दूध हळद आणि Arsenicum Album 30C
आधीचे शीर्षक : " कोविड १९ आणि होमीओपॅथीक ईम्युनीटी बूस्टर्स माहिती हवी"
काडीचा आधार घेण्यासाठी एखाद्या दूध हळद आणि आल्याचा रस आणि मध यांच्या महतीशी अपरिचीत उरुग्वे देशातील एखाद्या माणसाने ते घ्यावे की नाही हा प्रश्न विचारल्या नंतर त्याचे केमिकल पृथःकरण करून काही धोका संभवतो का फायदा झाला तर झाला नाही तर नाही पण आरोग्याला सेफ आहे ? तुमचा स्वतःचा अनुभव काय आहे ? तुमच्या पैकी कुणी घेतले आहे का ? घेतल्यावरही लागण झालेले कुणि आहेत का ? (इथे जसे दूध हळदी संबंधाने प्रश्न विचारुन दाखवले तसे होमीयोपथीची योग्या योग्यता ठेवा बाजूला आणि हळद किंवा आल्याच्या रसा सारखे केमिकल खालील होमियोपथी रसायने म्हणून काय शारिरीक धोक्याचे नाही ना ? या गोळ्यांचे उत्पादना दरम्यान स्वच्छतेच्या दर्जाची नेमकी काय काळजी घेतली जाते - उत्पादन मॅन्यूअल होते की यांत्रिक होते ? असा चर्चेचा स्तर उंचावल्यास बरे पडेल किंवा कसे ?)
कोविड १९ च्या निमीत्ताने होमीओपॅथीक ईम्युनीटी बूस्टर्स ची चर्चा चालू आहे. त्यात माझ्या कानावर तुर्तास
* Arsenicum Album 30C
आणि
* Camphora 1M
ही दोन नावे कानोकानी आणि ऑनलाईन बातम्यातून वाचनात आली. (चुभूदेघे)
माझे मन तरी अद्याप साशंक आहे. मिपा जाणकारांच्या सल्ल्यांच्या प्रतिक्षेत
असा धागा किंवा प्रतिसादातून चर्चा आधीच झाली असल्यास कृ. दुवे द्यावेत.
* अनुषंगिका व्यतरीक्त चर्चा आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार
* उत्तरदायीत्वास नकार लागू
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Samjho Na Kuch To Samjho Na...कोरोनाचं जाऊ द्या. हळद, आलं, उकळलेले दुध आणि जे काय काय असेल त्या त्या घटकांना एकत्रीत करुन पिल्यानंतर सर्दी आणि घसा खवखव बरे होते. असे समजू. अटी लागू ★
हळदीचं प्रमाण किती, अद्रक किती घ्यायची, उकळलेले दुध किती घ्यायचं आणि किती लोकांवर हा प्रयोग केला आणि किती लोकांना त्याचा उपयोग झाला त्यावर ठरेल की हे औषध सर्दीवर उपयोगी आहे किंवा नाही त्यावर ते ठरेल असे वाटते.
★ प्रतिसादकर्ता अशा कोणत्याही काढा आणि तत्सम गोष्टीचं समर्थन करीत नाही. प्रतिसाद वाचून कोणी काही प्रयोग केल्यास, काही अपाय झाल्यास अथवा उपयोगी असल्यास असे वाटल्यास प्रतिसाद कर्ता त्याची जवाबदारी घेत नाही.
-दिलीप बिरुटे