Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

भारतातील घरकामे आणि परदेशातील घरकामे

ज
जेडी
Sat, 05/30/2020 - 13:09
🗣 73 प्रतिसाद
मी असे ऐकलंय कि परदेशी राहणारे त्यांच्या घरची कामे स्वतःच करतात कारण तिकडे कामवाल्या बाया मिळत नाहीत आणि मिळाले तरी त्यांचे चार्जेसही खूप आहेत . नोकरी करणाऱ्या स्त्रिया कसे म्यानेज करतात ? लॉकडाऊन चालू झाल्यापासून तर हे प्रकर्षाने जाणवत आहे. सर्व कामे घरीच करावी लागत असल्याने सकाळची ऑफिसची वेळ साधायला खूपच कसरत करावी लागत आहे. तरी ऑफिस असताना रोजचं साधं जेवणच करत आहे पण त्यातही किमान चार पदार्थ (भाजी , भाकरी , भात, आमटी ) करावेच लागत आहेत . परदेशी राहणारे भारतीय हे सर्व जर करू शकत असतील तर मलाच टाइम मॅनॅजमेण्ट जमेना का काय असे वाटून राहिले आहे . मी असेही ऐकलंय कि परदेशी राहणारे रोज स्वयंपाक करत नाहीत पण असं ब्रेड पावावर महिनोनमहीने कोणी काढत नसावेत. शिवाय त्यांची घरेही मोठाली असतात. इथे २ बीचके चा फ्लॅट स्वच्छ ठेवायला नाकी नऊ यायला लागली आहे .भाज्या आणा, भिजत ठेवा , धुवा , निवडा ... पूर्वी हे होतेच पण पण तेंव्हा इतर कामासाठी बाई असल्याने त्याचे काही वाटायचे नाही पण आता मात्र सर्व घरातच करून नोकरी करणे दिव्य वाटू लागलय. पण परदेशी राहणारे मात्र हे लीलया कसे काय पार पाडत असावेत ह्यावर विचार करूसा वाटत आहे. तर परदेशी मिपाकर हे कसे म्यानेज करतात किंवा भारतात राहणारेही सदया कसे जमवत आहेत ह्यावर चर्चा व्हावी .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 40504 views

🗣 चर्चा (73)
म
मराठी कथालेखक गुरुवार, 06/11/2020 - 08:40 नवीन
आजकाल भारतातही सॉर्टेड धान्य मिळते, दर खुप जास्त असतो
नाही ओ.. आजकाल धान्य फारसं निवडावं लागत नाहीच ...डी मार्ट किंवा चांगल्या स्टोरमधून आणलेले गहू ज्वारी ई फारसे निवडत नाही, एकदा चटकन बघून दळणाला पाठवता येतात.
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय Wed, 06/03/2020 - 13:59 नवीन
पृथ्वी वर सतत कॉस्मिक डस्ट चा वर्षाव होत असतो असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते. असे असून देखील परदेशात धूळ कशी नसते?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 06/04/2020 - 00:53 नवीन
भुजंग पाटील यांनी याची काही कारणे दिली आहेत तीच येथे परत चिकटवतो बारा महिने पडणारा पाऊस काँक्रिट रस्ते आणि फुटपाथ नसेल तिथे हिरवळ जोपासण्याचे आणि उघडी माती दिसू न देण्याचे प्रयत्न. बागांमध्ये, झाडांभोवती ओल धरून ठेवणार्या मल्च (लाकडाचा भुसा आणि कपचे) चा मुक्तहस्ताने वापर टाऊनशिपला आणि हायवेला तयार हिरवळ (सॉड) पुरवठा करणार्या कंपन्यांची लॉबी
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 06/04/2020 - 00:57 नवीन
वर भुजंगरावांनी दिली आहे ना माहिती. बहुतेक मोकळ्या जमीनी नगरपालिका हिरवळीने झाकतात. त्या खाली ठिबक सिंचन बसवलेले असते. त्यामुळे गवत कायम हिरवे दिसते. या हिरवळीवर कायम लक्ष ठेवले जाते, निगराणी केली जाते. तसेच दर महिन्याला एकदा तरी रस्स्ते साफ करणारा भला मोठा वॅक्युम क्लिनर ट्रक येऊन जातो. तो धूळ शोषून घेतो. (इतके असले तरी काही धूळ शिल्लक असतेच. जेथे पाऊस कमी आहे अथवा पाण्याची उपलब्धता नाही तेथे भरपूर धूळ दिसते. काही नगरपालिका तूलनेने गरीब असतात. वॅक्युम क्लिनर ट्रक चालवू शकत नाहीत ते फक्त वर्षातून एकदाच रस्ते साफ करतात. यातही अनेक प्रश्न असतात.)
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Wed, 06/03/2020 - 15:51 नवीन
परदेशात सगळेच लोक गोठवलेले अन्न किंवा ब्रेड वगैरे खातात आणि सगळी कामं यंत्रांनीच करतात असंही नाही. प्रत्येकाकडे परिस्थिती वेगवेगळी असते. फक्त कामं करण्याची आपली मानसीक तयारी किती आणि कशी यावर ताण अवलंबून असतो. आपल्या घरातली कामं ही आपलीच आहेत याची जाणीव झाली की कामांचा ताण बराच कमी वाटतो. शिवाय कामांचं नियोजनही महत्त्वाचं आहेच. माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मी आठवड्यातले ६ दिवस तरी ताजा स्वयंपाक करते (सध्या रोजच), भांडी घासणे पण हातानेच असते कारण घरात डिशवॉशरच नाही. भांडी आपणच घासायची आहेत हे माहिती असल्याने उगाच जास्तीची भांडी धुवायला टाकली जात नाही, बरीचशी हातसरशीच विसळून घेतली जातात. (परदेशात प्रत्येक घरात डिशवॉशर असतोच असे नाही, नवरा जमेल तशी मदत करतो) घराची साफसफाई, वॉशिंगमशिनमधे कपडे धुणे, त्यांना वाळत घालणे, घड्या-इस्त्री करणे, मोठी किराणा खरेदी, इ. कामे शनिवार-रविवारी करते. संध्याकाळी स्वयंपाक करताना मुलाचा अभ्यास घेते. बाकी दूध-दह्याचा कमी मेंटेनन्स, रोज झाड-पूस नसणे, पदार्थ फक्त गरम करण्यासाठी मायक्रोवेव ओव्हन, इ. काही सुविधांमुळे रोजच्या कामांना वेळही थोडा कमीच लागतो. थोडक्यात काय, तर भारतात आणि परदेशात पडणार्‍या कामात घराची सफाई वगळता फारसा फरक नाही. कोणतं काम केव्हा करायचं याचं नियोजन केलं तर फारशी तारंबळ उडत नाही. भारतात रोजच्या झाडण्या-पुसण्याला पर्याय नाही पण टेट्रा-पॅकमधले दूध फ्रिजमधे दीर्घकाळ टिकते, मायक्रोवेव वापरून पदार्थ गरम करण्यासाठीचा वेळ आणि भांडी वाचवू शकता. शक्य असल्यास रोजच्या कपड्यांचे जास्त जोड आणून वॉशिंगमशिन आठवड्यातून २-३ वेळाच लावावे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 06/04/2020 - 00:28 नवीन
परदेशात सगळेच लोक गोठवलेले अन्न किंवा ब्रेड वगैरे खातात आणि सगळी कामं यंत्रांनीच करतात असंही नाही. सहमत
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 06/04/2020 - 00:26 नवीन
"विदेशात प्रक्रिया केलेले अन्न सर्रास वापरले जाते(, शुध्द असते असे ते त्याचे समर्थन करतात पण ते खरे कारण नाही बनवायचा कंटाळा किंवा जेवण बनवता च येत नाही हे खरे कारण आहे), राजेशजी , "सर्व देशात घरकाम ते घरकाम" आणि ते सर्वसामान्य माणसाला असतेच हा आपला मुद्दा बरोबर आहे, कोणते काम, आणि कुठे/ कसे आणि ते करताना काय सोपे होते आणि काय अडचणी येतात हे त्या त्या समाजरचनेवर अवलंबून असते हे बहुतेकांच्या प्रतिसादातून सिद्ध झाले आहेच.. परंतु आपण हे जे विधान केलं आहे ते मात्र पटत नाही आणि नुसतेच पटत नाही असे नाही तर आपण कोणत्या आधारावर / अनुभवावर लिहिले आहेत हे विचारावेसे वाटते... आपण हे परदेशात ( कानडा वैगरे ४ देश किंवा यूरोप ) दीर्घ काळ राहून केले आहे का? होतंय काय कि "परदेशात असे असते आणि तसे असते" हे भारतात बसून फारसा प्रदेशात राहण्याचाच अनुभव नसलेले खूप बोलतात,, याउलट येथे राहणार भारतीय हा बहुतेकदा वयाची २०२५ वर्षे भारतात राहिलेला असतो आणि भारताच्या संपर्कात असतो..आणि त्याला दोन्ही बाजूंची बऱ्यापकी माहिती असते .. आधी हा खुलासा करतो कि यांनी कुतुहलाले विचारले म्हणून इतरांनी त्याल अप्पपल्या परीने माहिती दिली .. त्यात कुणाचा हा हेतू हा नव्हतं कि "बघा इकडे कसे छान छान आणि भारतातात कसे विचित्र, अवघड वैगरे .." उलट आम्ही असे म्हणत आहोत कि भारतात काही गोष्टी सोप्य्या आहेत तर इकडची लोक "कंटाळा किंवा जेवण बनवता च येत नाही" हे खरे आहे का काय वाटेल ते लिहिलंय तुम्ही... आणि भारताच्या मानाने ( खास करून पुरुष) येथे जास्त प्रमाणात स्वयंपाक तर करतातच पण याशिवाय इतर कामे हि... तसेच येथील स्त्रिया पण घरातील इतर "पुरुषी" कामे करतात ... त्यामानाने भारतातील पुरुष खास करून स्वयंपाक आणि घरकामे कमी करतात.. अर्थात याचा अर्थ जर आम्ही लावावा का कि भारतीय पुरुष आळशी आहेत? तर ते यौग्य होईल का? एकांगी विधान होईल ते. तसेच काहीसे आपले वरील विधान वाटत्ते आठवड्यात एवढी कामे असतात अधिक विकांताला मुलांसाठी टॅक्सी बनणे यात येते आळशी बनायला फुरसत कमीच परदेशातील (सर्व वंशाचे ) नागरिक स्वहस्ते काम करण्यात आळशी असते तर हे देश आज उबघे राहिले नसते.. साधा उदाहरण देतो येथील हार्डवेर दुकानांचे आकार बघा येथे तुम्हाला फक्त अधिकृत प्लम्बर / गवंडी आणि माळी सामान घेताना दिसणार नाहीत तर सर्वसामान्य लोक पण ( पुरुष आणि स्त्रिया सुद्धा ) रंगकाम, बागेचे काम, छोटी नाळ दुरुस्ती , हौसेने मुलांसाठी खेळणी बनवणे , छोटे डेक बनवण्यासारखे घरातील सजावटीचे काम इत्यादी .. मग हे आळशी? जरा विचार करा
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 06/04/2020 - 00:50 नवीन
सहमत आहे. प्रत्येकाला 'आपल्या प्रकारे ' खायला बनवता येतेच. आळशी बनायला फुरसत कमीच अगदी अगदी! हार्डवेर दुकानांचे आकार बघा येथे तुम्हाला फक्त अधिकृत प्लम्बर / गवंडी आणि माळी सामान घेताना दिसणार नाहीत तर सर्वसामान्य लोक पण ( पुरुष आणि स्त्रिया सुद्धा ) हो बहुदा सगळी कामे आपली आपण करून घेण्याकडे कल असतो. काम येत नसेल तर ते कसे करायचे याचे प्राथमिक मार्गदर्शन पण येथे करून मिळते. असा एखादा प्रोजेक्ट चालला असेल तर वेळ अजिबातच मिळत नाही.
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 06/04/2020 - 09:20 नवीन
परंतु आपण हे जे विधान केलं आहे ते मात्र पटत नाही आणि नुसतेच पटत नाही असे नाही तर आपण कोणत्या आधारावर / अनुभवावर लिहिले आहेत हे विचारावेसे वाटते... म्हणूनच वरती सुरुवातीलाच त्यांचा अनुभव विचारला होता. एखादी गोष्ट त्यांना परवडत नाही म्हणजे सरसकट सर्वांना परवडत नसेल असे नाहीये ना..
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 06/04/2020 - 02:32 नवीन
जेडी आपली १२ एप्रिल ची व्यथा ( घरातील स्त्रीला करावे लागणारे काम.. पूर्वी सध्या वैगरे ) आणि सध्याची व्यथा वाचली.. यावर एक उपाय आहे नवऱ्याला घरकामात जास्त सहभाग घ्यायला लावा... एक आवडीचे काम सांगतो...( मजा म्हणून सांगतोय हा... रागावू नका आणि भलता अर्थ काढू नका ) नवरोजी ना हा प्रकल्प घरी करायला सांगा... आवड असेल तर करील आवडीने "डू युअर ओन" प्रकार चे बियर चे किट मिळते का भारतात आणि नियमात बसते का ? ( त्याची जी काय भांडी होतील ती त्याने घासायची ) रिकाम्या बियर चाय बाटल्या आणि बुचे मिळत असतील .. यीस्ट मिळत असेल, बाकीचे मात्र माहित नाही आत्मनिर्भय व्हा असे पंतप्रधांनी सांगितले आहेच ना (खुलासा: दारू पिणे याचे समर्थन नाही )
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 06/04/2020 - 15:10 नवीन
घरातील काम पुरुषांचा सहभाग असावा असे विचार आता व्यक्त होत आहेत त्याला बादलीत परिस्थिती कारणीभूत आहे. पाहिले काम वाटली होती घरकाम स्त्री नी करायचे आणि पैसे कमविण्याची काम पुरुषांनी करायची. जबाबदारी विभागली होती. हे नोकरी करणाऱ्या पुरुषानं विषयी झाले. पण शेती करणाऱ्या मध्ये शेतात पण स्त्री नी पुरुष बरोबर जायचे आणि घरचे पण काम करायचे अशी दुहेरी जबाबदारी पडत असे. पण अती कष्टाची कामे हे पुरुषांनीच करायची असा पण नियम होता. आता नवरा बायको दोघे नोकरी करणारे असतात तेव्हा घरकाम दोघांनी मिळून करावी हा विचार रास्त आहे. मी तर म्हणतो घरातील प्रत्येक व्यक्ती नी स्वतःचे काम स्वतः केले तरी खूप फरक पडेल. मुलांवर सुद्धा जबाबदारी देणे गरजेचे आहे. स्वतः ची plate स्वतः धुणे,स्वतःची कपडे स्वतः धुणे. स्वतःचा पसारा स्वतः उचलणे.. प्रतेक जन स्वतःची कामे स्वतः करू लागला तर कोणत्याच एका व्यक्ती वर कामाचा बोजा येणार नाही. स्वयंपाक करताना सुधा सर्वांनी मिळून करावा.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 06/05/2020 - 01:32 नवीन
युगांडामध्ये लेबर स्वस्त आहे पण काम करत नाहीत , वस्तू चोरून नेतात , काय करावे बरं?
  • Log in or register to post comments
भ
भुजंग पाटील Fri, 06/05/2020 - 06:21 नवीन
यु गांडा भाई, मी तर ऐकले होते की भारतीयांना तिथे ट्रायबल स्टेटस हवा आहे म्हणून. https://www.youtube.com/watch?v=lj7cTYP3Df8 तसे झालेच तर मग चिंताच मिटली, घरात लुंगी म्हणून केळीच्या पाना शिवाय दुसरे काही ठेऊच नका कोणी चोरुन नेण्या सारखे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 06/05/2020 - 07:36 नवीन
लेबर स्वस्त आहेत म्हणजे ह्याची दुसरी काळी बाजू ही असते की बेकारी खूप असल्या मुळे त्यांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला दिला जात नाही. त्यांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळाला नाही तर त्यांच्या बेसिक गरजा भागवण्यासठी ते चोरी करणारच ना. चोरी चे समर्थन नाही ,पण खरी स्थिती कडे डोळेझाक पण नाही.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 06/05/2020 - 07:41 नवीन
भारत असू नाही तर परदेश लोक हौस मौज करण्यासाठी भरपूर पैसा उडवतात पण त्यांची च सेवा करत असलेल्या मोलकरणी ना ,साफसफाई कर्मचारी,सुरक्षा रक्षक ह्यांना कमीत कमी पगारात राबवून घेतात. अंबानी च्या घरी काम करणारी मोलकरीण आणि सामान्य कुटुंबात काम करणारी मोलकरीण आर्थिक बाबतीत एकाच स्तरावर असते. पंच तरंकित हॉटेल मध्ये हजारात टीप देणारे गॅस घेवून येणाऱ्या कामगाराला दहा रुपये पण देत नाहीत. हा विरोधाभास आहेच.
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 06/05/2020 - 14:21 नवीन
सरसकटीकरण टाळा हो. खोब्रागडे प्रकरण हे कमीत कमी पगारात मोलकरणीला राबवून घेण्याच्या मुद्यावरून उद्भवलेले प्रकरण आहे - कोण खरे कोण खोटे माहिती नाही पण मूळ मुद्दा तोच. जिथे मिनिमम वेज चे नियम असतात आणि भ्रष्ट्राचार त्या तळापर्यंत पोहोचलेला नसतो तिथे नोकरांना दिला जाणारा पगार त्या मिनिमम वेज रेट पेक्षा खाली जाऊ शकत नाही - आणि मिनीमम वेजचे रेट चालू काळाशी सुसंगत असतात, बाब आदमच्या जमान्यातले नसतात. त्यामुळे कोणत्याही मुद्द्याचे सरसकटीकरण न करता तुमचा जो असेल तो नेमका अनुभव मांडता आला तर बघा..
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sat, 06/06/2020 - 03:25 नवीन
मोदक अगदी बरोबर बोललात...
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Sat, 06/06/2020 - 03:50 नवीन
कोणत्याही मुद्द्याचे सरसकटीकरण न करता...
बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 06/05/2020 - 14:01 नवीन
भारत असू नाही तर परदेश लोक हौस मौज करण्यासाठी भरपूर पैसा उडवतात पण त्यांची च सेवा करत असलेल्या मोलकरणी ना ,साफसफाई कर्मचारी,सुरक्षा रक्षक ह्यांना कमीत कमी पगारात राबवून घेतात. अति श्रीमंत लोकांचे सोडून द्या सर्वसाधारण माध्यम वर्गीययाचे बघितले तर कोणतया "परदेशात" हे नमूद केल्याशिवाय ह्या विधानाला अर्थ नाही कारण काही "परदेशात" नियमच असे कडक असतात कि असे करणे फार अवघड असते आणि उघडकीला आले तर अवघड असते ,आणि बहुतेकांना तसे करण्याची इच्छा पण नसते.. आपल्या भोवती एक संतुलित समाज ( egalatarian ) अशी श्रद्धा असणारे पण "परदेश "असतात . टक्केवारी चा हिशोब केला तर हे पाह्यलं लागेल कि "मिळणार ताशी दर आणि त्या देशातील/ शहरातील राहण्याचा खर्च " याचे गणित काय आहे ते हे फार वेगवेगळे असू शकते त्यामुळे सर्वच "परदेशानं" एक झोळीत बांधू नका उदाहरण: येथे पगार (कमीत कमी दर) ताशी ऑस्ट्रेलियन डॉलर १९.५० आहे आणि कोंबडी (सोललेली ) दर किलो मागे ४ पासून १२ डॉलर पर्यंत मिळते .. सरासरी ८ डॉलर किलो धरा ,दूध १.५० डॉलर प्रती लिटर धरा आता, भारत , युगांडा, अमेरिका, दुबई, सिंगापोर येथील दर जर कळले तर कोठे काय हे ठरवता येईल. थोडक्यात काय कमीत कमी मिळकत असलेला कामगार काय दर्जाचे आयुष्य जगू शकतो हे त्या त्या देशातील आर्थिक परिस्थितीवर अवलंबून आहे
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sat, 06/06/2020 - 08:57 नवीन
मुंबई मध्ये 24 तास नोकर चा पगार 8 ते 15 हजार पर्यंत आहे. नोकर म्हणजे साफसफाई करणे,इस्त्री करणे, सर्व्हिस देणे(जेवण वाढणे इत्यादी)भांडी साफ करणे हा प्रकार. जेवण बनवणारे. त्यांचा पगार 15 हजार ते जास्तीतजास्त 25 हजार पर्यंत असतो. वरील सर्व गरीब बिहारी असतात. राहणे,जेवण,आणि बाकी सुविधा दिल्या जातात. मालक नुसार सुविधा बदलतात. जास्त करून सरासरी जेवण म्हणजे डाळ आणि भात दोन वेळ फक्त. झोपण्याची सुविधा शिडी वर किंवा छोट्या खोलीत , मुल सांभाळणाऱ्या बायका ह्या सर्व बंगाली आणि झारखंड च्या असतात. पगार तोच 8 ते 12 हजार. 24 तास duty जेवण डाळ, भात. नुकतेच झालेलं मुल सांभाळणाऱ्या पारंपरिक ज्ञान असणाऱ्या बायकांना मात्र जास्त पगार असतो 40 ते पन्नास हजार पर्यंत . पण ही नोकरी सहा सात महिन्यांची च असते. Driver 15 te 20 hajar.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sun, 06/07/2020 - 12:36 नवीन
राजेश आपण एक गृहीत धरा आणि मग माहिती द्या म्हणजे आपल्याला तुलना करता येईल - दोन्ही ऑस्ट्रेलियातील आणि भारतातील नोकर हा बाहेर राहून घरी काम करायला येणार आहे असे धरा ८ तास दिवसाचे फक्त ५ दिवस आठवड्याचे - त्यामुळे त्याला फक्त पगार आणि जे काही प्रॉव्हिडंट वैगरे दिले जाईल ( येथे ९.५% सक्तीचाच आहे भारतात माहित नाही )असे धरा जेवण खान वैग्रे नाही. आणि मग हे बघू कि ताशी जर पगार काढला तर पगाराच्या किती % पैसे , १ लिटर दुधास लागतात आणि १ किलो चिकन ला अप्लायला % फक्त काढ्याची आहे $ रुपये दर वैग्रे जाऊद्या
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… Fri, 07/24/2020 - 11:52 नवीन
मलाही स्वयंपाकाला पूर्ण वेळ मिळत नसल्यामुळे मी खालील गोष्टी करतो - १. ज्या पालेभाज्या निवडायला जास्त वेळ लागत नाही त्या पालेभाज्या करणे. उदा पालक, चुका, करडई, शेपू इत्यादी २. आमटी व भाजी एकत्र करणे - सांबार जास्तीत जास्त वेळ करणे, उसळी/डाळी एकत्र करणे. रोज रात्री झोपताना एखादीतरी डाळ भिजवतो. सोयाबीन, मूग, राजमे, कुळीथ, मसूर, हुलगे, सुके वाटाणे, क्वचित हरभरा इत्यादी. ३. गहू/बाजरी/ज्वारी भिजवून त्या शिजवून उसळी करणे. (संदर्भ खमंग-दुर्गाभागवत) चपाती/भाकरी करण्याला पर्याय म्हणून जे करता येईल ते करावे. उदा - गव्हाची खीर, दलिया उकडून, गव्हा/ज्वारी/नाचणीच्या पीठाचे मुटके ( हे चविष्ट लागतात आणि मला भाताच्या वाफेवर पटकन शिजवता येतात ), गव्हा/ज्वारी चे न आंबवता केलेले डोसे, शेवया. हे सर्व आलटून पालटून केले तर आठवड्यात एकही दिवस चपाती/भाकरी न खाता ही तृणधान्ये खाता येतील. ४. सकाळ-संध्याकाळचे जेवळ एकत्रच शिजवणे. पण अन्न नेहमी गरम करून खातो. ५. काकड्या, मुळे, गाजरं, लेट्यूस, कोबी, वांगी कच्ची किंवा भातावर वाफवून मऊ करून खातो. ६. तीन चार प्रकारचे भाजायचे पापड तोंडी लावायला जेणेकरून अन्नावर रूची राहील. ७. कापायला, निवडायला सोप्या भाज्या ( बटाटा, ढोबळी, फ्लॉवर, वांगी, भोपळे, दोडकी, मुळा इत्यादी). गवार, हिरवे मूग, घेवडा इत्यादी भाज्या सध्या खात नाही. त्यामुळे भात + भाजी + आमटी + चपाती असा चौरंगी आहार न घेता तृणधान्ये + कडधान्ये +/ भाजी( पटकन कच्ची/वाफवलेली/शिजवलेली) असा दुरंगी/तिरंगी आहार घेतो. तोंडी लावायला मग सत्राशेसाठ लोणची/सुक्या चटण्या/कैर्‍या/पापड/मुरांबे असतातच.
  • Log in or register to post comments
न
नचिकेत जवखेडकर Tue, 08/04/2020 - 03:13 नवीन
मी सध्या कुटुंबासहित (पत्नी व १.५ वर्षाची मुलगी) जपानमध्ये राहतो. इथेही तशीच परिस्थिती आहे. एकदा एका इंडियन स्टोरमध्ये आम्ही विचारलं तेव्हा ती बाई म्हणाली की मी रोज येऊन २ तास थांबून पोळी भाजी करण्याचे(मग त्यात बाकीची पण कामं जसं की कणिक मळणे वगैरे) ३००० येन घेईन. ते अर्थातच आम्हाला परवडणारं नव्हतं. त्यामुळे तो पर्याय बाद झाला. इकडे कोरोनामुळे पूर्ण लॉकडाऊन नव्हता पण स्टेट ऑफ इमर्जन्सी लागू केली होती. तेव्हा मुलीचं पाळणाघर पण साधारण २.५ महिने बंद होतं . मी व माझी पत्नी देखील पूर्णवेळ नोकरी करत असल्यामुळे ऑफिसचं काम आणि दिवसभर मुलीला सांभाळणे आणि घरातील कामं यात खूप तारांबळ उडायची. पण मग मी व पत्नी २ २ तासांच्या शिफ्ट मध्ये ऑफिसचं काम करू लागलो. सकाळी लवकर उठून पत्नी नाश्ता, पोळ्या वगैरे करून कामाला बसली की मी बाकीची सगळी कामं बघणार मग त्यात भात लावणं असो, भाजी करणं असो, मुलीकडे बघणं असो, असं सगळंच आलं. किंवा माझ्या काही मिटींग्स असतील तेव्हा ती तो सगळा वेळ मुलीकडे बघणे, मधल्या वेळचं खाणं बनवणे अशी कामं करायची. मुलगी रात्री साधारण ८.३० ला वगैरे झोपली की जरा निवांत वेळ मिळायचा :) पण ते २.५ ते ३ महिने आम्ही मुलीबरोबर पण खूप वेळ घालवला की जो एरवी नाही मिळू शकत नाही. मी स्वतः पत्नीच्या मार्गदर्शनाखाली बरेच पदार्थ करायला शिकलो, की जे एरवी कधीच माझ्याकडून व्हायचं नाही. त्यामुळे एका अर्थी इथे भारतात मिळते तेवढी मदत नाही मिळाली हेही बरंच झालं!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा