Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

चक्र

अ — अनन्त्_यात्री, Wed, 05/27/2020 - 08:38
झुंजूमुंजू आभाळात किती सांडले केशर सोनसळत्या सकाळी निळे झळाळे अंबर तळपत्या माध्यान्हीची वितळती काचधार धूसरशा संध्याकाळी अदृष्टाची हुरहूर नि:शब्दाच्या चाहुलीने जागे रात्र काळीशार प्रहरांच्या रंगी रंगे बिलोरी हे कालचक्र चक्रनेमिक्रम त्याचा अनादि नी निरंतर

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6064 views

💬 प्रतिसाद
प
प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) Wed, 05/27/2020 - 08:50 नवीन
सुंदर कविता. रिलेट झाली आताच येथे वर्तुळ चक्र लिहिल्यामुळे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 05/27/2020 - 09:02 नवीन
वा. खुप आवडली कविता. तळपत्या माध्यान्हीची वितळती काचधार काय लाईन्स आहेत.. वितळती काचधार हा खूपच आवडला शब्दप्रयोग. पहिल्यांदा च वाचला.. मस्त.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 05/27/2020 - 09:30 नवीन

नाद बद्ध रचना आणि नवविन अर्थपूर्ण शब्द हे अनंत यात्रींच्या कवितांचे वैशिठय आहे.

आपण आपले वाचत जायचे, आणि अर्थ लावत बसायचे. हे बघ "क्षण क्षणास जोडित जाता, वाटले काळ संपेल, पण वितान हे काळाचे, दशदिशा व्यापुनी उरले" मागे एकदा त्यांनी "जनुक जिन्याची सर्पिल वळणे" असा एक शब्द प्रयोग केला होता एका कवितेत "माझा कावळा अजब, जीवखड्याशी खेळतो" असे लिहिले होते एकदा "अनोळखी वाट, घनदाट वनी मला नेते, निब्बरल्या तनामना, नितळ सावली देते" ह्या ओळी पण वाच "कृष्णविवराचा चव्हाटा, तेथ पुंजभौतिकीचा बोभाटा, चारी मितींचा उफराटा, कोलाहल माजला" आणि हे पण "कुतूहलास पारव्या, केशरीशी ज्ञानफळे, हिर्वळीस सर्जनाच्या, किल्मिषांचे खत काळे" आणि हे शेवटचे "काफिल्यात विरघळताना, गारूड निळेसे पडले, की स्वप्न निळावन्तीचे, मी माझ्यावर पा॑घरले" अचाट प्रतिभा आहे या माणसा कडे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 05/27/2020 - 09:54 नवीन
अय्यो.. काय मस्त.. आता शनिवार रविवार वाचतो.. मध्ये नसल्याने कितीतरी जन मला माहीत नाहीत.. शनिवार -रविवार मज्जा येईल.. पण माझं सायकलचं लिखान कधी होईल मग.. देवा.. जाऊदे..
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 05/27/2020 - 10:02 नवीन
नाद बद्ध रचना आणि नवविन अर्थपूर्ण शब्द हे अनंत यात्रींच्या कवितांचे वैशिठय आहे.
आणी
अचाट प्रतिभा आहे या माणसा कडे
याच्याशी बाडीस! आदळले शब्दतरंग थरारून गेलो गात्री असे काव्य जोखूनि आले अनंताचे यात्री सं - दी - प
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Tue, 06/02/2020 - 13:50 नवीन
अनुमोदन!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 05/27/2020 - 09:31 नवीन
क्रूपया नवविन अर्थपूर्ण शब्द ऐवजी नवनविन अर्थपूर्ण शब्द असे वाचावे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 05/27/2020 - 09:33 नवीन
सुंदर कविता.
तळपत्या माध्यान्हीची वितळती काचधार
अप्रतिम शब्दरचना. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Wed, 05/27/2020 - 22:11 नवीन
वा! अप्रतिम कविता..
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sat, 05/30/2020 - 12:11 नवीन
देणार्‍या सर्व कवितारसिकांना मन:पूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Tue, 06/02/2020 - 13:48 नवीन
सहज सुंदर!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 17 hours ago
  • सुंदर !!
    1 day 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा