हसण्या उसंत नाही
रडण्यास अंत नाही.
निळे सावळे जगणे
मजला पसंत नाही.
बहरली जरी झाडे
हा तो वसंत नाही.
दिले टाकुन जरी तू
मी नाशवंत नाही.
सांगुन थकलो मी, पण
दुनिया ज्वलंत नाही.
-कौस्तुभ
शुद्धसती मात्रावृत्त
नाही तर, शब्द कितीही वेगळे वाटले तरी ते परिणाम साधत नाहीत.
वृतांचा अभ्यास, लयीची जाणिव साधली आहे पण अनुभवाला वाचन, चिंतन, संवेदनाशीलतेनं जगणं आणि सरते शेवटी काव्यविषयाचा कैफ येणं याला पर्याय नाही. सतत कविता करुन नुसता रियाज होईल पण मैफिल जमणार नाही.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yeh Jo Teri Payalon Ki Chan Chan Hai... :- Masoom