Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

वाट..

म — मन्या ऽ, गुरुवार, 05/07/2020 - 00:08
वाट.. जुन्याच एका वाटेवर वाट चुकले होते मी आज पुन्हा मी त्याच वळणावर नवी वाट शोधते आहे मी भांबावलेली आहे मी गोंधळले ही आहे मी पुन्हा पुन्हा वाट ती शोधुन दमले आहे मी अशी कशी मी ही वेडी इतकी कशी मी बावरलेली; वाट स्पष्ट समोर असुनही वाट शोधत भटकणारी मी वाट हरवली आहे म्हणुन जीवनात माझ्या निराशेचा हा काळोख देईल का मज करून कोणी माझ्या नव्या वाटेची ओळख अखेरीस कोणीतरी हाक मजला दिली हिच आहे ती वाट तुझी अशी खात्री मजला दिली ती हाक ऐकुन धीर आता मजला आला हाक देणारा तो आवाज मला आता ओळखीचा वाटला उमजले मला नंतर ही हाक तर आहे माझ्याच अंर्तमनाची त्यानेच तर शोधली आहे वाट माझ्या नव्या प्रवासाची पुन्हा जुन्याच त्या वळणावर मी मजला नव्याने भेटले माझी मलाच मी आता नव्याने ओळखु लागले एकदा वाटले माझे मलाच हा तर आहे; परतीचा प्रवास तेव्हा अंर्तमनाने दिला आवाज हा तर आहे तुझ्या आयुष्याचा नव्याने घडणारा प्रवास! - Dipti Bhagat (पुर्वप्रकाशित)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4399 views

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस गुरुवार, 05/07/2020 - 03:02 नवीन
मस्त. आवडली.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 05/07/2020 - 04:37 नवीन
पुन्हा जुन्याच त्या वळणावर मी मजला नव्याने भेटले माझी मलाच मी आता नव्याने ओळखु लागले
एकदम खरच लिहिलंय.. नायिकेची सकारात्मकता दिसते आहे.. आणि तुमच्या या सुरेख कविते मुळे.. मला माझ्या विस्मरनात गेलेले गाणे आठवले.. आज ऐकतो पुन्हा नक्की.. तुम्ही पण ऐका, सुधीर मोघे लिखित, आशा भोसले यांनी गायलेले गाणे.. गाणे एकाच या जन्मी जणू फिरुनी, नवी जन्मेन मी धन्यवाद..
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ गुरुवार, 05/07/2020 - 12:56 नवीन
सुंदर आहे ते गाणं! खुप दिवस झाले ऐकुन.. नक्की ऐकेन.. :)
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज गुरुवार, 05/07/2020 - 05:55 नवीन
छान. लिहित राहा. कथा वगैरे!
Image removed.
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ गुरुवार, 05/07/2020 - 12:59 नवीन
@प्रचेतस, मनापासुन धन्यवाद! :) @जव्हेरगंज, कथा लिहीण्याचा मानस आहेच.. बघु कस जमतंय ते.. :)
  • Log in or register to post comments
P
Prajakta२१ गुरुवार, 05/07/2020 - 17:11 नवीन
कवितेतले काही कळत नाही तरी पण हि चांगली वाटतेय +१
  • Log in or register to post comments
म
मन्या ऽ Sat, 05/09/2020 - 05:43 नवीन
प्राजक्ता प्रतिसादासाठी मनापासुन धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 18 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 18 hours ago
  • सुंदर !!
    1 day 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा