Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

।। मातृदशक ।।

अ — अमोल_००३, Wed, 05/27/2020 - 22:32
आता वंदितो आईसी | जिने धरिले उरासी | जेव्हा आलो जन्मासि | वात्सल्याने || १ || नवमांस गर्भ वाढविला | सोसूनि सर्व यातना-कळा | न जाणो तूज किती वेळा | दुखावले मी || २ || हाती धरोनि चालविले | बोल बोबडे बोलविले | शहाणपण शिकविले | जगण्याप्रती || ३ || कलागुणांचा वारसा | दिला आम्हां छानसा | स्वयें दाखविला आरसा | योग्य वेळी || ४ || निरपेक्षभावे मनासि | दिले अखंड ज्ञानासि | अज्ञानी या मुलासि | शहाणे केले || ५ || जैसी घार पिलांसि | जैसी वेल फुलांसि | तैसे जपले मुलांसि | सावधपणे || ६ || घडल्या चुका जरी हातून | मार्ग दाखविला त्यातून | जेणेंकरुन त्या परतून | न होणे कधी || ७ || आई तुला मी काय म्हणू | माझ्या ठायीचा अणू - रेणू | जीवननौकेचा सुकाणू | आहेस तू || ८ || जाणतो मी मनोगती | तुझी भावना आमुच्याप्रती | तरी पुन्हा ही विनंती | एकवार || ९ || धरावे ऐसेचि शिरी | आपुल्या मंगल करी | कृपाछत्र आमुच्यावरी | अखंडित || १० ||

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3568 views

💬 प्रतिसाद
र
रातराणी गुरुवार, 05/28/2020 - 08:02 नवीन
_/\_ छान!!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 05/28/2020 - 08:29 नवीन
सुरेख लिहिले आहे, आवडले, आता पितृदशक, भ्रातृदशक, भगिनीदशक, आचार्यदशक, मातामहदशक, पितामहदशक, मातुलदशक, पितृव्यदशक आणि सखादशकही लिहून दशकांचे दशक लिहावे ही आग्रहाची विनंती. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 05/29/2020 - 13:02 नवीन
मिपा दशक राहीलं !
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 05/28/2020 - 16:15 नवीन
अप्रतिम, --- थोडे माझे लिहितो असेच... नवमांस गर्भ वाढविला | चिरंजीवी श्वास दिला | तोच स्वर्ग बनविला | माझ्यासाठी|| पुनर्जन्म तेथीची व्हावा | पुन्हा मायेचा ठेवा | तुझ्या काळजाचा तुकडा | माझ्यासाठी || - गणेशा
  • Log in or register to post comments
अ
अमोल_००३ Fri, 05/29/2020 - 12:59 नवीन
रातराणी, पैजारबुवा, गणेशा, प्रतिसाद / प्रतिक्रिया दिल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद !!! @ पैजारबुवा : दशकांचे दशक ही फार मोठी गोष्ट आहे. तरीही आपल्या विनंतीला मान देण्याचा माझ्या क्षमतेनुसार जमेल तसा नक्कीच प्रयत्न करेन. @ गणेशा : तुम्हीही फारच सुंदर लिहिले आहे. एकाच गोष्टीकडे / घटनेकडे किती तरी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो आपण !! आणि तरीही ती गोष्ट / घटना १०० % तशीच आहे किंवा असावी याची खात्री देता येईलच असे नाही, किंबहुना तशी ती देता येतच नाही. कारण ती गोष्ट त्या पलीकडेही अजून शिल्लक उरलेलीच असते. जेवढी आपली जाणण्याची कुवत किंवा क्षमता तेवढेच आपल्यासाठी सत्य, हेच खरं !!! पुन्हा एकदा सर्वांचे आभार !!! अमोल_००३
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Sat, 05/30/2020 - 21:21 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments
P
Prajakta२१ Sun, 05/31/2020 - 20:04 नवीन
पु ले शु
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 16 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 16 hours ago
  • सुंदर !!
    1 day 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा