Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

शशक-२०२०: पिंजरा

N
Nishantbhau
Mon, 04/27/2020 - 19:07
💬 7 प्रतिसाद
" हे ना अमेरिकेतलं the Best झू आहे". निर्मोह ला कडेवर घेऊन श्रावण त्याला माहिती सांगत होता. "इतक्या सुंदर आणि मोठ्या पिंजऱ्यात फक्त एकच गोरिल्ला?" निर्मोह ने कुतूहलाने विचारल. "अरे तो इथला सगळ्यात हुशार गोरिल्ला आहे." गोरिल्लाला जवळून बघत निर्मोह ने विचारल "पण याचे मॉम डॅड कुठे आहेत? " "ते लांबच्या जंगलात." "पप्पा आपण याला पिंजऱ्यातून सोडून द्यायचं, म्हणजे तो आपल्या मॉम डॅड कडे जाईल." आपल्या मुलाकडे कौतुकाने बघून हसत श्रावण म्हणाला "अरे तो नाही जाणार. बघ इथे किती special treatment मिळते त्याला." निर्मोह हिरमुसला आणि त्या गोरिल्ला कडे बघत म्हणाला "How Sad." पिंजऱ्यातून आवाज आला “Just Like your Dad!”

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2576 views

💬 प्रतिसाद (7)
N
Nishantbhau Mon, 04/27/2020 - 19:10 नवीन
मुलांची नावे अध्यात्मिक ठेवून भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्या आणि आपल्या आई वडिलांना वर्ष दोन वर्षातून एकदा भेटणाऱ्या सर्व श्रावण बाळांना समर्पित.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Mon, 04/27/2020 - 19:14 नवीन
ग्रेट!! आवडली!!
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Mon, 04/27/2020 - 19:49 नवीन
अत्यंत समर्पक
  • Log in or register to post comments
श
शेखर Tue, 04/28/2020 - 04:49 नवीन
+१
  • Log in or register to post comments
N
Nishantbhau Tue, 04/28/2020 - 18:03 नवीन
माझी कथा योग्य सदरात चिकटवण्यासाठी कोणी मदत कराल का?
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 04/28/2020 - 18:35 नवीन
स्पर्धेत प्रवेशिका देण्यासाठी साहित्य संपादकांना व्यनि पाठवणे आवश्यक होते. आता ही शशक तुमच्या नावाने प्रकाशित झाली आहे तर तुर्तास मुख्य पानावर असूद्या...
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar गुरुवार, 04/30/2020 - 15:39 नवीन
छान!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा