Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

सह्याद्रीचा सिंह गर्जतो...

आ
आपला अनिकेत
गुरुवार, 05/07/2020 - 08:34
💬 4 प्रतिसाद
सदर लेख हा १ मे या दिवशी लिहण्यात आला होता पण मिपा संकेतस्थळावर टाकण्यास उशीर झाला त्यासाठी क्षमस्व. आज 1 मे, हा दिवस दरवर्षीप्रमाणे आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा करतो हल्ली किमान WhatsApp वरती Status तरी ठेवून. काही वर्षांपूर्वी मराठी TV channels वरती महाराष्ट्राची एक tagline असायची... सुजलाम सुफलाम महाराष्ट्र !‌‌ तर आता हा प्रश्न पडतो की खरोखरच हा माझा महाराष्ट्र त्या tagline प्रमाणे सुजलाम सुफलाम राहिल का...? आपला महाराष्ट्र या देशाच्या विकासात आणि देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यात नेहमीच अग्रेसर असतो, पण सध्या आपला महाराष्ट्र नको त्या गोष्टीत (Corona) देशामध्ये सर्वात पुढे आहे. Coronaने आपल्या महाराष्ट्राला आणि देशाला जो विळखा घातलाय तो कधीपर्यंत सुटेल ते त्या भगवंताला पण नाही माहित... कारण त्याने सुध्दा यातून काढता पाय काढलाय आपली दारे बंद करून. Lockdown संपल्यानंतर आपल्या महाराष्ट्राची तसेच या देशाची अर्थव्यवस्था थोड्याफार प्रमाणात का होईना पण डगमगणार आहे.ह्याला कारणं पण तशीच आहेत, सांगायचं झालं तर सद्यस्थितीत आपल्या महाराष्ट्राची आणि प्रामुख्याने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत उद्योगधंदे आणि वाहतूक बंद झाल्याने ती पुर्णपणे ठप्प झालिये आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या विकासाला आणि अर्थव्यवस्थेला कात्री लागली आहे. कारण तिचा या महाराष्ट्राला आणि देशाला आर्थिक महसूल मिळवून देण्यात मोठा वाटा आहे. त्यामुळे महाराष्ट्राची आणि आपल्या देशाची आर्थिक घडी बसवायला थोडाफार वेळ लागेल, त्यासाठी आपलं राज्य सरकार आणि केंद्र सरकार योग्य ते निर्णय आणि उपाय योजना अंमलात आणतील. तरीहि हा Lockdown संपेपर्यंत महाराष्ट्राच्या मराठी आणि अमराठी जनतेने आपला संयम बाळगून या सरकारला सहकार्य करावं. महाराष्ट्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार जे काही निर्णय आणि सुचना करतील त्यांचा प्रत्येक माणसाने एक सुजाण नागरिक बनून त्या आपल्या नैतिक जबाबदाऱ्या समजून त्यांचं पालन करावं. तरच आपल्या महाराष्ट्रावर आणि देशावर भविष्यात जे आर्थिक संकट येणार आहे त्याचा मुकाबला करू आणि पुढेही आपल्या या सह्याद्रीच्या सिंहाला आपल्या देशाच्या विकासात अग्रेसर राहून पुन्हा एकदा गर्जण्याची संधी देवु.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2998 views

💬 प्रतिसाद (4)
आ
आपला अनिकेत गुरुवार, 05/07/2020 - 08:45 नवीन
  • Log in or register to post comments
आ
आपला अनिकेत गुरुवार, 05/07/2020 - 08:46 नवीन
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 05/07/2020 - 16:35 नवीन
छान लेख आहे, एकंदरीत गंभीर परिस्थितीचा सामना महाराष्ट्रच नाही तर संपुर्ण जगाला करावा लागणार आहे ! कोविडमुळे ज्या काही उलथापालथी होतील त्यावर मात करावीच लागेल ! सर्वसाधारणपणे जनता सरकारला सहकार्य करत आहे, हे आशादायक आहे.
  • Log in or register to post comments
आ
आपला अनिकेत Sat, 05/09/2020 - 13:05 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा