Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

बायका...

प — प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, Wed, 05/27/2020 - 09:14
काल ते म्हणाले, सगळ्याच बायका तशा असतात. तशा म्हणजे नेमके कशा, म्हणून शोधु लागलो, बायका. पुराणात, प्राचीन ग्रंथात, ऑफिसात, समोर- मागे, इथे तिथे. गुगलवर. अगदी मिपावरही. असतात बायका, हळव्या, खंबीर,धीट आणि तितक्याच कर्तबागरही. बायका असतात, पुरुषां प्रमाणेच. सोशिक, शोषित आणि बंडखोरही काहींनाच जाणवतात, खोल-खोल श्वास, अन् ते शब्द. काहींना नाही इतकाच, फरक असतो त्या, मुक-संवादाचा. बायकात असते एक बाई, अन आईही. बायको- प्रेयसी, मैत्रीण आणि एक मुलगीही. आदिम काळापासून सोबत आणि शिवाय, सुरु असलेल्या बायकांचा समर्थ प्रवास अव्याहतपणे. बायका म्हणजे अस्वस्थ तगमग. लिहिता येत नाही त्यावर कविता, लेख. आणि वैचारिकही. बायका असतात समुद्रगाज. निळा अथांग सागर अन, हळूवार पणे हृदयावर धडकणा-या लाटा. बायका असतात, काळजी-आधाराचा आधारवड. गूढ़ महाकाव्य. आणि एक नवा अंकुर सुष्टीतला. बायका असतात ....

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 31196 views

💬 प्रतिसाद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/29/2020 - 06:25 नवीन
प्रा.डॉ. सर सॉरी बर्का!
नै नै, तसं कै नै. वाटलं की बोलत राह्यचं माणसानं. मरने के बाद आदमी कुछ नही बोलता, मरने के बाद आदमी कुछ नही सोचता. जब आदमी कुछ नही बोलता, जब आदमी कुछ नही सोचता तब आदमी मर जाता है. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Fri, 05/29/2020 - 08:28 नवीन
चांदणे भौंना क्षीरसागरात तारे दिसले म्हणायचे का? कृ.ह.घे. ;)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 05/29/2020 - 06:13 नवीन
च्यायला एवढे सगळे रामायण वाचून सुध्दा रामाची सीता कोण हे समजलेच नाही. या विद्वत्जनांच्या मांदियाळीत माझ्या सारख्या अतिसामान्य बुद्धीच्या जीवाचे मडके कोरडेच राहिले. जन्मजातच पालथे असावे कदाचित. चला उठा मंडळी, तुमचे सगळ्यांचे झाले असेल तर सतरंज्या उचलायला लागू का? पुढचा कार्यक्रम कधी सुरु होईल काही सांगता येत नाही. तुम्ही लोकच परत सतरंजी साठी झुंबड उठवता नव्या ठिकाणी. आणि हो उठल्यावर ते जमिनिवर सांडलेले पॉपकॉर्न जमतील तेवढे गोळा करा, पुढच्या कार्यक्रमाला उपयोगी पडतील. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Fri, 05/29/2020 - 07:15 नवीन
एकच मार्‍या, लेकिन क्या मार्‍या ! :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 18 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 18 hours ago
  • सुंदर !!
    1 day 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा