Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

भेट .....

फ — फिझा, Mon, 06/01/2020 - 02:33
भेट ..... सागर गोटे अन भातुकली आठवते का ग आता ? किनाऱ्यावर गोळा केलेले शिंपले असतील अजून पण ...... तुझ्या वहीतल्या पहिल्या पानावर माझे नाव लिहिताना किती खाडाखोड ? ...पहिल्याच ओळीत ! आणि नंतर, पान भरून लिहिलेलं ... ! जेव्हा पुन्हा भेटशील तेव्हा 'ती वही' घेऊन ये ..... पानावरची 'तारीख ' सोडली तर ... अजून काही जसंच्या तसं शिल्लक आहे का हे तपासून पाहूया ...... नसेल तर ......... तर ..... मला कसलेही प्रश्न नको विचारू ... ... ! तुझ्या मनातल्या प्रश्नांपेक्षा .... माझ्या डोळ्यांसमोर उभे असलेले प्रश्न ..... खूप मोठे असतील कदाचित ....... एवढंच समजून घे ........ नेहमीसारखेच ! अन , 'ती वही', तू अजूनही जपली आहेस , हाच दिलासा घेऊन परत निघेन मी ...... ...........नेहमीसारखीच ! ........ फिझा

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5805 views

💬 प्रतिसाद
ग
गणेशा Mon, 06/01/2020 - 05:16 नवीन
'ती वही', तू अजूनही जपली आहेस , हाच दिलासा घेऊन परत निघेन मी ...... वा वा.. काय लिहिले आहे.. मनापासून आवडले.. ---- अजून सगळे तसेच आहे त्या वहीत... तूझी लिहिलेली फुलाची कविता हि तशीच... शेवटच्या पाणावर, तू 'आते जाते हसते गाते ' लिहिलेलं अजून वाचतो मी, तुझ्या नावासहित... तू जाणार त्यावेळी.. चित्र तुझे मी काढलेलं.. अजून तसेच आहे, तुझ्या सुगंधा सहित...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/01/2020 - 05:57 नवीन
आवडली कविता. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 06/01/2020 - 14:40 नवीन
छान !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jaane Do Na... :- Cheeni Kum
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Mon, 06/01/2020 - 14:47 नवीन
ती वही आणि त्यातील पाने ते क्षण आणि तो इतिहास तू दिसलीस कि पहिले हात बघतो हातात ती डायरी तर नाही ना हसतो असाच आव आणून पळ काढतो शोधून बहाणा आजही मला आमची विचारते ती भेटली कि तुमची हातभर का फाटते ? मी पुन्हा हरवतो त्या इतिहासात पुन्हा मला ती डायरी दिसते
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Mon, 06/01/2020 - 20:48 नवीन
कविता आवडली.. :)
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Mon, 06/01/2020 - 22:10 नवीन
छान आहे कविता !!!
  • Log in or register to post comments
र
रातराणी Tue, 06/02/2020 - 06:51 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Tue, 06/02/2020 - 19:23 नवीन
छान लिहिलं आहे. अगदी जीव ओतून!
  • Log in or register to post comments
र
रुपी Wed, 06/03/2020 - 00:25 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
आ
आगाऊ म्हादया...... Tue, 06/09/2020 - 02:43 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 06/09/2020 - 16:56 नवीन
खुप दिवसांनी काहीतरी छान वाचयला मिळाले :)
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 06/11/2020 - 18:42 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा