Survival of the fittest.....
परवा ऑफिसला जाण्यासाठी ठाण्याहून बस पकडली. बाजुच्या सिटवर बसलेल्या मुलाने बॅगेतुन पुस्तक काढुन वाचायला लागला. मोबाईलच्या जमान्यात चक्क पुस्तक वाचताना पाहुन माझं कुतुहलही चाळवलंच. हळुच वाकुन पाहिलं तर पब्लिक सर्व्हिस परिक्षेचं पुस्तक होतं. म्हटलं घ्यावा जरा याचा इंटरव्हयू. तेवढाच आपलाही टाईमपास होईल.
तोपर्यंत बसही सुसाट वेगाने निघाली होती.
मी- कसला अभ्यास करतोयस ? कोरोना चा का ? (खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा व्हाव्यात म्हणून मी कोपरखळीने सुरुवात केली..
तो-पब्लिक सर्व्हिस कमिशन परिक्षेचा अभ्यास करतोय..
मी- मग कोरोना बद्दल काही वाचलंस का ? काय होईल पुढे ? आटोक्यात येईल का ?
तो-कोरोना बद्दल अधिकृत काॅमेंट करायला मी डाॅक्टरही नाही आणि वैज्ञानिकही नाही.. पण हो, W.H.O., केंद्र सरकार, राज्य सरकार, जागतिक पातळीवरच्या घडामोडी यांवरून काही गोष्टी स्पष्ट होतायत.. कोरोना हा विषाणू आता आपल्या सोबत किमान काही वर्षे तरी राहणार.. आणि याबाबत वेळोवेळी प्राप्त होणार्या सुचना काटेकोरपणे पालन कराव्या लागतील. *डार्विनच्या सिद्धांतानुसार it's survival of the fittest..* so, fit रहायचा प्रयत्न करायचा..
मी- म्हणजे यापुढे कायम योगा प्राणायाम, व्यायाम करावा लागणार..
तो-ते तर आहेच.. पण त्याहुन थोडं पुढे जाऊन मी असं म्हणेन कि आपण आपल्या औकातीत रहायला शिकायला हवं..
मी- म्हणजे ?
तो-आपण जन्माला येताना तीन गोष्टी सोबत घेऊन येतो.. बौद्धिक- शारीरिक आणि मानसिक ताकद, घरचे संस्कार आणि आपलं नशीब... यातुन जे निर्माण होतं त्याला व्यक्तिमत्व विकास म्हणतात.. त्यातूनच निर्माण होते इम्युनिटी.. कुठल्याही रोगाशीच नाही तर समस्येशी लढण्याची ताकद.. ती कुणाची थोडी कमी अधिक असु शकते.. ती प्रामाणिकपणे कशी वाढवता येईल याचा प्रयत्न करायला हवा..
पण सध्या प्रोटीन पावडर खाऊन दंडावर बेडकुळ्या दाखवत फिरण्याच्या शाॅर्टकट काळात ,स्पर्धेत टिकण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब केला जातो त्यातुन तयार होतं tension आणि त्यातुन तयार होतात विविध आजार.. त्याने इम्युनिटी कमी होते आणि नेमका तेव्हाच कोरोना चा शिरकाव होतो.. हेच जर आपण वास्तव स्विकारून प्रामाणिकपणे राहिलो तर कमी त्रास होईल..
मी-मग यात सरकारच्या कामाबद्दल तुझं काय मत ? तू जर पंतप्रधान असतास तर काय केलं असतंस ?
तो- शाळेतल्या निबंधाची आठवण झाली.. जर मी पंतप्रधान असतो तर.... असो, मी जर पंतप्रधान असतो तर केंद्रीय आरोग्य खात्याला जागतिक पातळीवर गांभीर्याने लक्ष ठेवायला लावलं असतं.. जगात कुठल्या देशात कोणत्या रोगाची साथ पसरतेय ते लक्ष ठेऊन तिथुन देशात येणार्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली असती.. एअरपोर्टवर इमिग्रेशन पासूनच त्यांना ट्रॅक केलं असतं.. त्या रोगावर कोणते औषधोपचार उपलब्ध आहेत ते प्रयोग आणि प्रयत्न केले असते.. जगभर रोग पसरल्यावर तीन महिन्यांनी अचानक रातोरात सगळं बंद नसतं केलं.. सव्वाशे कोटींचा देश आहे आपला.. किमान आठवडा दिला असता आपापल्या घरी/ गावी पोहोचायला, किराणा सामान भरुन ठेवायला आणि मग महिनाभर पुर्ण संचारबंदी लागू केली असती..फक्त दवाखाने आणि मेडिकल स्टोअर सुरु ठेवली असती.. जे आजारी असतील / होतील त्यांना आरोग्यसेवा आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहिली असती बाकी सर्व बंद..
लाॅकडाऊनच्या काळात तसंही प्रदुषण कमी झालंय.. लोकांना स्वतःसाठी, कुटुंबासाठी वेळ देता येतोय.. त्याचा चांगला वापर करायला सांगितलंं असतं..
मी- हे झालं .. आता पुढे काय करावं असं तुला वाटतं ?
तो-आता आपण कचाट्यात सापडलोत.. लाॅकडाऊन उठवला तर कोरोना जोमाने पसरण्याची भिती आणि नाही उठवला तर अर्थव्यवस्था अडचणीत सापडण्याची भिती..
मी- मग ? यावर उपाय काय ?
तो- मला वाटतं.. आता हळुहळु लाॅकडाऊन उठवायला हवा.. कोरोना सोबत जगायच तर टप्प्याटप्प्याने सगळं सुरू व्हायला हवं.. भाजीपाला विकायला परवानगी आहे.. पण ज्याचा चष्मा तुटला त्याने काय करायचं ? चष्म्याचं दुकान बंद.. इलेक्ट्रिकचं दुकान बंद.. गर्दी कुठे जास्त होणार- भाजीपाला घ्यायला कि चष्मा, लाईटस् घ्यायला ? ते गरजेचे नाही का ? निर्णयात विसंगती जास्त दिसते..
मी- पण शेतकर्याला मदत नको का करायला ?
तो- हवी ना.. पण मग मदत नको असा कोण आहे इथे ? उद्योजकांना नको का मदत ?
छोट्या व्यापार्यांना- दुकानदारांना नको का मदत ? हे सगळे टिकले तर नोकर्या टिकतील.. शेतकरी उद्योजक आणि नोकरदार सगळेच टिकले पाहिजेत ना..
मी-पण त्यासाठी पैसा कुठून आणायचा ?
तो-कोण म्हणतं अर्थव्यवस्था अडचणीतून बाहेर काढायला पैसा लागतो म्हणुन ?
मी- नक्की काय म्हणायचंय तुला ?
तो- शाळा काॅलेजमधे शिकवलं जातं कि धंदा व्यवसाय करण्यासाठी land, labour आणि capital लागतं.. पण वास्तवात धंदा व्यवसाय करण्यासाठी लागतो आत्मविश्वास.. कधी तो कुणात जन्मतः असतो तर कधी तो द्यावा लागतो.. सरकार जेव्हा तो देते, तेव्हा धंदाच काय अख्खा देश उभा राहतो.. फक्त तो मनापासून द्यायला हवा..
बरं, पुढच्या स्टाॅपवर उतरायचंय.. मी निघु ?
मी- खुप छान बोलतोस ....एक शेवटचा प्रश्न-
कोरोनाच्या या काळात आपलं काय होईल ?
तो -- शक्य होईल इतकी दक्षता घ्यावी.. आणि आपापली कामे प्रामाणिकपणे करावी..
तीन तत्वं लक्षात ठेवायची-
Survival of the fittest..
जगा आणि जगू द्या..
एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ..
एवढं बोलून तो उतरला..
श्रीकृष्णाने अर्जुनाला रणभूमीवर गीता सांगितली होती हे ऐकलं होतं.. या पोराने मला कोरोनाच्या या बसप्रवासातील या रणभूमीवर आयुष्याची दिशा दिली..
('मराठी संस्कृती' ग्रुप वरून साभार)
🗣 चर्चा
(113)
च
चौकटराजा
Sat, 05/30/2020 - 12:50
नवीन
खरे तर स्वस्ताई ... वगरे ही माझी " अच्छे दिन " बद्दल अपेक्शाच नव्हती. पण वर किमतीचा घोळ ई नागरिकोपयोगी सुधारणा जरी मोदीनी केल्या असत्या तरी मी म्हणतो ठीक आहे " अच्छे दिन" आले. एकच असेच उदाहरण देतो. तुम्हाला रोकड रहित अर्थव्यवस्था हवी ना ,मग क्रेडिट कार्ड डेबिट कार्डचा खर्च ए टी एम महाग करून भरून काढा. लोक आपोआप रोकड काढणे बन्द करतील. आता लोक बिलाच्या रान्गेत उन्हात उभे राहयला नको पेट्रोल खर्च नको म्हणून वीजेचे बील ओन लाईन भरतात त्या ऐवजी रोख भरले तर ते महागात पडेल अशी व्यवस्था केली तर गरीब लोकाना देखील ओन लाईन शिकून घ्यावे लागेल. त्याना ते येणारच नाही जमणारच नाही असे किती वर्ष करणार...? अशा कितीतरी योजना सामान्य माणसान्च्या डोक्यात आहेत पण व्होट बॅन्क लान्गूलचालन जो पर्यन्त सम्पत नाही तोवर कसल्या सुधारणा ..... ?
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Sat, 05/30/2020 - 13:42
नवीन
१) "अर्थात, व्यावसायिकांनी मुळ किंमती त्याच ठेवून त्यावर जिएसटी वसुली चालू केली."
हो चुकीचे पण हा हलकट पण व्यवसायिकांचाच ,, सरकार कसे दोषी? एक तर मुळात कर भारत नवहते काही व्यासायिक आणि ग्राहक आणि दुसरे जी एस टि आल्यावर मूळचाच जो कर होता तो काढून जी एस टी लावणे हे व्यावसायिकांनी केले नाही .. पण चूक सरकारचीच .. अरे काय हे !
२) गोची बद्दल चे माझे विधान सर्वच भारतीय समाज आणि त्या अनुषंगाने सरकार यांच्यावर होते ... म्हणजे मुळातच यंत्रणा निर्माण करताना नीट करायची नाही हे स्वान्त्र्य पासून chayaa सर्व सरकार काही निर्णयातून दिसते ... पण आपण मात्र फक्त "सध्याचेच सरकार असे करते असे भासवताय"
"समाज सुबुद्ध असता तर असे झोलबाज सरकार निवडून कसे आले असते ?"
.. अरे बापरे प्रत्येक ठिकाणी तुम्ही काही "फक्त सध्याच्या सरकार कसे चुकीचे हे दाखवून देणे हा एकाच धोशा लावणार असे दिसतंय..असू दे त्यातून तुम्हाला कोणतातरी असुरी आनंद मिळत असेल तर तो तुम्हालाच लखलाभ...
त्यामुळे आता एखाद्या मुद्य्यांत आपल्यासही सहमत होणे याची पण भीती वाटू लागलीय...
तरी "भारत गोची कशी करते " याचे उदाहरण देतो आणि ते सरकार नेहरूंचे होते ६1 साली त्यांनी दूरगामी विचार करून राष्ट्रीय डिझाईन संस्थान पल्डी अहमदाबाद स्थापली ..१० पैकी १० .. पण गोची अशी केली कि तेथील अभ्यासक्रमाला सुरवातीला नाव होते "डिप्लोमा पदविका " आज बघितले तर त्याला डिग्री ( पदवी) असे असले तरी
साधारणपणे १०+ ३ म्हणजे डिप्लोमा आणि १०+२ + ३ किंवा ४ वर्षे म्हणजे डिग्री असे असताना एका उच्च स्तरीय राष्ट्रीय संस्थतून जर पदवी स्तरावरील शिक्षण देणे हा हेतू होता तर त्याला डिप्लोमा का नाव दिले मुळातच ??? म्हजे तेव्हा तिथून शिकून बाहेर पडलेले जर डिग्री चाय पात्रतेतेचे होते तर मग त्यांना उद्योगात नोकरी मागताना इतर डिग्री ( इंजिनेर किंवा आर्किटेक्ट यांचं बरोबर स्पर्धा करताना ) असलेल्या उमेद्वारांबरोबर आधी एक अडथळा दूर करावा लागत असेल कि... साहेब माझी पण डिग्रीचा आहे
आणि हे खास करून तेव्हा इंडस्ट्रियल डिझाईन हे मेकॅनिकल इंजिनीरिंग च्या मानाने फार नावे होते म्हणजे अजून प्रश्न
थोडक्यात काय अशी गोची एकटे भाजप सरकार करते असे नाही तर सर्व सरकारे करतात .. आणि मग अश्या अडचणी निर्माण होतात
शिक्षण क्षेत्रातील अजून एक डीम्ड युनिव्हर्सिटी हि काय भानगड? एक तर संस्ताह युनिव्हर्सिटी दर्जाची आहे किंवा नाही? हे डीम्ड काय भानगड?
असो आधी म्हणल्या प्रमाणे आता अप्लायशी सहमत होण्याची पण भीती वाटतीय ...आपले चालू द्या पुरेसे "फॅन आहेत मिपावर " त्यांचा वारा घ्या आणि सुखी राहा
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sat, 05/30/2020 - 17:08
नवीन
मग व्यावसायिकांवर अॅक्शन कोण घेणार मिलट्री ?
जिएसटी मोदींनी आणलायं आणि देशापुढे सध्या तो प्रश्न आहे.
बाकी सगळे मुद्दे संपल्यावर तुम्ही आगदी मोदींसारखे नेहेरुंवर घसरलात !
इतकी घोडचूक होऊन तुम्ही पुन्हा मोदींची तळी उचलतायं हे आश्चर्य आहे.
थोडक्यात, तुम्हाला मुद्द्याशी काही देणंघेणं नाही.
काहीही करुन मोदींचा जयघोष केला की दिवस सार्थकी लागला !
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 05/30/2020 - 17:30
नवीन
https://economictimes.indiatimes.com/news/economy/policy/gst-rate-guide-know-all-the-things-that-will-get-cheaper-after-midnight/articleshow/59386840.cms
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sat, 05/30/2020 - 18:45
नवीन
ET Online|Last Updated: Jul 02, 2017, 12.31 PM IST
जरा विचार करुन आणि किमान स्वतःच्या अनुभवाशी पडताळून लिंक देत जा.
यातल्या नक्की कोणत्या वस्तु स्वस्त झाल्या आहेत ?
1. Milk powder
2. Curd
3. Butter milk
4. Unbranded natural honey
5. Dairy spreads
6. Cheese
7. Spices
8. Tea
9. Wheat
10. Rice
11. Flour
12. Spices
13. Groundnut oil
14. Palm oil
15. Sunflower oil
16. Coconut oil
17. Mustard oil
18. Sugar
19. Jaggery
20. Sugar confectionery
21. Pasta
- Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे
Sat, 05/30/2020 - 17:48
नवीन
आताही काही दुकानदार गिऱ्हाईकाला बिल नको असल्यास जी एस टी न लावता कमी दराने माल विकतात. ह्यामुळे सरकारच्या महसुलावर काही फरक पडतो का?
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Sun, 05/31/2020 - 04:33
नवीन
काहीही करुन मोदींचा जयघोष केला की दिवस सार्थकी लागला !
अजिबात नाही नॉन्सेन्स .. चूक ते चूक बरोबर ते बरोबर.. दुरदैवाने भाजप बद्दल जरा जरी चांगले बोलले कि लगेच ती व्यक्ती "भक्त" बनते.. हा पलायनवाद झाला..मी आधीच म्हणाला ना मोदींचे चुकले कि त्यांनी जीएस टी राबवताना अशी गोची का करून ठेवली? .. जशी गोष्टी नेहरूंनी पण केली? का तुम्ही पण नेहरूंवियन काँग्रेसी विचारसरणीचे आंधळे भक्त आहात !
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sun, 05/31/2020 - 08:00
नवीन
> मी आधीच म्हणाला ना मोदींचे चुकले कि त्यांनी जीएस टी राबवताना अशी गोची का करून ठेवली?
कळलं ना !
> का तुम्ही पण नेहरूंवियन काँग्रेसी विचारसरणीचे आंधळे भक्त आहात !
पक्ष आणि व्यक्ती श्रद्धा हे स्वतःचा विचार नसलेल्यांचं काम आहे.
मला कायम मुद्दा महत्त्वाचा आहे.
आणि सध्या जिएसटी आणि त्याचे परिणाम यावर चर्चा चालू आहे.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Sun, 05/31/2020 - 08:19
नवीन
मोदींबरोबर नेहरू कशाला?
कारण मोदींना जे आंधळा विरोध करतात ते हे विसरतात कि मेक इन इंडिया सारख्या गोष्टी चा पाठपुरावा नेहरूंनी पण केला होता आणि तो योग्यच होता ( मी आंधळं मोदी भक्त असल्यामुळे तर नेहरूंनी केलेले सर्व चुकीचे असेच मला म्हणले पाहिजे नाही का.."
तसेच जर मोंदींनी जी एस टी अमलात आणताना चुका केल्या असतील तर मग त्यांचे विरोधी विचारसरणीचे नेहरू यांनी हि घोडचूक केल्यात .. हे दाखवल्यावर का ओरडताय?
पक्ष आणि व्यक्ती श्रद्धा हे स्वतःचा विचार नसलेल्यांचं काम आहे.
इथे श्रद्धेचा प्रश्न नाही ...जे यौग्य वाटते त्याला पाठिंबा असा सरळ साधा हिशोब आहे .. मनमोहन सिंगांनी अर्थव्यवस्थेवर काम केले त्याचे जसे मी कौतिक करतो तसेच त्यांचा बोटचेपे स्वभाव आणि मूग गिळून गप्प बसने यावर तिकिकही करतो... मग येथे आंधळा राग किंवा भक्ती कुठे आली?
आणि आपल्याला वरील विधानावरून असे दिसतंय कि आपल्याला सर्व ते काय कळते.. असू द्या राहा भ्रमात
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
Sun, 05/31/2020 - 12:51
नवीन
जिएसटीमधे नेहेरु, मनमोहन, कुणाचा काहीएक संबंध नाही.
त्यांच्या यशापयाशच्या तुमच्या मतावर वेगळा लेख लिहा.
- Log in or register to post comments
ब
बापू मामा
गुरुवार, 05/28/2020 - 18:18
नवीन
प्रतिक्रिया नोंदवताना हा विचार केला पाहिजे की परप्रांतियांवर जे ओढवले आहे ते आपल्यावर ओढवले असते तर?
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/28/2020 - 18:40
नवीन
मोदीविरोधी असा रंग दिला की पूर्ण काँटेक्स्ट बदलतो आणि मूळ मुद्दा हरवतो.
- Log in or register to post comments
N
NiluMP
Fri, 05/29/2020 - 18:34
नवीन
कोविड च्या या काळात अर्थक्रांती सल्ले कामाला आले असते का ?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3