Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

शतशब्दकथा: अंगरखा

ए
एस
Sun, 05/03/2020 - 23:23
💬 5 प्रतिसाद
पुन्हा तेच आटपाट नगर होते. तोच राजा होता. तेच दरबारी होते. तीच प्रजा होती. तोच लहानगा होता. आणि पुन्हा तोच जादूचा अंगरखा होता. राजा पुन्हा बाहेर पडला. पुन्हा तो मुलगा ओरडला, "राजा नागडा!" राजा संतापला. परत गेला. दुसऱ्या दिवशी तोच प्रकार. तिसऱ्या दिवशीही तसंच. हे आता रोजचंच झालं. पब्लिकला त्याचं काही वाटेनासं झालं. कुजबूज चर्चेत बदलली. चर्चा मोठ्या आवाजात. आंदोलने झाली. उठाव झाले. दडपले गेले. राजा काही बधेना. जादूचा अंगरखा घालून फिरणे सोडेना. कुणाचेच ऐकेना. सूज्ञांनी हात टेकले. लोक दुर्लक्ष करू लागले. एक दिवस राजाला विषाणू डसला. राजा आजारी पडला. व्हेंटिलेटरवर गेला. खपला. जादूचा अंगरखा आता भलताच लोकप्रिय झाला होता.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2274 views

💬 प्रतिसाद (5)
प
प्रचेतस Mon, 05/04/2020 - 04:04 नवीन
खूप दिवसांनी लिहिलंत, मस्त.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 05/04/2020 - 07:13 नवीन
आवडली .
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 05/04/2020 - 09:30 नवीन
काही समजली नाही कथा, कुणाबद्दल आहे ? ट्रम्प की आणखी कुणी ? कोरोनाने कुणी राज्यकर्ता तर खपला नाही अजून ..
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 05/05/2020 - 18:16 नवीन
ही शशक समजायला तुम्ही एक कसलेले व जुने मिपाकर असायला हवे आणि तुमचे मिपाचे सखोल वाचन असायला हवे. ज्यांना समजली त्यांनी कृपया प्रतिसादात 'समजली' एव्हढेच लिहा आणि गंमत पहा! इतरांनी वाचा आणि सोडून द्या. हाकानाका! ;-) कृ. ह. घे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 05/04/2020 - 16:54 नवीन
एस, कथा छान आहे. पण लोकं खरंच इतके मूर्ख असतात का? सत्तेसमोर शहाणपण चालंत नाही म्हणतात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा