Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

रुमाल

M
mindsriot
Sun, 05/17/2020 - 07:09
💬 2 प्रतिसाद
Man without handkerchief is a naked man. रुमाल, कापडाचा एक तुकडा, अनेक आकार, रंग, उपयोग. शाळेतल्या बच्चेकंपनीचे रंगीबेरंगी, छोटे छोटे, मऊमऊ, शर्टवर सेफ्टी पिनने अडकवलेले. कधीकधी आवश्यकता म्हणून तर कधीकधी त्या दाग अच्छे है सारख्या जाहिरातीतल्या पुरुषी आवाजाच्या मम्म्यांसारख आव आणण्यासाठी. जरा कळती शाळकरी मंडळी, त्याच्या/तिच्या नावाचं इंग्रजी आद्याक्षर पेनानं/एंब्रायडरी, रुमालाच्या एका कोपऱ्यावर. कधीकधी रुमालाच्या घडीत पावडर किंवा अत्तराचा शिडकावा सुगंध, मटकने, टाईमपास. काॅलेजमध्ये जाणारी मंडळी, टुकारपणा मिरवायला कुठल्याशा देशाच्या झेंड्याचा लाल-काळा, तर कुठे पुन्हा रंगीबेरंगी, छोटे छोटे, मऊमऊ. "हाथोंमे आ गया जो कलsss रुमाल आपका" किंवा "राह मे एक रेशमी रुमाल मिला है". मोठी, कळती मंडळी, आवश्यकतेनुसार, रंग,‌ धर्मानुसार, पार्टीनुसार. खिशात मावणारे छोटे रुमाल ते गळ्यात बांधायचे/टाकायचे, डोक्याला बांधायचे, चुंबळ करायचे, पंचे म्हणून कमरेला बांधायचे रुमाल. रुमाल, शेंबडाचे फुगे लपवायला, सर्दीचा सच्चा साथी, शिंकेमुळे होणारा पचका लपविण्यासाठी, घाम पुसण्यासाठी, तेलकट चेहरा पुसण्यासाठी, लागलं/खरचटलं तर साफ करण्यासाठी/बांधण्यासाठी, बसमध्ये जागा पकडण्यासाठी, धुतलेले हात कोरडे करण्यासाठी, प्रेम व्यक्त करण्यासाठी, परीक्षेत काॅपी करण्यासाठी, नातवंडांना खायच्या वस्तू बांधून आणण्यासाठी, उन्हापासून/धुळीपासून रक्षण करण्यासाठी, तोंड लपविण्यासाठी, बंडाना बनवण्यासाठी बांधण्यासाठी, लग्नात नाचण्याची अडचण सोडवण्यासाठी. रुमाल तुमच्या आमच्यासाठी, नागडेपणा लपविण्यासाठी.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2869 views

💬 प्रतिसाद (2)
आ
आंबट चिंच Sun, 05/17/2020 - 12:55 नवीन
लहानपणापासून एक संवय आहे की बाहेर कुठे नीघलो की पाकिटा बरोबर पहिले खीशात रूमाल हा हवाच. वरिल सर्व उपयांबरोबर आता मास्क म्हणुन जास्तच उपयोगी पडतोय.
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Sun, 05/17/2020 - 17:18 नवीन
पूर्वी ट्रेन मध्ये , सिनेमा गृहात किंवा वेटिंग रुम मध्ये, आपण पकडलेली जागा सोडून थोड्या वेळा साठी कुठे जाऊन यायचे असले, तर जागेवर ती राखून ठेवण्यासाठी रुमाल ठेवण्याचा संकेत होता. हा संकेत पाळला जात असे आणि रुमाल क्वचितच चोरीला जात असे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा