Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

कोण जमूरा कोण मदारी..

स — सेफ्टीपिन, Sun, 05/17/2020 - 15:02
कोण जमूरा कोण मदारी तीन पायांची शर्यत न्यारी कोण जमूरा कोण मदारी बुद्धिबळाच्या या पटावर इथे नांदते घराणेशाही लोकशाही टांगून खुंटीवर प्रजेस बोलायची चोरी लोण्यावरती ठेवूनि डोळा इमानाच्या खोट्या शपथा सरड्यासंही वाटावा हेवा वजीराची तर बातचं न्यारी हत्ती, घोडे आणि उंटही फिरता वारे चाल बदलती मोह-मायेचे हे पुजारी कसली निष्ठा अन कसली भक्ती प्याद्यांची पण कथा निराळी निसुगपणाची दाट काजळी 'संकटाच्या' तव्यावर देखील शेकती स्वार्थाची पोळी कोरड्या घोषणा भाबडी आशा प्रजा बिचारी केविलवाणी सावळ्यासंही गहिवर येई सावळा गोंधळ दरबारी स्वतःभोवती गिरक्या घेत राजा सांगे प्रजेस कहाणी 'मी', 'माझे', 'पूर्वज माझे' अन कर्तृत्व तयांचे.. ............. रुळांची उशी... खडीचे अंथरूण... दाटले आभाळ... पापण्यांवर पाणी तीन पायांची शर्यत न्यारी कोण जमूरा कोण मदारी

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5589 views

💬 प्रतिसाद
क
कौस्तुभ भोसले Sun, 05/17/2020 - 16:36 नवीन
छान
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 05/18/2020 - 13:31 नवीन
छान !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Samjho Na Kuch To Samjho Na...
  • Log in or register to post comments
क
कादंबरी... गुरुवार, 05/21/2020 - 19:16 नवीन
छान कविता. अर्थपूर्ण. विचार करायला लावणारी.
  • Log in or register to post comments
ब
बबु Fri, 05/22/2020 - 09:25 नवीन
ही तीन पायान्ची शर्यत इन्डिया आणि भारतामधे आहे.
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Fri, 05/22/2020 - 15:16 नवीन
नेमेची येतो पावसाळा ह्या म्हणी प्रमाणे निवडणुका होतात, स्वताला साक्षर सुशिक्षित म्हणवणारे, "सगळेच उमेदवार वाईट" म्हणून मतदानाप्रती उदासीनता दाखवतात. मात्र गरीब, गरजू न चुकता अगदी रांगेत उभे राहून मतदान करतात, त्यांचे उमेदवार निवडून येतात आणि मग सुशिक्षित त्यांच्या नावाने खडे फोडायला लागतात. जोपर्यंत निवडून आलेल्या उमेदवाराला त्याचा पाच वर्षांचा काळ संपायच्या आधी जनता माघारी बोलवू शकत नाही (अमेरिकेत ती तरतूद आहे) तोपर्यंत कालपरत्वे आपणच जमुरा आणि आपणच मदारी. निवडणुका होईपर्यंत आपण मदारी व त्यानंतर आपणच जमुरा, निवडून दिलेले उमेदवार मदारी.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sat, 05/23/2020 - 07:12 नवीन
रुळांची उशी... खडीचे अंथरूण... दाटले आभाळ... पापण्यांवर पाणी निशब्द
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 16 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 16 hours ago
  • सुंदर !!
    1 day 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा