Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

क्षितिजावरती पहाट होता..... !!!

अ — अमोल_००३, Mon, 06/01/2020 - 14:00
क्षितिजावरती पहाट होता अचानक मज आज ये जागृती | गिरिशिखरांच्या वाटेवरूनि अन् पाऊले मग घेती गती || फिरता फिरता असा थबकलाे पाहुनी सुंदर तो देखावा | मुग्धपणाने अनिमिष नेत्रे तृषार्तापरी पिऊनच घ्यावा || पर्वतराजींमधूनि हिरव्या, सूर्यबिंब ते प्रकटत जाई | झाडे, वेली, फुले, पाखरे, आसमंतही प्रकाशित होई || दूर कपारीतुनि एखाद्या, ये धावत फेसाळत धार | शांत, संयमी, गंभीरपणे अन् विस्तारीतसे तनमनी अपार || स्तब्ध उभ्या त्या वृक्षावरती कुणी एखादा येई पक्षी | दोन क्षणातच अवरोहाची फुलवूनि जाई अद्भुत नक्षी || असाच उभा असता मी तेथे, सृष्टीचे न्याहाळीत रूप | चाहूल लागे मजला काही, व्यक्त करी कोणी अप्रूप || घेऊन स्फूर्ती त्या दृश्यातून, चालू लागला होता एक | साकारीत होते नकळत त्याच्या मनीमानसी नवकथानक || ऐकून संगीत जललहरींचे, कुणा अचानक स्फुरली तान | गाऊ लागला अन् स्वच्छंदे, नुरले त्याला कसले भान || पाहून लीला या अफलातून आणि उगवता बालरवी | जागृत झाला होता कोण्या अंतर्मनातील सुप्त कवी || सूक्ष्म दृष्टीने टिपून अलगद निसर्गाची ही चित्रकला | सरसर चालू लागे एका हाती असलेला कुंचला || कशी जाहली विश्वनिर्मिती, काय असावे रहस्य तयाचे | हरवूनि बसला गूढ विचारी कोणी वैज्ञानिक स्वयाते || मधुर सुरांनी बरसे कोणा ओठी असलेली बासरी | सप्तस्वरांच्या चांदण्यातुनि तो स्वानंदे विहार करी || प्रतिभेच्या या अमाप गर्दीत येई असा कुणी एक भिकारी | "दिवस उगवला" मनी म्हणतसे, "शोधायाची आहे भाकरी" ||

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1267 views

💬 प्रतिसाद
ग
गणेशा Mon, 06/01/2020 - 19:44 नवीन
छान
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा