तेव्हाही तिने पत्नीचा अप्रत्यक्ष पाणउतारा केला. पत्नी ह्याबद्दल तारतम्य बाळगुन विचार करणारी असल्याने तिने ह्याकडे कानाडोळा केला. पण आज बारा वर्ष होत आली आणि ही गोष्ट अधेमधे आठवत असायची.पण सध्या लॉकडाऊनच्या काळात का कुणास ठाऊक माहीती नाही पण सकाळी उठल्या उठल्या प्रातर्विधी उरकतानाच एकदा तरी आठवत राहते(त्या दृष्टीने प्रातःस्मरणीयच) आणि मनस्थिती लगेच बदलते. थोडक्यात प्रेमभंग झालेल्या प्रेमीसारखी मनस्थिती होते.(!) थोडा बारीक विचार केला असता लक्षात आले कि माझा जो काही पाणउतारा केला तो एकवेळ मी विसरलो असतो पण पत्नीचा केलेला पाणउतारा विसरणे अवघड वाटतेय. ह्याबाबतीत खुद्द पत्नीलाच विचारले असता तिने सांगितले कि अश्या गोष्टींचा ती जास्त विचार करत नाही. ती स्वतः दिल्लीत राहीली आहे आणि अश्या गोष्टी आधीही अनुभवल्या आहेत.ते ही असो पण ह्या गोष्टीनंतर गोड बोलणार्या कुठल्याही व्यक्तीवर पटकन विश्वास बसत नाही. लगेच अँटीना चालु होतो कि काहीतरी उद्देश अस्णार. पण अश्या मनस्वास्थ्य बिघडवणार्या आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 99392 views

🗣 चर्चा (128)
म
मोदक Sun, 06/07/2020 - 21:22 नवीन
आणि प्रत्येक असफल विवाहाची हीच कथा असते. माझा मुद्दा सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 06/08/2020 - 10:31 नवीन
यातून तुमचा मुद्दा सिद्ध होत नाही, तर दोन गोष्टी सिद्ध होतात : एक, अनाकलन किंवा दोन, अनूभवशून्यता. अनाकलन दूर होण्यासाठी पुनर्वाचन आणि अनुभवशून्यता दूर होण्यासाठी वाट बघणे यापैकी योग्य तो पर्याय निवडता येईल. ______________________________ आता तुम्ही जो मानशास्त्राचा अभ्यास केला आहे त्यावरनं " जगातल्या कुठल्याही बाळाला त्याची कुठलीही चूक नसताना वाईट घरात का जन्म मिळतो ? " याचं उत्तर इथे द्या. म्हणजे तुमचा काय अभ्यास आहे ते सर्वांना कळेल. _______________________________________ अन्यथा तुमचे प्रतिसाद असंबद्ध आणि केवळ धागा भरकटवण्यासाठी होते हे उघड होईल.
  • Log in or register to post comments
म
मोदक Mon, 06/08/2020 - 11:11 नवीन
मूळ मुद्दा हा आहे की, प्रत्येक असफल विवाहामागे मोहच दडलेला दिसेल ! या कमेंटचा धाग्याशी काय संबंध आहे..? धागा हा एका सदस्याच्या मानसिक त्रासासंदर्भात उत्तर शोधण्यासाठी असताना तुम्ही चर्चेला मोहाकडे वळवले आणि नंतर असफल विवाहाचे टुमणे कुठूनतरी शोधून आणले. जर तुमच्या मते "सगळा लेखच निर्णयाच्या प्रक्रियेचा उलगडा होण्यासाठी आहे" तर धाग्यात लेखकाने घेतलेल्या निर्णयाची वस्तुनिष्ट पद्धतीने उकल झाली आणि त्याचा पुन्हा त्रास होऊ नये म्हणून वेगवेगळ्या लोकांनी त्यांना उपाय सुचवून झाले - म्हणजे योग्य चर्चा झाली आहे. असे असताना असफल विवाह हा मुद्दा आलाच कुठून..? ___________________________ प्रश्नाचे उत्तर न देण्याचा हक्क राखून ठेवत आहे. ___________________________ तुमचे प्रतिसाद नेहमीप्रमाणे असंबद्ध आणि केवळ धागा भरकटवण्यासाठी आहेत हे एव्हाना उघड झाले आहे. त्यामुळे हा ही धागा वाचनमात्र करण्याचा तुमचा प्रयत्न अयोग्य आहे इतकेच नोंदवत आहे.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 06/08/2020 - 15:53 नवीन
पुन्हा तेच ! या प्रतिसादावरुन आता आणखी एक गोष्ट उघड होते, तुम्ही पुढचे मागचे प्रतिसाद न वाचताच, काहीही प्रतिसाद देता ! आता तरी नीट वाचा, म्हणजे पुन्हा तेच ते सांगावे लागणार नाही. ___________________________ "सगळा लेखच निर्णयाच्या प्रक्रियेचा उलगडा होण्यासाठी आहे" अत्यंत साधी गोष्ट आहे (आणि जी आधीच्या प्रतिसादात सांगितली आहे), ती अशी की इतकी रक्कम देण्यापूर्वी तिथल्या भाडेकऱ्यांना त्यांचा अनुभव विचारला असता तर एका झटक्यात मालकीणीची महती कळली असती ! पण मोह अशी काही स्वप्र रंगवतो की समोरचं प्रपोजल सगळ्यात बेस्ट वाटायला लागतं ! मोहाची ही किमयाच प्रत्येक फसवणूकीचं कारण असते. मग तो विवाह असो, आर्थिक प्रश्न असो की इतर व्यावहार ! त्या वेळी ते प्रपोजल जगातलं एकमेव वाटायला लागतं आणि व्यक्ति निर्णय घेते. _______________________________________________ आता (तरी) लेखावरचे सर्व प्रतिसाद नीट वाचले असतील तर हे लक्षात येईल की सदस्यांनी हा धागा पूर्वसंचिताकडे वळवला आहे अर्थात, तो वीणा या सदस्येनं या आधीच वळवला होता. त्याला अनुसरुन मी पुनर्जन्म हा मुद्दा कसा चुकीचा आहे ते सविस्तरपणे लिहीलं आहे. तुम्ही नेहेमीप्रमाणे ते न वाचताच धागा भरकटवण्यासाठी असा प्रतिसाद दिला : पुनर्जन्म... असफल विवाह.. आता हळूहळू मुंबई विरूद्ध पुणे, व्हेज विरूद्ध नॉन व्हेज असे मुद्दे पण येऊदेत. मग धाग्याचा चहूअंगानं खरडफळा होईल __________________________________ आणि आता स्वतःची चूक लक्षात आल्यावर, पुनर्जन्म हा मुद्दा खुबीनं टाळला आहे ________________________________________ >प्रश्नाचे उत्तर न देण्याचा हक्क राखून ठेवत आहे ? आता हा धागाच पूर्वसंचिताकडे वळल्यानं आणि तुम्ही मानसशात्राचे व्यासंगी आहात अशी शेखी मिरवल्यानं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणं क्रमप्राप्त झालं आहे : " जगातल्या कुठल्याही बाळाला त्याची कुठलीही चूक नसताना वाईट घरात का जन्म मिळतो ? आता उगीच शेपूटगिरी न करता उत्तर द्या अर्थात, ते तुम्हाला कदापिही देता येणार नाही आणि त्यामुळे `हक्क राखून ठेवला आहे' हा शुद्ध पलायनवाद आहे हे सिद्ध होईल.
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 06/09/2020 - 13:42 नवीन
आता असे आहे.. धागा लेखकाने मुद्दा मांडला, त्याला लोकांनी यथाशक्ती उत्तरे दिली आणि विटेकरकाकांच्या प्रतिसादावर धागालेखकाने सहमती दाखवली. मग तुमची थिअरी लोकांना पटली नाही म्हणून तिळपापड का होतो आहे..? जगातल्या यच्चयावत तत्वज्ञानाचा अभ्यास करू तुम्हाला स्व गवसलेला आहे ना.. मग तो इतका हलका आहे..? _____________________________________________ " जगातल्या कुठल्याही बाळाला त्याची कुठलीही चूक नसताना वाईट घरात का जन्म मिळतो ? याला माझ्या लेखी "पूर्वसंचित" हेच उत्तर आहे. _____________________________________________ आता उगीच शेपूटगिरी न करता उत्तर द्या यावर तुमच्यापेक्षाही झणझणीत उत्तर देऊ शकतो पण पायर्‍या खाली उतरून तुमच्या लेव्हलला यायची इच्छा नाही. त्यामुळे पास.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 06/09/2020 - 13:56 नवीन
तुमचा मानशास्त्राचा अभ्यास इतका प्रगाढ असेल याची कल्पना होतीच. आता हे वाचा आणि : १. जगाची लोकसंख्या ७८० कोटी आहे. २. या ७८० कोटी लोकांच्या सर्व कृत्यांचा डेटा प्रत्येक दिवशी किती होईल ? ३. कर्मविपाक वॅलीड होण्यासाठी असा नक्की किती पूर्वजन्मांचा डेटा लागेल ? ४. हा सर्व डेटा नैतिक मूल्यांवर कसा सॉर्ट केला जातो ? उदा. वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवणं हा अतिरेक्यांच्या दृष्टीनं स्वर्गप्राप्तीचा रस्ता आहे पण जगाच्या दृष्टीनं ते सर्वोच्च पाप आहे. तर याचा निवाडा करणारी सिस्टम जगात कोणता माईचा लाल बनवतो ? ५. हा ७८० कोटी लोकांचा (तुम्ही सांगाल तितक्या जन्मांचा) डेटा नक्की कुठे स्टोअर केला आहे ? ६. हा सर्व डेटा हरेक क्षणी प्रोसेस करुन, प्रत्येकाचं विधीलिखित ठरवणारी यंत्रणा नक्की कशी काम करते ? आता हे तुमचं `पूर्वसंचित' कसं काम करतं याचं उत्तर द्या. शिवाय तुम्हाला आवडेल अशी शब्दरचना घ्या : उत्तर देण्याचा हक्क राखीव ठेवणं हा पलायनवाद आहे. तस्मात, उत्तर द्या.
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 06/09/2020 - 15:09 नवीन
खाली जुगलबंदी सुरू आहे ना..? ती झाली की बोलू. :)
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 06/09/2020 - 17:03 नवीन
> ती झाली की बोलू ? जुगलबंदीकडे मी बघतो. तुम्ही अजिबात विचलीत होऊ नका. आता तुमच्यावर फार मोठी जवाबदारी आली आहे.... कारण विटेकर तर काही बोलत नाहीत आणि तुम्ही छातीठोकपणे जाहीर केलंय "याला माझ्या लेखी "पूर्वसंचित" हेच उत्तर आहे." त्यामुळे मानसशास्त्राचा एक प्रगाढ अभ्यासक काय ज्ञानदीप पेटवतो आणि पूर्वसंचिताच्या गहन संकल्पनेचा कसा उलगडा करतो; शिवाय मुद्दा न भरकटवता तो संकेतस्थळाला आपलं अमूल्य योगदान कसं प्रदान करतो याकडे लक्ष लागून आहे. आता मागे हटू नका.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Tue, 06/09/2020 - 15:42 नवीन
मी काय म्हणतो संक्षी सर, हा कर्मविपाक सिध्दांत,आस्तिकत्व व त्याअनुषंगाने येणारे पुनर्जन्म इ. प्रकार चार्वाकसंहितेने अगोदरच थोतांड ठरवलेले आहे. दोन्ही बाजुने मतप्रदर्शन व्यक्त करायचे म्हटले तर अगणित साहित्य उपलब्ध आहे त्यामुळे अश्या चर्चेतुन नवे असे काही निष्कर्ष होणार नाही. उदा.
यावज्जीवेत सुखं जीवेद ऋणं कृत्वा घृतं पिवेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ॥
( विकिपिडियाने पाजळलेले ज्ञानामृत.) त्यामुळे हे कसे चूक वा बरोबर आहे ह्या वादाचा अंत नाही. व्यक्तिशः माझा वरील सर्व गोष्टींवर दृढ विश्वास आहे पण एकवेळ मान्य करु कि हे सगळे थोतांड आहे पण त्याने तुमची थेअरी बरोबर आहे हे सिध्द होत नाही. त्याहीपेक्षा मी असे म्हणेन कि तुमच्याकडे नक्कीच वेगळे काहीतरी सांगण्यासारखे आहे पण ते पटवुन देण्याची जबाबदारी सर्वस्वी तुमचीच आहे. नाहीतर मी म्हणतो तेच खरे हा झाकिर नाईक टाईप हेकटपणा झाला.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 06/09/2020 - 15:48 नवीन
चल योगी, आपण सगळेजण त्या शागुफ्ता ला शिव्या देऊन येऊ. लैच त्रास दिला रे आपल्या सगळ्यांना.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Tue, 06/09/2020 - 16:06 नवीन
चल योगी, आपण सगळेजण त्या शागुफ्ता ला शिव्या देऊन येऊ.
अरे त्यापासुन सुटका हवी म्हणुन तर धागा काढला ना भौ! :(
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 06/09/2020 - 16:41 नवीन
> सांगण्यासारखे आहे पण ते पटवुन देण्याची जबाबदारी सर्वस्वी तुमचीच आहे. अर्थात, आणि तेच तर करतोयं ! पण लोक्स जर पुनर्जन्ममधे आणून त्यावर कोणतंही लॉजिक न देता, त्यांचा हट्टच सोडत नाहीत तर खरे झाकिर नाईक कोण आहेत ते बघा !
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 06/13/2020 - 14:26 नवीन
मला हा प्रतिसाद आणखी किती उजवीकडे सरकतो हे बघायचे आहे म्हणून आलो, एक मस्त लांबलचक प्रतिसाद दिला की एका ओळीवर एक अक्षर येते.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 06/13/2020 - 14:42 नवीन
कुणाला कशाचं तर बोडकीला केसाचं =))
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 06/13/2020 - 18:15 नवीन
इथे दुसरे काय सुरू आहे
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Sun, 06/14/2020 - 01:21 नवीन
बघू आणखी किती उजवीकडे सरकतो ते?
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sun, 06/14/2020 - 08:09 नवीन
ह्याला खिंडीत गाठणे असे म्हणतात. ;)
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sat, 06/06/2020 - 12:02 नवीन
पण मोह अशी काही स्वप्र रंगवतो की समोरचं प्रपोजल सगळ्यात बेस्ट वाटायला लागतं ! मोहाची ही किमयाच प्रत्येक फसवणूकीचं कारण असते. मग तो विवाह असो,आर्थिक प्रश्न असो की इतर व्यावहार ! त्या वेळी ते प्रपोजल जगातलं एकमेव वाटायला लागतं आणि व्यक्ति निर्णय घेते.
निर्णय घेणे ही फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि बर्याच वेळेला मर्यादित गोष्टीना (रिसोर्सेस) विचारात घेऊन त्यावेळेला योग्य वाटेल असा निर्णय घ्यावा लागतो. दरवेळेला मोहात पडल्यामुळेच निर्णय घेतला व चुकला असे नसते. प्रत्येक वेळेला चिकित्सक होऊन बाल कि खाल काढुन निर्णय घ्यायला गेलो तर वेळ व पर्याय हातातुन निघुन जातो. भविष्याबद्दल असलेल्या अश्या अनभिज्ञतेमुळेच आयुष्य रोचक बनते.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 06/06/2020 - 12:58 नवीन
> फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ? निर्णय घेतांना फक्त दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक, माणूस ओळखता येणं, आणि दोन, निर्णय घेणार्‍याची हेतू शुद्धता ! व्यावहारात एक फार सोपं प्रिंसिपल आहे : Don't Use the Other, and Don't Allow the Other to Use You ! Then It is Always a Fair Play.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 06/06/2020 - 18:48 नवीन
> वाईट घरात का जन्म मिळतो?" अस्तित्वात कुणाचाही कुठलाही डेटा स्टोअर करणारी यंत्रणा नाही. सर्व डेटा हा व्यक्तीच्या मेंदूशिवाय इतर कुठेही नसतो. हा बेसिक फंडा आहे. व्यक्तीच्या निधनानंतर देहाबरोबर मेंदूही पंचत्त्वात विलीन होतो. एक कहाणी संपन्न होते. त्यामुळे व्यक्तीचं पूर्वसंचित ही कल्पना निराधार आहे. _________________________________________ अस्तित्व हा क्षणोक्षणी चाललेला एक अतीविशाल कॅलिडोस्कोप आहे त्याच्या सर्व प्रक्रिया परस्परावलंबी आणि स्वयंचलीत आहेत. उदा. पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर १५ कोटी किलोमीटर आहे. म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरत, १५ कोटी किलोमीटर त्रिज्येच्या वर्तुळाची प्रदक्षिणा एका वर्षात पूर्ण करते ! अशा अनंत ग्रहमालिका या अस्तित्वात फिरतायंत. यावरनं तुम्ही कल्पना करु शकाल की पृथ्वीसारख्या एका ग्रहावरच्या, एक व्यक्तीची, इतक्या अनंत पसार्‍यात छदाम गणती नाही. ____________________________________________ आई-वडील वगैरे कल्पना, `विवाह' या मानव निर्मीत, समाजव्यवस्थेचा भाग आहेत. निसर्गाला त्याच्याशी काहीही घेणं-देणं नाही. तस्मात, अमक्या स्त्रीच्या पोटी हे बालक, आणि तमक्या स्त्रीच्या उदरी ते बालक जन्माला घालायचं (ते ही त्याच्या पूर्वसंचितानुसार !) असा निसर्गाचा काहीही प्लान नसतो. निसर्ग फक्त त्याच्या प्रोलिफरेशनमधे इंटरेस्टेड असतो आणि त्या-त्या क्षणी, अस्तित्वाच्या अतीविशाल कॅलिडोस्कोपमधे; ज्या घटना सहज घडू शकतात, त्यानुसार जन्म-मृत्यू होत रहातात. अशाप्रकारे पुनर्जन्म ही केवळ मानसिक दिलासा देऊ शकेल अशी, निराधार मानवी कल्पना आहे. _______________________________ > ज्या क्षणी चूक त्याच क्षणी शिक्षा - म्हणजे मी आत्ता १०० रुपयांचा भ्र्ष्टाचार केला कि लगेच माझ्या घरातले १०० रुपये चोरीला जाणार. किंवा मी आत्ता कोणाचातरी खून केला तर लगेच माझा पण कोणीतरी खून करणार? अस्तित्व हा कॅशचा सौदा आहे याचा अर्थ जाणीव एक आहे. ज्या यातना मरणार्‍याला होतील त्याच यातना, त्याच वेळी मारणार्‍याला होतील मरणारा त्या यातना भोगून मरेल आणि सुटेल; आणि जगणारा त्या यातना भोगत जगेल; इतकाच काय तो फरक.
  • Log in or register to post comments
म
मोदक Sat, 06/06/2020 - 04:16 नवीन
ज्या प्रकारे वादविवाद सुरू झाले आहेत त्यानुसार आता इतकीच अपेक्षा आहे की धागालेखकाला "हा धागा लिहिला, हिच आणखी एक त्रासदायक आठवण ना ठरो" :D
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sat, 06/06/2020 - 08:40 नवीन
=)))) मेलो मेलो =))))
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 06/06/2020 - 12:59 नवीन
याच धाग्यात पुढील धाग्याची बीजे आहेत तर !!! आधि बीज एकले, बीज अन्कुरले !!
  • Log in or register to post comments
श
शलभ Sun, 06/07/2020 - 17:03 नवीन
+1 प्रतिसाद वाचता वाचता तेच वाटत होतं. :P
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 06/06/2020 - 04:49 नवीन
सर्व अवांतर --
"क्षच्या बाळाने (वय वर्ष १.५) अशी नक्की काय चूक केली असेल कि त्याला त्याच घर मिळालं? त्यालासुद्धा एखाद छान घर का नाही मिळालं?जगातल्या कुठल्याही बाळाला त्याची कुठलीही चूक नसताना वाईट घरात का जन्म मिळतो?" मला तरी या प्रश्नाचं पुनर्जम्नशिवाय कुठलाही पटेल असं उत्तर मिळालेलं नाहीये. तुम्हाला मिळालं तर नक्की ऐकायला आवडेल.
याच धरती वर, धागाकर्त्याला ती घर मालकीण मिळाली कारण त्याचे पूर्वजन्माचे पाप असे म्हणायचे आहे का मग? कदाचीत तो पण त्या शेगुप्ता येव्हडाच किंवा त्याहून भयंकर होता त्या जन्मात, असेच का? ----------- बाकी कालवड गोठ्यात.. चिमणी घरट्यात.. तशी माणसे घरात जन्मतात.. यात पूर्वजन्म आणला तर.. X बाई जिचा नवरा दारुडा Y असतो ह्यांना जो Z मुलगा होणार असतो, त्याचे पूर्वजन्म पाप त्याला असल्या घरात आणते असे म्हंटल्यावर, त्या Z ला तेथे जन्म घेता यावा म्हणुन X आणि Y चा लग्न आणि संभोग घडून आला असे म्हणायचे का मग? हे म्हणजे कैद्या साठी जेल तयार केले गेले असे झाले मग.. ---- पूर्वजन्म असला तरी असल्या भंकस गोष्टी जन्मा जन्मा पासून जोडलेल्या नसल्याच पाहिजेत.. आणि असे असेल तर.. मी तुम्हाला रिप्लाय दिला आहे.. कारण गेल्या जन्मात तुम्ही मला असाच अवांतर टाईप कुठेतरी.. वेगळ्या स्वरूपात असा रिप्लाय दिला होता म्हणुन त्याची हि परतफेड समजावी... आणि या वर रिप्लाय पुढच्या जन्मात करावा.. आता काही घाई नाही..
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 06/06/2020 - 06:24 नवीन
डिपॉझिट रक्कम परत मिळाली ना?
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sat, 06/06/2020 - 07:17 नवीन
संक्षीसर,वीणा३,गण्या,मोदक,कंजुस सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद. ही घटना १२ वर्षांपूर्वीची आहे .अन्यथा घरमालकाकडुन त्याला दिलेली अनामत रक्कम परत कशी मिळवावी? असा धागा काढावा लागला असता.
इतकी रक्कम देण्यापूर्वी तिथल्या भाडेकऱ्यांना त्यांचा अनुभव विचारला असता तर एका झटक्यात मालकीणीची महती कळली असती !
विचारले होते.पण सगळे एका नौकेचे प्रवासी.त्यामुळे तिथे त्यावेळी असलेला भाडेकरु उघड उघड बोलला नाही. पण कशी आहे म्हटल्यावर उपहासात्मक हास्य आले होते त्याच्या चेहर्यावर. जो सोडुन जाणार होता व ज्याच्या खाली केलेल्या फ्लॅटमध्ये मी राहणार होतो त्याने तिच्याबद्दल पॉझिटिवच सांगितले. त्याची अनामत रक्कम अडकली होती व नवा भाडेकरु मिळवुन देवुन त्याची अनामत रक्कम त्याला लवकर मिळाली असती. हाच प्रकार घर सोडताना माझ्याबाबतीत झाला. अनामत रक्कम अडकली असल्याने मी उघड उघड चालाक औरत है असे म्हणु शकत नव्हतो.(सुदैवाने कुणी तसा प्रशन विचारला नाही.कदाचित येणारा भाडेकरु माझ्यापेक्षा नवखा असावा.) अनामत रक्कम परत मिळाली पण काटछाट करुन ज्याची तशी काही गरज नव्हती. धाग्याचा उद्देश फक्त ह्या अनुभवाच्या आठवणीसंबंधी नसून अश्या प्रकारच्या मनःशांती बिघडवणार्या अशा प्रकारच्या अनुभवांपासुन सुटका कशी करुन घ्यायची असा आहे. आतापर्यंतच्या चर्चेमधुन तर झाले गेले त्याबद्दल आपण काही करु शकत नाही व समोरच्याला व स्वतःला माफ करायला हवे ह्या निष्कर्षाप्रत आलो आहे. हे आधीही माहीती होतेच. "कधीतरी स्वतःला माफ करायला हवे" हे संदीप खरेने उगाच म्हटलेले नाही.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 06/06/2020 - 12:49 नवीन
शरीरशास्त्रात ज्याप्रमाणे कोणतंही औषध कोणत्याही व्याधीवर चालत नाही त्याचप्रमाणे मानसशास्त्रात ठराविक नियमच ठराविक मानसिकतेवर काम करतात. > कधीतरी स्वतःला माफ करायला हवे हा नियम तुम्ही शगुफ्ताला छळलं असतं आणि ती हयात नसल्यानं, आता परिमार्जनाचा कोणताही मार्ग उरला नसता, तर त्या अपराधभावनेतून मुक्त व्हायला होईल. पण लिखित केसमधे मोहमुक्तीचा नियम वापरायला हवा. त्यानं व्यक्ती अनुभवसमृद्ध होते, आणि पुन्हा माणूस ओळखतांना सजगता राहते. ____________________________________ इथे कुणी, काहीही वकूब नसतांना उपहासात्मक कमेंटस करणे. मानसशास्त्राचा शून्य अभ्यास असतांना विषय भरकटवणे. फालतू शाब्दिक चुका काढणे.... वगैरे चालू करत असेल तर त्याला बेदखल करणं योग्य राहील. नाही तर एका चांगल्या आणि सर्वोपयोगी विषयाचा नाहक चोथा होईल. प्रसंगी मुखभंग करणं ही उचित ठरतं अन्यथा असे सदस्य फुकटची वकीलपत्रं घेणं, कुणीही विचारत नसतांना मधेच असंबंद्ध कमेंटस मारणं... असे धंदे करुन स्वतःचं उपद्रव मूल्य वाढवत बसतात.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sat, 06/06/2020 - 16:52 नवीन
..मोहमुक्तीचा..
संक्षीसर तो मोह नव्हता. मोह म्हणजे गरज नसणार्या गोष्टीचा हव्यास करणे. पण इथे घर घेणे ही माझी गरज होती. आणि ते निवडण्याचे बरेच निकष होते. ह्याला चोखंदळपणा म्हणु शकतो. वर म्हटल्याप्रमाणे अश्या पध्दतीत अगदी फुल्ल फ्रुफ्फ निर्णय घेणे अवघड असते. साधारण त्या वेळी योग्य वाटलेल्या निकषांचा आधार घेऊन निर्णय घेणे गरजेचे होते आणि तो घेतला. आणि अक्कलखाती एक अनुभवही जमा झाला . म्हणजे नंतरच्या घरमालकासोबततरी अशी समस्या येऊ दिली नाही.
हा नियम तुम्ही शगुफ्ताला छळलं असतं आणि ती हयात नसल्यानं,
शगुफ्ता इथे महत्वाची नाही. इथे भूतकाळात झालेल्या एका गोष्टीमुळे मी स्वतःच स्वतःला छळतोय. माझी सध्याची मनःस्थिती शगुफ्ताला जरी समजली तरी तिला झाट फरक पडणार नाही. त्यामूळे इथे मीच माझ्याबाबतीत काहीतरी करायला हवे आणि तेच मी करण्याचा प्रयत्न करतोय.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 06/06/2020 - 17:10 नवीन
@ कानडाऊ योगेशु, तुम्ही अगदी महत्वाच्या विषयाला हात घातला आहे. मी माझे उत्तर शब्दब्ध्द करतो आहे. त्याचबरोबर त्याबाबतचे तर्क पण लिहायचा विचार करत असल्याने वेळ लागतोय. आणखी एकाने पण रिक्वेस्ट केली आहे. त्यामुळे जनरलाईज करून उत्तर तयार करतोय. उद्यापर्यंत पाठवायचे ठरवतोय. बघू कसं जमतांय ते.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 06/06/2020 - 19:24 नवीन
> हव्यास करणे हा प्रतिसाद, निर्णयामागची, मानसिक प्रक्रिया उलगडावी यासाठी आहे तुम्ही व्यक्तिगत घेणार नाही अशी अपेक्षा करतो. ___________________________ तुमच्या निकडीबद्दल वाद नाही. पण मोह म्हणजे स्वप्नरंजनामुळे तारतम्य हरवणे ! एक मोठी रक्कम देतांना आपल्याला तिथे रहात असलेल्यांचं सांगणं, फारसं मनावर घ्यावसं वाटत नाही, ज्याची जागा आपण घेणार, त्याचे पैसे अडकल्यामुळे, त्यानी दिलेला पॉजिटीव फिडबॅक, आपल्या कामाचा नाही, याकडे दुर्लक्ष होणं आणि सगळ्याची परिणीती म्हणजे फसगत होणं ही मोहाची किमया आहे. आणि मोहाचं वैशिष्ठ्य असं की तो कायम दुसर्‍यानी फसवलं असाच स्टँड घेतो ! ____________________________________ आजपर्यंत कोणत्याही निर्णयात माझी फसगत झाल्याचं स्मरत नाही पण कधी झाली तर मी त्या व्यक्तीचे पहिल्यांदा अभार मानीन, कारण तीनं मला माझ्या निर्णयप्रक्रियेतली खोट दाखवली, माझ्या दृष्टीकोनातून जो सुटला होता, असा माणूस ओळखण्याचा आणखी एक नवा पैलू दाखवला. थोडक्यात, त्या घटनेचा एक वाईट आठवण असा ठसा मनात कधीही उमटणार नाही. _________________________________ बघा विचार करुन.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sat, 06/06/2020 - 19:58 नवीन
तुम्ही व्यक्तिगत घेणार नाही अशी अपेक्षा करतो.
चर्चेतुन व इतरांच्या अनुभवातुन बरेच काही नव्याने कळते आहे.त्यामुळे व्यक्तिगत घेण्याच्या प्रश्नच येत नाही.
माणूस ओळखण्याचा आणखी एक नवा पैलू दाखवला.
येस्स. लेखातच लिहिण्याप्रमाणे गोड बोलणार्या कुणावरही रादर कुणावरही आता सहजगत्या विश्वास ठेवु शकत नाही.प्रत्येक व्यक्तीकडे सेन्स ऑफ डाऊट ने पाहणे गरजेचे असते हे परिणामकारकरित्या समजले.(धडा मिळाला.!)
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 06/06/2020 - 20:08 नवीन
मी दुसर्‍यावर कायम विश्वास टाकतो ! पण त्याच्या सचोटीची पूर्ण खात्री होईपर्यंत त्याच्या बोलण्या आणि वागण्यातली एकवाक्यता क्रॉस-चेक करत राहतो ! मग माणूस ओळखण्यात चूक होत नाही.
  • Log in or register to post comments
म
मोदक Sun, 06/07/2020 - 19:07 नवीन
@ संपादक मंडळ इथला प्रतिसाद वैयक्तिक वाटतो आहे म्हणून उडाला असेल तर वैयक्तिक कमेंट असणारा वरचा प्रतिसाद संपादित होणे आवश्यक वाटत नाही का..?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 06/06/2020 - 14:58 नवीन
हेसुद्धा वामाच्या गावाला जाणार वाटतं.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 06/07/2020 - 13:50 नवीन
हा संवेदनशील व्यक्तींचा प्रातिनिधिक प्रश्न आहे. जेवढ विसरण्याचा प्रयत्न कराल तेवढे ते उफाळून येते. जखम बरी न होणार्‍या अश्वत्थामा सारख्या या कटु स्मृती त्रास देतात. शब्द हे शस्त्र असते. जपून वापरावे म्हणतात ते यामुळेच. काळानुसार तीव्रता कमी होत जाते. शिवाय काही जाणीवपुर्वक प्रयत्न करावे लागतात. काही वर्षांनी काही निमित्ताने ती व्यक्ती अनपेक्षितपणे दिसल्यास पुन्हा उफाळून येतात कटुस्मृती. बेफिकिर बनण्याचा प्रयत्न करा. शिवाय तुम्ही कोणाला त्रास दिला नाहीये ही मोठी जमेची बाजू आहे
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sun, 06/07/2020 - 15:00 नवीन
> प्रातिनिधिक प्रश्न आहे. काही प्रमाणात बरोबरे पण मुळात हा मनाच्या संयोजनाचा प्रश्न आहे खरं तर संवेदनाशील व्यक्ती हा गुण मानला गेला असला तरी, अशा व्यक्तीला भावनांचं संयोजन करता येत नाही ही बेसिक मेख असते !
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sun, 06/07/2020 - 19:24 नवीन
पटतेय घाटपांडे सर.! जास्त विचार करु जाता असे जाणवले कि सगळ्याच्या मुळाशी गोष्टी स्वतःच्या मनासारख्या न झाल्या तर ते सहजासहजी न स्वीकारता येण्याची मानसिकता आहे. म्हणजेच बाह्य गोष्टींवर जास्तच अपेक्षा ठेवण्याचा आहे. प्रत्येक रिलेशन (वस्तुंसोबत,व्यक्तींसोबत) मध्ये जर प्रथमपासुनच गोष्टी स्वतःच्या मनाविरुध्द जाऊ शकतात असे मान्य केले तर पुढे होणारा त्रास वाचु शकतो.
शिवाय तुम्ही कोणाला त्रास दिला नाहीये ही मोठी जमेची बाजू आहे
बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय। ह्यापेक्षा जास्त काय बोलु! नेहेमीप्रमाणेच चांगल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.!
  • Log in or register to post comments
र
राघव Sun, 06/07/2020 - 20:19 नवीन
एखाद्या त्रासदायक आठवणीला स्वतःच हास्यास्पद ठरवता येऊ शकते का यावर विचार करावा, असा सल्ला देऊ शकतो खरं तर. पण जर आठवण इतकी त्रासदायक असेल तर त्याचा कितपत उपयोग होईल हे नक्की सांगू शकत नाही. अर्थात् प्रयोग करून बघायला हरकत नाही. उदा: माझी एक अशीच आठवण ज्याचा फार त्रास व्हायचा अगोदर - ते मी स्वतःच माझी कशी फजिती झाली होती हे हसत हसत माझ्या मित्राजवळ बोलून मन मोकळं केलं. त्यानंतर जेव्हा त्या आठवणीनं पुन्हा डोकं वर काढलं, त्यावेळी तेवढा त्रास झाला नाही, कारण माझे आणि माझ्या मित्राचे त्यावरचे हसणे जास्त लक्षात राहिले होते. असाच प्रयोग नंतर आणिकही काही वेळेस केला तेव्हा तसा त्रास कमी होत गेला. माझ्या लक्षात आलेली गोष्ट ती ही - आपण स्वतःच आपल्या आनंदाला जास्त महत्त्व देत नाही. दु:खाला देतो. हे मी एका धाग्यात मांडले होते, असे स्वतःच्याच धाग्याचा पुरस्कार करण्याचा दोष पत्करून सांगू इच्छितो. :-) जर त्यातून काही उपयोगाचं मिळत असेल तर जरूर बघावं. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sun, 06/07/2020 - 21:56 नवीन
धागा वाचला. लिहिलेले आवडले. थोडक्यात हर फिक्र को धुए मे उडाता चला गया असा अ‍ॅटिट्युड नक्कीच काम करतो.
आपण स्वतःच आपल्या आनंदाला जास्त महत्त्व देत नाही. दु:खाला देतो.
माणसाला दु:ख कुरवाळत बसायला आवडते. विशेषतः ते जुने असेल तर अजुनच. म्हणुनच समदु:खी हा शब्दप्रयोग वापरला जातो समसुखी असा शब्द मी अजुन वाचला नाहीये.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 06/08/2020 - 07:49 नवीन
एन एल पी चा वापर करुन यातून मुक्तता करुन घेता येते. व्यनी करा. मी मदत करू शकेन
  • Log in or register to post comments
व
विटेकर Mon, 06/08/2020 - 08:14 नवीन
...................अस होते कधी कधी ! माझा मात्र बन्गलोरच्या घरमालकाचा अनुभव अतिशय चांगला आहे - के एन एन गुप्ता - इन्दिरानगर ( होटेल सन्गीत चे मालक ) मी एकूण ८ वर्षे या एकाच घरात रहिलो .. दोघे ही अतिशय सालस .. पक्का शेट्टी .. पण माझ्याशी व्यवहार अतिशय प्रेमळ .. बायको माहेरी आली की मी जेवायला त्यान्च्याकडे असे ! माझ्या मुलासाठी या शेट्टीने सोन्याची अन्गठी केली होती .. दोघे नवरा - बायको आमचे खूप लाड करायचे .. मुलाला त्याण्च्याकडे ठेऊन आम्ही बाहेर जायचो ... त्यान्च्यामुळे मुलगा तेलगु , कानडी आणि थोडे तमिळ पन शिकला ! मी घर बान्धायला सुरुवात केल्यावर या गृहस्थाने जवळ जवळ सहा महीने अगोदर , मी त्यान्च्याच घरात रहात असताना , दिपोझित चे पैसे परत दिले ... बान्धकामाला लागतील म्हणून ! मी माझ्या स्वत्;च्या घरी फार काळ राहू शकलो नाही .. मी घर मालक झाल्यावर माझ्या समोर हा आदर्श होता ! दोन वर्शापूर्वी ते आमच्याकडे पुण्याला येऊन गेले , आम्ही त्यान्च्यासोबत शिरडीला जाऊन आलो , आजही तगडा सम्पर्क आहे .. नातेवाईक असल्यासारखा ! हा निव्वळ प्राक्तानाचा भाग आहे ! .. आपले प्राक्तन आपण सहज स्वीकारले तर त्रास कमी होतो ! "..हे असं कसं झाले .." या प्रश्नाला काडीचा अर्थ नाही .. हे असेच होणार होते म्हणून असे झाले .. हे स्वीकारून पुढे चालणे महत्वाचे ! मना त्वाचि रे पूर्व सन्चित केले | तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ! सहज स्वीकारा .. म्हणजे त्रास कमी होईल ..अर्थात हे सान्गायला फार सोपे आहे ! जेव्हा असा एखादा त्रास होतो त्यवेळी आपले कर्ज फिटत असते. कर्ज फिट्त असेल तर दु: ख व्हावे का आनन्द?
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Mon, 06/08/2020 - 08:27 नवीन
छान समजावून सांगितले आहे. पण... कळतं पण वळत नाही हाच सर्वसामान्यांचा अनुभव असतो. कारण असे विचार इतके झटकन मनात घुसतात की, स्वत:ला भरपूर त्रास करून घेतल्यावरच, सगळं कळलेलं एक एक करून आठवायला लागतं. :)
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Mon, 06/08/2020 - 08:52 नवीन
हेवा वाटण्याजोगा अनुभव आहे तुमचा विटेकरसाहेब!
जेव्हा असा एखादा त्रास होतो त्यवेळी आपले कर्ज फिटत असते. कर्ज फिट्त असेल तर दु: ख व्हावे का आनन्द?
१००% पटले. विचारांवर उपाय विचारांनीच करावा लागतो आणि असे दृष्टीकोन माहित करुन घेण्यासाठीच इथे धागा काढला होता. सद्गुरु जग्गी वासुदेव म्हणतात त्याप्रमाणे जे काही घडते ते सर्व आपल्या आत घडते त्यामुळे प्रॉब्लेम ही आत असेल तर उत्तर ही आतुनच मिळायला हवे.
मना त्वाचि रे पूर्व सन्चित केले | तयासारिखे भोगणे प्राप्त झाले !
ओळी समोर लिहिलेल्या असतात. हजारदा वाचलेल्या असतात पण अर्थ असा सहजासहजी भिनत नाही. आता प्रचिती येतेय. प्रतिसादाबद्दल धन्य्वाद.
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Mon, 06/08/2020 - 11:30 नवीन
विटेकरजींनी थोडक्यात आणि सहज पटण्यासारखे स्पष्टीकरण दिलेले आहे. धन्यु.
  • Log in or register to post comments
म
मोदक Mon, 06/08/2020 - 15:04 नवीन
भारी अनुभव. मना त्वाचि रे पूर्व सन्चित केले | तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ! वाह..! __/\__
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 06/08/2020 - 16:18 नवीन
> तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ! या पूर्वसंचिताचा डेटा नक्की कुठे स्टोअर केलेला असतो आणि त्याची डे-टू-डे मॅनेजमंट कोण करतं ? त्या मॅनचा पत्ता कळू शकेल का ? म्हणजे त्याच्याशी संधान बांधून पूर्वसंचितात, लोकांना किमान उर्वरित आयुष्यात तरी बदल घडवून आणता येतील ! त्या डेटा मॅनेज करणार्‍याच्या पूर्व संचिताचं काय ? त्याच्यावर कुणाचा कंट्रोल असतो ?
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Mon, 06/08/2020 - 16:27 नवीन
तुमच्या "स्मृती स्ट्रींग्ज" च्या थियरीसारखीच ही पण एक थियरी आहे. ती आज सिद्ध करता येत नाही किंवा तुम्ही मागत आहात ते पुरावे उपलब्ध नाहीत. तुम्ही जशी "स्मृती स्ट्रींग्ज" थियरी मानता तसंच काही लोक हा कर्मविपाक सिद्धांत मानतात. अर्थात विटेकर काका तुम्हाला काय उत्तर देतात हे वाचणं रोचक ठरेल.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 06/08/2020 - 21:13 नवीन
> तसंच काही लोक हा कर्मविपाक सिद्धांत मानतात. या मुद्द्यावर मी चर्चेला तयार आहे पण तुम्ही मात्र (त्या क्षेत्रात असून) बेसिक गोष्टींचं उत्तर देत नाही : १. नवजात अर्भकाच्या मेंदूनामक बायो- हार्डडिस्कवर कोणताही डेटा नसतो ही वस्तुस्थिती आहे. २. तस्मात, जवळजवळ कोणत्याही अर्भकाला काहीही पूर्वस्मृती नसते. त्याला प्रत्येक गोष्ट नव्यानं शिकायला लागते. ३. ज्या अपवादात्मक बालकाला अशी स्मृती जागृत होते, त्याच्या मेंदूवर तो डेटा डायरेक्ट बाहेरुन कॉपी/पेस्ट व्हायला हवा. ४. थोडक्यात, एखाद्या मृत व्यक्तीच्या अनफॉरमॅटेड "स्मृती स्ट्रींग्ज" तिथे पेस्ट झाल्याशिवाय त्यांचं रिट्रीवल अशक्य आहे. ५. अशाप्रकारे पुनर्जन्म ही अपवादात्मक परिस्थितीत, मृत व्यक्तीच्या अनफॉरमॅटेड "स्मृती स्ट्रींग्ज", नवजात अर्भकाच्या मेंदूत पेस्ट होण्याची केस आहे. त्यापलिकडे पुनर्जन्म या कल्पनेला काहीही अर्थ नाही. ६. तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे याविषयावर झालेल्या संशोधनाचा सारांश तुम्ही दिलात (लिंक नको), तर त्याची शहानिशा होईल. ________________________________________ > अर्थात विटेकर काका तुम्हाला काय उत्तर देतात हे वाचणं रोचक ठरेल. त्यांचाकडे समर्थांच्या श्लोकाशिवाय इतर पुरावा नाही कारण हा प्रष्ण त्यांना मागे विचारुन झालायं ______________________________ मानशास्त्राचे गाढे अभ्यासक `मोदक' यांनी मात्र लाल रंगात समर्थांचा श्लोक क्वोट करुन त्याखाली नमस्कार केला आहे. ते आपले ज्ञानदीप इथे पेटवून पुनर्जन्माविषयी आपल्या अभ्यासाची माहिती सांगणार आहेत. आणि त्याच बरोबर हे सप्रमाण सिद्ध करणार आहेत की आपले प्रतिसाद धागा भरकटवण्यासाठी नसून या संकेतस्थळाला आपलं अमूल्य योगदान देण्यासाठी असतात.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Mon, 06/08/2020 - 22:09 नवीन
पण तुम्ही मात्र (त्या क्षेत्रात असून) बेसिक गोष्टींचं उत्तर देत नाही :
मेंदू हा बायो- हार्ड डीस्क आहे हे तुमचं गृहीतक आहे. मला हार्ड डिस्क कशी चालते हे माहीती आहे, मेंदू कसा चालतो मला असलेलं ज्ञान नगण्य आहे. माझ्या माहितीप्रमाणे तुम्हीही मेंदू विषयातील तज्ञ नाही. त्यामुळे तुमच्या या गृहीतकाला "तुमचं वाचनातून तयार झालेलं वैयक्तीक मत" इतकाच अर्थ आहे.
१. नवजात अर्भकाच्या मेंदूनामक बायो- हार्डडिस्कवर कोणताही डेटा नसतो ही वस्तुस्थिती आहे. २. तस्मात, जवळजवळ कोणत्याही अर्भकाला काहीही पूर्वस्मृती नसते. त्याला प्रत्येक गोष्ट नव्यानं शिकायला लागते. ३. ज्या अपवादात्मक बालकाला अशी स्मृती जागृत होते, त्याच्या मेंदूवर तो डेटा डायरेक्ट बाहेरुन कॉपी/पेस्ट व्हायला हवा. ४. थोडक्यात, एखाद्या मृत व्यक्तीच्या अनफॉरमॅटेड "स्मृती स्ट्रींग्ज" तिथे पेस्ट झाल्याशिवाय त्यांचं रिट्रीवल अशक्य आहे. ५. अशाप्रकारे पुनर्जन्म ही अपवादात्मक परिस्थितीत, मृत व्यक्तीच्या अनफॉरमॅटेड "स्मृती स्ट्रींग्ज", नवजात अर्भकाच्या मेंदूत पेस्ट होण्याची केस आहे. त्यापलिकडे पुनर्जन्म या कल्पनेला काहीही अर्थ नाही.
या मुद्द्यांना कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. केवळ तुमची वैयक्तीक मतं आहेत ही. तुमचे हे मुद्दे आणि "जर सृष्टीतील प्रत्येक गोष्टीचा निर्माता आहे तर सृष्टीचाही निर्माता असायला हवा" किंवा "एक मुल श्रीमंताघरी जन्माला येते आणि दुसरे गरीबाघरी. पूर्वसंचिताशिवाय असा भेदभाव कसा होईल?" अशा स्वरुपाची विधाने यात अक्षरशः काहीही फरक नाही. सारा मानण्याचा किंवा न मानण्याचा खेळ आहे. तुमच्यासाठी ही "स्मृती स्ट्रींग्ज" थियरी खरी आहे तितकाच खरा कर्मविपाक सिद्धांत तो मानणार्‍यांसाठी आहे. हे तुम्हाला मान्य नसेल तर तुमच्या विधानांच्या समर्थनार्थ पुरावे द्या. कुणी संशोधन केले, कोणत्या शोधनिबंधात प्रसिद्ध झाले, त्यांचा पियर रिव्ह्यू कुणी केला? "स्मृती स्ट्रींग्ज" सर्व प्रथम कुणी आणि कोणत्या यंत्रातून पाहील्या? आता जर पाहायच्या असतील तर कशा पाहता येतील? वगैरे.
६. तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे याविषयावर झालेल्या संशोधनाचा सारांश तुम्ही दिलात (लिंक नको), तर त्याची शहानिशा होईल.
डॉ इयान स्तीव्हन्सन यांचे काम संशोधन म्हणण्यापेक्षा व्हेरीफिकेशन अँड डोक्युमेंटेशन स्वरुपाचे म्हणता येईल. ते आणि त्यांचे सहकारी मागचा जन्म आठवत असल्याचा दावा करणार्‍या मुलांना, त्यांच्या कुटुंबियांना भेट देत, त्यांच्या दाव्यांची, ते सांगत असलेल्या गतजन्मीच्या आठवणींची नोंद करत, या आठवणीतील माहितीवरुन मागील जन्मातील ठिकाणं आणि माणसं शोधण्याचा प्रयत्न करत. अशी मिळती जुळती ठिकाणं आणि माणसं सापडल्यास दावा करणार्‍या मुलाने सांगितलेल्या माहीतीतील किती माहिती जुळते याचा ताळा करीत आणि ते आपल्या शोधनिबंधातून मांडत. यातील बर्‍याचशा केसेस मधील बरीचशी माहिती जुळत असे. हे फार मोघम विधान आहे याची मला कल्पना आहे. मी हे सारे जवळपास सात आठ वर्षांपूर्वी वाचले होते. आता मुद्देसुद आठवत नाही. ज्यांना अधिक जाणून घेण्याची ईच्छा आहे त्यांनी डॉ इयान स्टिव्हन्सन यांचे लेखन वाचावे. मात्र या नोंदीतून काही गोष्टी ठ़ळकपणे समान होत्या. त्या म्हणजे: १. पुनर्जन्माच्या आठवणी मुलांना वयाच्या सहा सात वर्षांपर्यंत आठवत असत. त्यानंतर मुलांना गतजन्मीच्या आठवनींचा विसर पडत असे. २. गतजन्मीच्या आठवनी आठवणार्‍या बहुतांश मुलांचा मागील जन्मातील मृत्यू अपघाती किंवा घातपाती झालेला असे. ३. मृत्यूच्या वेळी घातपातात किंवा अपघातात शरीराच्या एखाद्या अवयवावर ईजा झालेली असल्यास त्याची खूण या जन्मी शरीरावर दिसत असे ४. दुसरा जन्म घेताना लिंगबदल शक्य असे. या सार्‍या नोंदी पुनर्जन्माच्या सुचक आहेत असे माझे मत आहे. पुनर्जन्म असतोच असा माझा दावा नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा