Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

||चंद्रवेळ||

प — प्राची अश्विनी, Sat, 05/09/2020 - 05:05
1 आकाशातून खिडकीत, खिडकीतून फोटोत उतरलेला चंद्र, तुला WhatsApp वर पाठवला की मग कुठे माझी पौर्णिमा सुरू होते. अन तुझा त्यावर reply आला की ती शारदीय होते. 2माहीत असतं, "छान, ओके किंवा तूच माझा चंद्र" याहून दुसरा तुझा reply येणार नाही. पण तरी मी खूष असते कारण मला कळतं याहून अधिक तुला खरंच काही सुचणार नाही. 3 आठवतं? एका रात्री एअरपोर्टवरवरून तू मला कॉल केला होतास. तू घरी पोचेपर्यंत आपण बोलत होतो. . तेव्हा चंद्रसुद्धा खिडकीपाशी थांबून राहिला होता. 4 एकदा मोकळ्या आभाळाखाली समुद्रकिनारी तुझ्या कुशीत चांदणी रात्र घालवायचीय. खाली चमचमणारी वाळू, समोर चमचमता समुद्र पांघरायला चांदणं... प्लीज? एकदाच? 5 कधी कधी वाटतं, आपल्या या नात्यात मी तुला हट्टाने पकडून ठेवलंय, चांदण्यासारखं जरा मूठ सैल केली की तू निघून जाशील. मागं कसलीही खूण न ठेवता.. 6न राहवून तुला काल खिडकीतल्या चंद्राचा फोटो पाठवला. वाटलं, इतक्या दिवसांच्या अबोल्यानंतर तू काही तरी तर बोलशील.. आपल्यातलं अंतर मी केव्हाच स्विकारलेलं खात्री होती की दुसऱ्या टोकाला तू नक्कीच असशील.. 7 तुझा हात तर सोडून दिलाय, निग्रहाने, मनाचा चकोर झालाय.. आपली चंद्रवेळ परतून येईल???

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7969 views

💬 प्रतिसाद
प
प्रिती-राधा (verified= न पडताळणी केलेला) Sat, 05/09/2020 - 05:08 नवीन
छान
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 05/09/2020 - 05:22 नवीन
खूपच सुरेख.
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Sat, 05/09/2020 - 05:53 नवीन
मस्त लिहीलीये!
  • Log in or register to post comments
र
राघव Sun, 05/10/2020 - 05:04 नवीन
कडक लिहिलं आहेस मायो! पहिली चार तर अगदी टोचणारी झालीयेत. काय लिहिते ही..!! [अचंबित] राघव
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Sun, 05/10/2020 - 05:21 नवीन
छानच.. लिहीत रहा.. वाचत आहे...
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sun, 05/10/2020 - 07:19 नवीन
धन्यवाद सगळ्यांंना! :)
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 05/11/2020 - 22:59 नवीन
एकेका कडव्याचा प्रवास हिवाळ्यातल्या दीर्घ रात्रीप्रमाणे मनात रेंगाळत राहतो हे ह्या कवितेचं (किंवा स्फुटाचं) बलस्थान आहे.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 05/12/2020 - 04:23 नवीन
धन्यवाद. एसभाऊ, ब-याच दिवसांनी ?
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 05/12/2020 - 14:00 नवीन
हो ना. कशा आहात तुम्ही? काही गद्यसुद्धा लिहाल का? भारी लिहिता हेवेसांनल.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 05/12/2020 - 03:35 नवीन
काव्य हे यमक- प्रास यात नसून कल्पनेत असतं हे पुन्हा एकवार जाणवलं !
  • Log in or register to post comments
O
OBAMA80 Tue, 05/12/2020 - 03:50 नवीन
पांघरायला चांदणं...जबरा...या ओळी सुचायला बहुतेक प्रेमात पडायला हव मी तुला हट्टाने पकडून ठेवलंय, चांदण्यासारखं जरा मूठ सैल केला की तू निघून जाशील. मागं कसलीही खूण न ठेवता..हे फारच आवडल...
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 05/12/2020 - 04:24 नवीन
:) रच्याकने, ते "केली" हवं, शुध्दलेखनात चूक झाली आहे माझी.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Tue, 05/12/2020 - 13:50 नवीन
आकडे का टाकलेत कळलं नाही. (रसभंग होतोय) बाकी कविता नेहमीसारखी सुरेख..
Image removed.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 17 hours ago
  • सुंदर !!
    1 day 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा