Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

जगज्जेता [भावानुवाद - शतशब्दकथा]

म
मूकवाचक
Fri, 04/24/2020 - 19:34
💬 1 प्रतिसाद
सेकंदाला हजारो मैल इतक्या झंझावाती वेगाने ब्रह्मांडातून भरारी मारताना कॅप्टन विजयच्या मनात त्याने मिळवलेल्या दैदिप्यमान विजयांच्या सुखद स्मृती क्षणभर डोकावून गेल्या. लढाईच्या सहाव्या टप्प्यात दुष्मनाला लालूच दाखवत विस्तीर्ण पर्वतरांगांच्या कड्याकपारींमधे अडकवून त्यांच्यावर तोफगोळ्यांचा जोरदार भडिमार करताना दाखवलेली अफलातून कल्पकता! त्या दिवशी त्याला एका पाठोपाठ एक अशी तीन शौर्यपदके मिळालेली होती. पुढे मोजून तीन दिवसात ३१ डिसेंबरच्या त्या अविस्मरणीय रात्री कॅप्टन विजय कुमार या जगातला सर्वश्रेष्ठ योद्धा ठरलेला होता. "मी कायमची घर सोडून जाते आहे, विजू डिअर!" आभासी वास्तवात गुंगून गेलेल्या विजयला कुजबुजल्यासारख्या स्वरात एक परिचित आवाज ऐकू आला. "लग्नाचा अर्थ समजण्याएवढी तुझी मानसिक वाढ कधी चुकूनमाकून झालीच, तरच पुन्हा माझ्या ...". तो आवाज हळूहळू विरत गेला. सौ. अंजली विजय कुमार तावातावाने घराबाहेर पडली. पाठीमागे वळून न बघण्याची तसदी देखील न घेता तिने दरवाजाला चक्क लाथ घातली. दरवाजा धाडकन 'लॅचबंद' झाला. [एका इंग्रजी शतशब्दकथेचा स्वैर भावानुवाद]

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2006 views

💬 प्रतिसाद (1)
म
मराठी कथालेखक Sat, 04/25/2020 - 11:18 नवीन
पाठीमागे वळून न बघण्याची तसदी देखील न घेता तिने दरवाजाला चक्क लाथ घातली
बाहेर उघडणारा दरवाजा आहे का ? शक्यतो सगळे दरवाजे आत उघडतात...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा