Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

माझी काळोखाची कविता

च — चांदणे संदीप, Mon, 05/11/2020 - 07:02
मी न चाहता उगवतीचा येईल त्याला जातो सादर पसरूनि अंगावरती घेतो अंधाराची काळी चादर मोहक तिरिपा उजेडाच्या मृगजळ फसवे तिथेच होई त्याहूनी प्रिय, मजला घेणे बरबटून काळोखाची शाई नवे समर नव्या दिसाचे तयां सोबत आरवतेची हलके घाव देते भरूनि तमात शांती नीरवतेची जर का आहे प्रकाश जीवन नवसृजनाची नांदी काळोख गूढ गहिरे व्योम आणिक अज्ञाताचा प्रवास काळोख - संदीप भानुदास चांदणे (११/०५/२०२०)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3820 views

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Mon, 05/11/2020 - 07:22 नवीन
व्वा..., शब्दयोजना आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 05/12/2020 - 12:18 नवीन
कविता आणि शब्दयोजना आवडली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 05/11/2020 - 07:41 नवीन
चांगलं लिहिलंय.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 05/11/2020 - 07:51 नवीन
मी न चाहता उगवतीचा येईल त्याला जातो सादर पसरूनि अंगावरती घेतो अंधाराची काळी चादर भारी.. आवडले..
  • Log in or register to post comments
ब
बबु Mon, 05/11/2020 - 09:17 नवीन
मोहक तिरिपा उजेडाच्या मृगजळ फसवे तिथेच होई दोन ओळीमधे बरच काही सान्गणारी कविता! तमात शांती नीरवतेची.. भारी.. आवडले.
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Mon, 05/11/2020 - 10:00 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 05/11/2020 - 22:52 नवीन
त्याहूनी प्रिय, मजला घेणे बरबटून काळोखाची शाई
ह्या ओळी अशा लिहिल्या तर? त्याहूनी प्रिय, मजला ल्याणे अंग वसनी काळोखशाई कविता आवडली.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 05/12/2020 - 03:02 नवीन
एसभाऊ, धन्यवाद! बऱ्याच दिवसांनी दिसत आहात. मोहक तिरिपा उजेडाच्या मृगजळ फसवे तिथेच होई इथल्या मृगजळाच्या स्थितीवर आधी विचार झाला पाहिजे. मृगजळाच्या मागे जेव्हा तहानलेला जीव धावतो आणि ते मृगजळ आहे हे कळून त्याचा भ्रमनिरास होतो त्यावेळच्या आक्रोशाच्या अगदी विरूध्द जेव्हा रात्रीच्या शीतलतेत त्या जीवाला कसलीही तहान लागत नाही आणि तो नेहमी अनामिक सुखाचा, तृप्तीचा अनुभव घेत राहतो तेव्हा ते सुख, त्याची उत्कटता पराकोटीची आहे ती बरबटून घेतल्याशिवाय नाही दिसणार. दांडियाचा सोज्वळ गरबा आणि गणपतीतला तुफान नागीण डॅन्स हा फरक लक्षात घ्या. इथे गणपतीतला डॅन्स अपेक्षित आहे. (दुसरं उदाहरण लवकर कळेल असं वाटतंय!) सं - दी - प
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 05/12/2020 - 11:30 नवीन
मी न चाहता उगवतीचा येईल त्याला जातो सादर पसरूनि अंगावरती घेतो अंधाराची काळी चादर
  • Log in or register to post comments
ख
खिलजि Tue, 05/12/2020 - 11:37 नवीन
दाट दाट काळोखात दूर वात तेवते चालतो मी मार्ग माझा वात वाट शोधते कोणते हे रूप माझे ? मीच मजला शोधतो घेतला दिवा तो हाती तरीही काळोखात राहतो सावली बघून मजला कैक काळ लोटला उगवेल कधीतरी सूर्य माझा म्हणुनी श्वास रोखला
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 16 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 16 hours ago
  • सुंदर !!
    1 day 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा